Monday, April 27, 2026
Google search engine
HomeBusinessELECTiON TiMESजनशक्ती मजबूत राहिली तर धनशक्तीवाल्या सत्ताधाऱ्यांचा माज उतरण्यास वेळ लागणार नाही- खासदार...

जनशक्ती मजबूत राहिली तर धनशक्तीवाल्या सत्ताधाऱ्यांचा माज उतरण्यास वेळ लागणार नाही- खासदार प्रतिभा धानोरकर.

जनशक्ती मजबूत राहिली तर धनशक्तीवाल्या सत्ताधाऱ्यांचा माज उतरण्यास वेळ लागणार नाही- खासदार प्रतिभा धानोरकर.

मूल – मूल नगर परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसला मिळत असलेला प्रतिसाद पाहून भाजप नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकायला लागली असुन भाजपाला मत देण्यासाठी क्षेञाचे आमदार जनतेला धमकी देत आहे. या धमकीला भिक न घालता काँग्रेसला मतदान करा. अशी विनंती चंद्रपूर-आर्णी लोकसभा क्षेञाच्या खासदार प्रतिभाताई धारणे यांनी केली.

झालेल्या सभेत बोलतांना खा. प्रतिभा धानोरकर यांनी मूलची जनता सुज्ञ असुन रस्ते, नाल्या आणि इमारत बांधकाम म्हणजे विकास नसुन मिळणाऱ्या सोयी आणि सुविधा विषयी जनतेला अभ्यास आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत जनता याचा विचार करणार असुन मूल शहरातील मतदारांची मजबुत फळी सत्ताधाऱ्यांचा माज उतरविण्यास सक्षम असल्याने मतदारांप्रती आभार व्यक्त केले. यावेळी काँग्रेसचे प्रदेश महासचिवा, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी यावेळी जनता यावेळेस नगर परिषदेत परिवर्तन घडवुन आणणार असुन शहराचा सर्वागिण विकास करण्यासाठी जिल्ह्याच्या खासदार आणि विधिमंडळाचे काँग्रेसचे तीन आमादार आपल्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार असल्याचे सांगीतले.

सभेपुर्वी मूल नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकी करीता उभे असलेल्या काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. रॅलीत खलनायक पुष्पा यांनी रॅलीच्या माध्यमातून मूल नगरातील मतदान व नागरिकांना आपल्या अभिनयाने वंदन करुन मतदारांना आकर्षित केले. यावेळी माजी नगराध्यक्ष विजय चिंमड्यालवार, बाजार समितीचे सभापती राकेश रत्नावार, उपसभापती राजेंद्र कन्नमवार, न.प.चे माजी सभापती प्रशांत समर्थ, बाबा अझीम यांचेसह नगराध्यक्षांच्या उमेदवार एकता समर्थ, दहा प्रभागाचे वीस उमेदवार, ज्येष्ठ पदाधिकारी राजुपाटील मारकवार, तालुका अध्यक्ष गुरु गुरनुले, गुरु चौधरी, बंडू गुरनुले, पवन नीलमवार, आकाश दहीवाले, महिला अध्यक्ष रुपाली संतोषवार, नलिनी आडपवार, समता बनसोड व काँग्रेसचे शहर व ग्रामीण काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार शहराध्यक्ष सुनील शेरकी यांनी मानले.

RELATED ARTICLES

नगरपरिषद निवडणूक, आज फैसला. नेत्यांचे ” षटकार ” तर मतदारांचे “फटकार “…….. !

नगरपरिषद निवडणूक, आज फैसला..... नेत्यांचे " षटकार " तर मतदारांचे "फटकार "........ ! राजकारण प्रा. महेश पानसे. मुल : जिल्ह्यातील अनेक नगरपरिषदांच्या नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या भाग्याचा आज...

मुल नगर परिषद निवडणूक-2025.  “स्वतः च्या हिम्मतीवर लढा ना राजे हो…!! “

मुल नगर परिषद निवडणूक-2025.  "स्वतः च्या हिम्मतीवर लढा ना राजे हो...!! " इतकी वर्षे आपले सत्ता भोगी नगरसेवक उमेदवार म्हणून कार्यकर्तृत्व शुन्य पण बोलबाला बड्या नेत्यांचा व्वा रे...

” मूल च्या राजकारणातील वलयांकित वादळ..!!”

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस नगरसेवक पदाचे उमेदवार श्री.प्रशांत समर्थ- " मूल च्या राजकारणातील वलयांकित वादळ..!!" ह्यांच्या तोडीचा एक तरी नगर सेवक दाखवा... ज्यांनी लोकांच्या मनात घर केला.. इतकी वर्ष ज्यांनी मूल...

मूल न. प. नगराध्यक्ष पद निवडणूक…. नेत्यांची पाळत, जोरदार भिडंत…!

मूल न. प. नगराध्यक्ष पद निवडणूक.... नेत्यांची पाळत, जोरदार भिडंत...! राजकारण महेश पानसे. मुल : महिला आरक्षण असलेल्या मूल नगराध्यक्ष पदाकरिता अखेर कांग्रेस तफै माजी सभापती प़शांत समथॅ...

निधी नसताना दिवसभर नगर परिषदेत नुसतं बसून कांय करणार , सुधीरभाऊंच्या निधीनेच विकास शक्य , जनतेमध्ये कुजबुज

निधी नसताना दिवसभर नगर परिषदेत नुसतं बसून कांय करणार , सुधीरभाऊंच्या निधीनेच विकास शक्य , जनतेमध्ये कुजबुज मूल नगरपरिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षपदासाठी एकूण पाच...
- Advertisment -spot_img

Breaking News

Popular News