भिषण अपघात, 17 गंभीर.
शल्यचिकित्सकांचे नेतृत्वात मदतकार्य सुरू.
सिंदेवाही :-
चंद्रपूर- नागभीड महामार्गावर बस व टॢक यांचे भिडंत होऊन गंभीर अपघात घडला. एस. टी. महामंडळ बसमध्ये असलेल्या 30 पैकी 17 रूग्ण गंभीर तर 10 प़वासी जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बंडू रामटेके यांचे नेतृत्वात व निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. कन्नाके यांनी त्वरीत सिंदेवाही रूग्णालयात धाव घेऊन वैद्यकीय
मदतकार्य सुरू केले.
घडलेल्या घटनेनुसार चंद्रपूर- तुमसर बस सिंदेवाही वरून निघाली. यात 30 प़वासी होते. सिंदेवाही समोर काही अंतरावर असलेल्या पळसगाव या गावानजीक समोरून येणाऱ्या टॢक ची जोरदार धडक बसल्याने हा भिषण अपघात घडल्याचे कळते.
सिंदेवाही येथील रुग्णालयात गंभीर जखमी व जखमींना भरती
करण्यात आले. दरम्यान माहिती कळताच जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. बंडू रामटेके यांनी वैद्यकीय चमूसह त्वरीत सिंदेवाही गाठून रुग्ण तपासणी केली. यातील 17 जणांची स्थिती गंभीर असल्याने त्यांना त्वरीत जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथे पाठविण्यात आले. तर इतर 10 जखमींना सिंदेवाही
येथेच उपचारासाठी भरती ठेवण्यात आले आहे.
3 रुग्ण किरकोळ जखमी असण्याने त्याना प़ाथमिक उपचार
करून घरी पाठविण्यात आले आहे.

घटनेची चौकशी पोलीस करीत आहेत. मात्र जिल्हा शल्यचिकित्सक व चिनी तत्परतेने घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वैद्यकीय यंत्रणा कामी लावल्याने रूग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. सिंदेवाही येथील रूग्णांवर वैद्यकीय अधिक्षक व 6 वैद्यकीय अधिकारी लक्ष ठेवून असल्याचे कळते.


