Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeBusinessNewsफुले चौकाचे 25 लाखाचे सौदयींकरण रखडले....!

फुले चौकाचे 25 लाखाचे सौदयींकरण रखडले….!

चौकाचे 25 लाखाचे सौदयींकरण रखडले….!

न. प. ला सुधारकांच्या नावाची
“ऐलजीं ” आहे का?

रोखठोक
प्रा. महेश पानसे

मुल : ज्या कामाची गरज आहे ते करायचे नाही व ज्या कामावर शहरवासीयांना आक्षेप आहे अशा कामांसाठी वळवळ करायची. एवढ्यात न. प. प्रशाशनास ही सवय जडल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.

घनकचऱ्यातून जनतेच्या पैशाचा निचरा करण्यासाठी गत 2 महिन्यापासून घामाघूम होऊनही धावपळ करणाऱ्या न. प. प्रशाशनास क्रांतिसूर्य क़ांतीज्योती फुलेंच्या नावाने चौकाचे सौदयींकरण करण्यात अडसर निमाॅण करण्यात आनंद मिळत आहे का? असा संतप्त सवाल शहरात उपस्थित होत आहे. या महान सुधारकांच्या नावाची न. प. ला ” ऐलजीं ” आहे की यातही ठेकेदाराची अडवणूक करून आधी ‘सरेंडर करायला लावण्याचा ” अर्थ ” पूर्ण हेतू आहे का? अशी भावनिक विचारणा होताना दिसते.

9 महिने लोटले फूले चौकाचे सौदयींकरण करण्यासाठी 25 लाखाचा निधी तयार आहे. कल्याणी मजूर संस्थेला आक्टो. 2025 ला बांधकाम सुरू करण्यासाठी कार्यआदेश देण्यात आला आहे. सा. बा. उपविभाग निधी खर्च करायला एका पायावर तयार आहे. मात्र न. प. प़शाशनाने खुटी मारुन ठेवल्याने फुले चौकाचे सौदयींकरण रखडल्याची बाब दुदैवाने पुढे आली आहे. अत्यंत संतापजनक बाब म्हणजे क़ांतीसुयॅ महात्मा फुले व क़ांतीज्योती सावित्रीबाईंच्या जयंती, पुण्यतिथी साजरी करताना पुढे पुढे करणारी नगरसेवक मंडळी व बहुसंख्येने असलेल्या माळी समाजाच्या(ओबीसी) कृपेने नगराध्यक्ष पदावर आरूढ झालेली सावित्रीबाईंची लेक नगराध्यक्ष पदावर असताना महान सुधारकांच्या नावांची विटंबना करणे कितपत योग्य ठरते? हा सवाल वेदनादायी ठरतो. न. प. ला या सौदयींकरण कामातील अडसर दूर करायला कितीसा वेळ लागेल, दोन दिवसात कामात अडसर ठरलेला न. प. चा बिऱ्हाड उचलायला पुरेशा आहे. मात्र 9 महिन्याचा कालावधी लोटूनही न. प. ने कुठल्या उद्देशाने अडंगा टाकला हे तरी स्पष्ट करावे. प़शाशक काळात फुले चौकाचे सौदयींकरण मंजूर झाले. त्यावेळी ज्या तत्परतेने मुख्याधिकारी महोदयांनी पुढाकार घेतला ती तत्परता ” न. प. वर बाॅडी” बसताच लयास का जावी?

नगराध्यक्षा, नगरसेवक, सभापतीगण, सुद्धा ऐवढे निष्टूर, तेही महान सुधारकांच्या नावांच्या चौकाचे सौदयींकरण करायला? महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांना गुरू स्थानी ठेवले त्या फुल्यांच्या नावे असलेल्या चौकाचे सौदयींकरण करण्यात अडसर आणणाऱ्यांना न. प. कायाॅलयात या महान विभूतींचे फोटो लावायचा तरी कुठे अधिकार आहे? असी संतप्त भावना व्यक्त होते व ती स्वाभाविक ठरते.
माळी समाजाचे नगरसेवक व नेते
गप्प कसे?
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले माळी समाजाचे दैवत आहेत. आश्चर्य या गोष्टीचे आहे की मूल शहरात बहुसंख्येने बसलेल्या समाज बांधवांचे नेते व माळी समाजातून नगरसेवक असलेले लोकप्रतिनिधी गत 9 महिन्यांपासून गप्प कसे? हा सवाल झिणझिण्या आणणारा आहे. न. प. वर कांग्रेस ची सत्ता आहे. तालुका अध्यक्ष माळी समाजाचे तर अनेक नगरसेवक याच समाजातून आहेत. शहरात समता परिषदेचे सुशिक्षित पदाधिकारी बहुसंख्येने आहेत मात्र फुले चौकाचे सौदयींकरण या विषयावर तेवढे गंभीर आहेत का? असते तर 9 महिण्यांपासून महान सुधारकांच्या, आपल्या दैवताचे अपमान कसा काय सहन करू शकतात? हे सवाल अजूनही अनुत्तरीतच आहेत.
मूल न. प.च नव्हे तर मूल- बल्लारपूर विधानसभेचा आमदार ठरविण्याची धमक(संख्या) ज्या माळी समाजात आहे, ती मंडळी फुलेंच्या नाव अस्तित्वासाठी ऐवढी लाचार कशी? अशीही भावनिक धारणा व्यक्त होताना दिसते. ” बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर ” हा बाणा आता न. प. च्या l टाईमपास व ” अर्थ ” पूर्ण व्यवहाराला या बाबतीत हद्दपार
करू शकतो हे निश्चित.
RELATED ARTICLES

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुका मध्ये २ ऑक्टोबरला इंटकचे राष्ट्रीय अधिवेशन

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुका मध्ये २ ऑक्टोबरला इंटकचे राष्ट्रीय अधिवेशन अधिवेशनाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजन समितीची बैठक. चंद्रपूर, दि. ९ ऑगस्ट २०२६  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे...

ने. ही. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी तुकाराम मुंढे चा संवाद….

ने. ही. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी तुकाराम मुंढे चा संवाद.... आयुक्तांनी दिला विद्यार्थ्यांना गुरुमंत्र! नागभीड:- मिशन IAS चे विभागीय संचालक श्री. मुनीराज कुथे व सहायक शिक्षक मनोज हेमके यांच्या मार्गदर्शनाखाली...

सौंदर्यकरण हवेच, सोबत फुले दांपत्यांचे स्मारक उभारा.

सौंदर्यकरण हवेच, सोबत फुले दांपत्यांचे स्मारक उभारा. इ अ. भा. समता परिषदेची भावनिक मागणी. मूल:- नगरपरिषदेतर्गत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले चौकाच्या सौंदर्यकरणाकरिता...

1 ऑगस्ट ला शहरात ” घर घर मे आयुर्वेद ” शिबीर.

1 ऑगस्ट ला शहरात " घर घर मे आयुर्वेद " शिबीर. मूल:--- गोर गरीबांना निशुल्क आरोग्य सेवा मिळावी व आयुर्वेद व आयुर्वेदाचे मौलिक महत्व घरोघरी...

राज्य पत्रकार संघ राज्य अध्यक्ष (निवड समिती) पदी प्रा. महेश पानसे.

राज्य पत्रकार संघ राज्य अध्यक्ष (निवड समिती) पदी प्रा. महेश पानसे. मुंबई :- ( विशेष प़तिनिधी) महाराष्ट्र राज्यातील अग्रगण्य व सर्वात मोठ्या पत्रकार संघ असलेल्या महाराष्ट्र...
- Advertisment -spot_img

Breaking News

Popular News