Saturday, April 18, 2026
Google search engine
HomeBusinessELECTiON TiMESमूल न. प. नगराध्यक्ष पद निवडणूक....

मूल न. प. नगराध्यक्ष पद निवडणूक….

मूल न. प. नगराध्यक्ष पद निवडणूक….

‘श्रीमती’ अन ‘श्रीमंती’…!

राजकारण
प्रा. महेश पानसे.

मुल: महिला आरक्षण असलेल्या मूल नगराध्यक्ष पदाकरिता अखेर कांग्रेस तफै जनमान्य माजी सभापती प़शांत समथॅ यांच्या ‘श्रीमती’ एकता समथॅ तर भा. ज.प. तफै इंजीनियर तथा व्यावसायिक किशोर कापगते यांच्या ‘श्रीमती’ जनताभिमुख डॉ. प़ा. किरण कापगते यांना मैदानात उतरविण्यात उतरविले. दोहोंपैकी एक ‘ श्रीमती ‘मैदान मारेल व नगराध्यक्ष बनेल. कोण बनेल हे मतदानानंतर ईव्हीएम ठरवेल.

अपवाद साेडला तर ‘पैसेवाल्याचेच राजकारण’ ही म्हण जरी खरी असली तरी मूल नगराध्यक्ष पदाकरिता उमेदवारांची निवड करताना कांग्रेस व भा. ज. पा. या दोन्ही पक्षांनी ‘श्रीमती’च्या निव्वळ श्रीमंतीचा विचार न केल्याचे लक्षात येते. कांग्रेस वाल्यांनी सौ. एकता समर्थ तर भा. ज. पा. वाल्यांनी डॉ. सौ. किरण कापगते यांची निवड करताना त्यांचे पारिवारिक जनकायै, काम करण्याची लकब सुद्धा लक्षात घेतली दिसते. एक मालदार रेती व्यावसायीक आपल्या ‘श्रीमती’ च्या उमेदवारीसाठी शेवट पावेतो लक्ष्मीची झलक दाखवीत बसले पण मैदानात उठले नाहीत. कांग्रेस मध्येही रग्गड आसामी मैदानातून बाद झाले.

कांग्रेस ने योग्य उमेदवार देण्याकरिता प़संगी शहरातील जनाधार लाभलेल्या व जुने भा.ज.प. द्वेष्टे असलेल्या समथॅ यांना वाव देऊन एकता समथॅ यांना उमेदवारी दिली. एकंदरीत प़शांत समथॅ यांची लोकप्रियता “कॅच” करण्यात कांग्रेस ला यश मिळाले.
भा. ज. पा. कडे उमेदवारी करीता फेटे बांधून ‘श्रीमती’ करीता अनेक रग्गड येरझारा मारताना दिसले. शांत, संयमी, उच्च शिक्षाविभुषीत व जनमानसात रुळलेल्या किरण कापगते यांना उमेदवारी देऊन ‘श्रीमंती’ ची व्याख्या बदलविली.

एकता समथॅ व किरण कापगते यांच्या ‘ श्रीमंती’ चे मोजमाप त्यांच्या परिवारजनांचे आजवरील जनकायॅ,लाभलेला जनाधार, दोघींची राजकीय परिपक्वता, शहरसेवेची आस यातून करण्यात आले हे मात्र निश्चित. विजयश्री एकीला मिळेल मात्र दोन्ही उमेदवार तोडीचे ही धारणा मूल शहरात पसरली आहे. हे चांगले राजकीय संकेत समजले जातात.

कांग्रेस च्या एकता समथॅ यांचे मागे माजी सभापती, जनाधार लाभलेले कायॅकत्यै प़शांत समथॅ यांची आजवरील सेवेची ‘श्रीमंती’ आहे. हसमुख व्यक्तीमत्व असलेल्या प़शांत समथॅ यांची राजकीय कारकीर्द कुठेही डागाळलेली दिसत
नाही. कांग्रेस ची हवा नसली,नसली तरी प़शांत समथॅ यांची
स्थानिक पकड कायम आहे.

भाजप ची असलेली हवा डॉ. किरण कापगते यांची उमेद जागविणारी आहे. स्वता किरण कापगते हया सुस्वभावी, दुरदुष्टी असलेली उच्च शिक्षाविभुषीत उमेदवार समजल्या जातात. लाडक्या बहिणींमध्ये त्यांचा सुसंवाद असलेल्या उमेदवार असल्याचे बोलले जाते.

एकता समथॅ ह्यांच्या पाठीशी प़शांत समथॅ हयांच्या लोकाभिमुखतेची ‘श्रीमंती’ तर किरण कापगते ह्यांना व्यक्तीमत्वासह पक्षीय बलाची ‘श्रीमंती’असल्याचे बोलले जाते.
नगराध्यक्ष पदाचे गत निवडणुकांमध्ये लक्ष्मीचे दशॅन भलमार झाले हे वेगळे सांगायची गरज नाही.

आता मात्र दोन्ही उमेदवार स्व कामाने, पारिवारिक कायाॅने ‘ श्रीमंत” असल्याने मतदारांनी आपल्या सदविवेक बुद्धीने मतदान करावे व आदशॅ घडवावे असे जाणकारांना वाटते.

प्रा. महेश पानसे ✍️

RELATED ARTICLES

नगरपरिषद निवडणूक, आज फैसला. नेत्यांचे ” षटकार ” तर मतदारांचे “फटकार “…….. !

नगरपरिषद निवडणूक, आज फैसला..... नेत्यांचे " षटकार " तर मतदारांचे "फटकार "........ ! राजकारण प्रा. महेश पानसे. मुल : जिल्ह्यातील अनेक नगरपरिषदांच्या नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या भाग्याचा आज...

मुल नगर परिषद निवडणूक-2025.  “स्वतः च्या हिम्मतीवर लढा ना राजे हो…!! “

मुल नगर परिषद निवडणूक-2025.  "स्वतः च्या हिम्मतीवर लढा ना राजे हो...!! " इतकी वर्षे आपले सत्ता भोगी नगरसेवक उमेदवार म्हणून कार्यकर्तृत्व शुन्य पण बोलबाला बड्या नेत्यांचा व्वा रे...

” मूल च्या राजकारणातील वलयांकित वादळ..!!”

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस नगरसेवक पदाचे उमेदवार श्री.प्रशांत समर्थ- " मूल च्या राजकारणातील वलयांकित वादळ..!!" ह्यांच्या तोडीचा एक तरी नगर सेवक दाखवा... ज्यांनी लोकांच्या मनात घर केला.. इतकी वर्ष ज्यांनी मूल...

मूल न. प. नगराध्यक्ष पद निवडणूक…. नेत्यांची पाळत, जोरदार भिडंत…!

मूल न. प. नगराध्यक्ष पद निवडणूक.... नेत्यांची पाळत, जोरदार भिडंत...! राजकारण महेश पानसे. मुल : महिला आरक्षण असलेल्या मूल नगराध्यक्ष पदाकरिता अखेर कांग्रेस तफै माजी सभापती प़शांत समथॅ...

जनशक्ती मजबूत राहिली तर धनशक्तीवाल्या सत्ताधाऱ्यांचा माज उतरण्यास वेळ लागणार नाही- खासदार प्रतिभा धानोरकर.

जनशक्ती मजबूत राहिली तर धनशक्तीवाल्या सत्ताधाऱ्यांचा माज उतरण्यास वेळ लागणार नाही- खासदार प्रतिभा धानोरकर. मूल - मूल नगर परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसला मिळत असलेला प्रतिसाद पाहून...
- Advertisment -spot_img

Breaking News

Popular News