तालुकास्तरीय शालेय स्पर्धा परीक्षापूर्व मार्गदर्शन शिबिर
मूल– जवाहर नवोदय परीक्षा मार्गदर्शन केंद्र चंद्रपूर अंतर्गत मूल तालुक्यातील इयत्ता चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षा तसेच इयत्ता पाचवी व आठवी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा आणि सैनिक स्कूल प्रवेश परीक्षासाठी बसणाऱ्या हिंदी , इंग्रजी व मराठी माध्यमातील शासकीय शाळा, खाजगी अनुदानित शाळा व इंग्रजी कॉन्व्हेन्ट शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आयोजित एकदिवसीय तालुकास्तरीय शालेय स्पर्धा परीक्षापूर्व मार्गदर्शन शिबिर स्थानिक नवभारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयमध्ये नुकतेच पार पडले.
या शिबिराचे उद्घाटन प्रमुख अतिथी केंद्र संचालिका आम्रपाली बागेसर, विषयतज्ज्ञ आनंद गोंगले, प्राचार्य बारसागडे, प्रा.महेश पानसे व तज्ञ मार्गदर्शक किशोर नरड यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
या शिबिरात तज्ज्ञ मार्गदर्शक किशोर नरड यांनी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा व सैनिक स्कूल परीक्षा पद्धती, नविन अभ्यासक्रम माहिती, प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका स्वरूप, वेळेचे , वेळेचे नियोजन व अभ्यास तंत्र या विषयावर विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
तत्पूर्वी, अतिथींचे स्वागत आयोजकांच्या वतीने गुलाबपुष्प आणि पेन — डायरी व पुस्तक देऊन करण्यात आले. या शिबिरात विविध शाळांमधील विद्यार्थी पालकासहीत सहभागी झाले होते. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी भरत कुमार, शिपाई राहुल नागपुरे व आकाश सिडाम आदींनी परिश्रम घेतले.


