Monday, July 27, 2026
Google search engine
HomeBusinessNewsने.हि.विद्यालयात गणवेश वितरण सोहळा उत्साहात संपन्न.

ने.हि.विद्यालयात गणवेश वितरण सोहळा उत्साहात संपन्न.

ने.हि.विद्यालयात गणवेश वितरण सोहळा उत्साहात संपन्न.

जिद्द व चिकाटी हिच यशाचा गुरुमंत्र
……. अशोकजी भैया

नागभीड;— जिद्द, चिकाटी, परिश्रम व संस्कार यातूनच सुसंस्कृत व यशस्वी विद्यार्थी घडतात. शिक्षणाच्या बळावरच
भविष्य घडते असे मागॅदशॅन नेवजाबाई भैया शिक्षण संस्थेचे
सचिव अशोकजी भैया यांनी केले.
ते स्व. किसनलालजी मदनगोपालजी भैया फाउंडेशनच्या वतीने नेवजाबाई हितकारिणी विद्यालय, नवेगाव पांडव येथे आयोजित शैक्षणिक वर्ष २०२६-२७ निमित्त गणवेश व बॅग वितरण सोहळ्यात बोलत होते. सदर सोहळा थाटात संपन्न झाला.

सदर आकषॅक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अशोकजी भैया, सचिव, नेवजाबाई भैया हितकारिणी शिक्षण संस्था, ब्रम्हपुरी हे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून प़ा.महेश पानसे , अरुणभाऊ येवले, जेष्ट शिक्षक नरेंद्र चुऱ्हे तसेच गिरीष नवघडे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. सी. भैया यांनी केले. त्यांनी विद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेत विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच शिस्त, संस्कार आणि गुणवत्तापूर्ण उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.

प्रत्येक विद्यार्थ्याने मोठी स्वप्ने पाहून ती जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाच्या जोरावर पूर्ण करण्याचा संकल्प करावा, असे प्रेरणादायी आवाहन उपस्थित मागॅदशॅकांनी केले.

या सोहळ्यात इयत्ता ५ वी व ८ वी मधील सर्व नवप्रवेशित विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गणवेश व शालेय बॅगचे वितरण करण्यात आले. नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात आनंददायी व प्रेरणादायी व्हावी, या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांनी मनापासून स्वागत केले.

कार्यक्रमातील आणखी एक विशेष आकर्षण म्हणजे शिक्षक मुनि राज कुथे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या ‘उन्हाळी डायरी’ उपक्रमातील उत्कृष्ट डायरी पुरस्कार. या उपक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते ‘बेस्ट डायरी अवॉर्ड’ प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन शिक्षीका सौ. पडोळे यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शिक्षक श्री. फटाले यांनी मानून उपस्थित मान्यवर, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि स्व. किसनलालजी मदनगोपालजी भैया फाउंडेशनचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

हा सोहळा विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारा आणि शिक्षणासोबत सामाजिक बांधिलकी जपणारा ठरला.

RELATED ARTICLES

ने.हि.विद्यालयात कारगिल विजय दिन उत्साहात साजरा.

ने.हि.विद्यालयात कारगिल विजय दिन उत्साहात साजरा. नागभीड :  नेवजाबाई हितकारिणी विद्यालय, नवेगाव पांडव येथे एनसीसी विद्यार्थ्यांनी कारगिल विजय दिवस देशभक्तीपूर्ण वातावरणात व मोठ्या उत्साहात साजरा...

फुले चौकाचे 25 लाखाचे सौदयींकरण रखडले….!

चौकाचे 25 लाखाचे सौदयींकरण रखडले....! न. प. ला सुधारकांच्या नावाची "ऐलजीं " आहे का? रोखठोक प्रा. महेश पानसे मुल : ज्या कामाची गरज आहे ते करायचे नाही व ज्या...

२५ लाखाचे फुले चौकाचे सौंदर्यीकरण रखडले……

२५ लाखाचे फुले चौकाचे सौंदर्यीकरण रखडले...... नगरपरिषदच ठरली अडसर? मुल : शहरातील महात्मा फुले चौकाचे सौदयींकरण ठरले. एजन्सी निश्चित झाली. बांधकाम सुरू करण्याकरीता वर्क ऑर्डर झाला....

सनराईज मल्टिपर्पज ऑर्गनायझेशन, मूल तर्फे स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, मूल येथे महाराष्ट्र कृषी दिन साजरा

सनराईज मल्टिपर्पज ऑर्गनायझेशन, मूल तर्फे स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, मूल येथे महाराष्ट्र कृषी दिन साजरा  मूल : - सनराईज मल्टिपर्पज ऑर्गनायझेशन, मूल तर्फे मूल येथील स्वामी...

मूल न. प. ॲक्शन मोडवर…. मान्सूनपूर्व तयारी सुरू.

मूल न. प. ॲक्शन मोडवर.... मान्सूनपूर्व तयारी सुरू.  मूल;-- उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची चणचण दूर सारण्याकरीता न. प. ची जरा दमछाक झाली खरी पण गाडी रूळावर आणून...
- Advertisment -spot_img

Breaking News

Popular News