Saturday, April 18, 2026
Google search engine
HomeBusinessBIG BREAKiNGमुल नगरपरिषद नगराध्यक्ष पदाकरीता काँग्रेस व भाजपा मधे चुरशीची लढत.

मुल नगरपरिषद नगराध्यक्ष पदाकरीता काँग्रेस व भाजपा मधे चुरशीची लढत.

मुल नगरपरिषद नगराध्यक्ष पदाकरीता काँग्रेस व भाजपा मधे चुरशीची लढत.

शिवसेना उ.बा.ठा.गटाकडुन नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी काही तांत्रिक कारणांमुळे उमेदवारी होऊ शकली नाही

मुल : येत्या २ डिसेंबर रोजी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीत करीता उमेदवारी साठी शेवटच्या दिवशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी सह नगरसेवक पदाकरीता निवडणूक उतरलेल्या वीसही उमेदवारी सादर केले, काँग्रेस पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी सौ. एकता प्रशांत समर्थ ह्यांनी नामांकन अर्ज दाखल केले,

तसेच भारतीय जनता पार्टी कडून नगराध्यक्ष पदाकरीता प्रा. डॉ. सौ. किरण किशोर कापगते – बोरकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले व नगरसेवक पदाकरीता उमेदवारी भाजपा कडून दाखल करण्यात आले,

शिवसेना उ. बा. ठा . गटाकडून प्रभाग क्रमांक 1 मधुन महेश चौधरी, प्रभाग क्र.2 मधुन राकेश मोहुलै, प्रभाग क्र.5 मधुन नरेश कोल्हे, प्रभाग क.6 मधुन आकाश कावळे व वैशाली कोठारे, प्रभाग क्रमांक 8 मधुन सौ. टिना राजेश ठाकरे, प्रभाग क्रमांक 9 मधुन स्वप्नील नागोशे यांनी उमेदवारी अर्ज सादर केले,व शिवसेना उ. बा. ठा . गटाकडून नगराध्यक्ष उमेदवारी करीता जात वैधता प्रमाणपत्राची तांत्रिक अडचण आल्यामुळे सौ. टिना राजेश ठाकरे नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी सादर करु शकले नाही,

तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने नामांकन अर्ज सादर करण्यात आले व शिवसेना शिंदे गट कडून उमेदवारी सादर करण्यात आले, ह्यावेळी नगरपरिषद निवडणूक चुरशीची लढत होईल असे मुल शहरात चर्चाला उधाण आले आहे

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार मुर्दूला मोरे यांचे मार्गदर्शनात मुख्याधिकारी संदीप दोडे , आणि नायब तहसीलदार प्रविण चिडे सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून निवडणूक प्रक्रिया पार पाडली.

सतीश राजुरवार उप संपादक न्यूज इंडिया✍️

 

RELATED ARTICLES

मूल शहरात ” गॅस किल्लत”?

मूल शहरात " गॅस किल्लत"? एजन्सी धारक " सावलीत" बसून सांभाळतो " मूल " ? रोखठोक महेश पानसे. चंद्रपूर:-- जिल्ह्यात " गॅस प़ाब्लेम" सुरू झाला आहे. जिल्हा प़शाशनाचे निदैशानुसार ज्या...

“मय्यत” म्हरेगाव घाटाचे हाेत आहे चिरहरण?

"मय्यत" म्हरेगाव घाटाचे हाेत आहे चिरहरण? रोख ठोक महेश पानसे.✍️ मुल: १६.११.२०२५  रेती माफीया कुठल्या स्तरावर जाऊन भामटेगिरी करतील हे सांगता येत नाही. महसूल विभागातील जबाबदार...
- Advertisment -spot_img

Breaking News

Popular News