Thursday, May 21, 2026
Google search engine
HomeBusinessBIG BREAKiNGस्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक मतदानातून जि. प. व प. स. बाद..!

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक मतदानातून जि. प. व प. स. बाद..!

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक
मतदानातून जि. प. व प. स. बाद..!

“अनास्था” की राजकीय “नौटंकी”?

रोखठोक
महेश पानसे.

 चंद्रपूर : राज्यातील विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेतंर्गत १७ विधानसभेच्या निवडणुका घोषित
झालेल्या आहेत. यात दोन पोटनिवडणुका व इतर काही गत
अनेक वर्षांपासून रेंगाळलेल्या विधानसभेच्या जागांच्या निवडणूका आहेत.
वधाॅ,गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील महानगर परिषदा, नगरपालिका, जिल्हा परिषद सदस्य यांचेसह पंचायत समिती सभापती यांचे मतदान विधानपरिषदेच्या एका आमदाराराचे नशीब टकाटक करणार आहे मात्र, संविधानाने जिल्हा परिषद व पंचायत समिती पदाधिकाऱ्यांना दिलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीकरीता दिलेल्या मतदानाचे हनन प़शाशनाकडून होणार हे जवळपास
निश्चित समजले जात आहे. ही ग़ामिण जनतेप़ती अनास्था की राजकीय नौटंकी? यावर चिंतन मात्र सुरू झालेले दिसत आहे. कारण चंद्रपूर, वधाॅ व गडचिरोली जिल्ह्यात गत अनेक वषाॅपासून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूका घेण्यात न आल्याने ग़ामिण क्षेत्राचे नेतृत्व करणाऱ्या जि. प. सदस्य, पदाधिकारी व प. स. सभापतींना मतदानाच्या अधिकारांपासून वंचीत राहावे लागणार आहे. अशा स्थितीत चंद्रपूर, गडचिरोली, वधाॅ स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणूक होणे दुदैवी असल्याचे मत व्यक्त होऊ लागले आहे.

चंद्रपूर जिल्ह्या परिषदेत
सदस्य मतदान संख्या ५७ आहे तर
१५ पंचायत समिती सभापती मतदार असतात. चंद्रपूर जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूका झाल्याच नसल्याने ७२ मतांचे मुल्य शुन्य झाले आहे. गडचिरोली जिल्ह्या परिषदेसह जिल्हयातील १२ पंचायत समिती सभापतींचा मौलिक अधिकार कवडीमोल ठरणार आहे. वधाॅ जिल्हा परिषद सदस्यांसह येथील ८ पंचायत समिती समिती सभापती घटनेने दिलेला आपला मतदानाचा मौलिक अधिकार गाजवू शकणार नाहीत.

चंद्रपूर, गडचिरोली व वधाॅ
जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणूकीत आता फक्त ९७७ मतदार आपला मतदानाचा अधिकार गाजवतील. जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सभापती यांच्या मतदानाचा हक्क हिरावण्यात आला नसता तर कदाचित ही संख्या १५० ते २०० नी वाढली असती व चित्रही वेगळे असते असे बोलले जाते. राज्यात नुकत्याच न. प., नगर पंचायत निवडणूका संपन्न झाल्यात. मात्र जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकांना खो देण्यात आला ही बाब ग़ामिण जनतेच्या हक्क व अधिकाराचे हनन करणारी नाही का? हा सवाल कायम असतानाच आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीत ग़ामिण जनतेच्या प़तिनिधींना स्थान मिळणार नसल्याने मोठी बोंब होणार असून पुढील निवडणूकांमध्ये याचे ” साईड इफेक्ट्स ” बघायला मिळतील असे राजकीय समिक्षक
बोलतात.

RELATED ARTICLES

मूल शहरात ” गॅस किल्लत”?

मूल शहरात " गॅस किल्लत"? एजन्सी धारक " सावलीत" बसून सांभाळतो " मूल " ? रोखठोक महेश पानसे. चंद्रपूर:-- जिल्ह्यात " गॅस प़ाब्लेम" सुरू झाला आहे. जिल्हा प़शाशनाचे निदैशानुसार ज्या...

मुल नगरपरिषद नगराध्यक्ष पदाकरीता काँग्रेस व भाजपा मधे चुरशीची लढत.

मुल नगरपरिषद नगराध्यक्ष पदाकरीता काँग्रेस व भाजपा मधे चुरशीची लढत. शिवसेना उ.बा.ठा.गटाकडुन नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी काही तांत्रिक कारणांमुळे उमेदवारी होऊ शकली नाही मुल : येत्या २...

“मय्यत” म्हरेगाव घाटाचे हाेत आहे चिरहरण?

"मय्यत" म्हरेगाव घाटाचे हाेत आहे चिरहरण? रोख ठोक महेश पानसे.✍️ मुल: १६.११.२०२५  रेती माफीया कुठल्या स्तरावर जाऊन भामटेगिरी करतील हे सांगता येत नाही. महसूल विभागातील जबाबदार...
- Advertisment -spot_img

Breaking News

Popular News