सावली तालुक्यात खरीप तक्रार निवारण तथा मार्गदर्शन कक्षाची स्थापना
सावली प्रतिनिधी रोशन बोरकर
सावली :- दिनांक 25/05/2026
खरीप हंगाम सुरु झाले असून तालुक्यातील शेतकरी हंगामाचे अनुषंगाने कामाला लागली आहेत. खरीपात तालुक्यात मोठया प्रमाणात साधारण 22500 हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड केल्या जाते व त्या पाठोपाठ साधारण 500 हेक्टर क्षेत्रावर कापूस पिकाची लागवड केल्या जाते भात पीक क्षेत्राचे तर बांधावर तूर पिकाची लागवड केल्या जाते. सध्या शेतकरी पूर्व मशागत व शेत शिवार बांधणी चे कामा सोबतच विविध वानांचे बियाणे व खते नियोजनाचे कामी लागलेली आहेत. सोबतच कृषी विभागाचे कर्मचारी खेळोंपाळी विविध मोहिमा राबवून शेतकऱ्यांना खरीप हंगाम उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान अवगत करून देत आहेत. शेतकरी खरीपाचे अनुषंगासने बियाणे, खते व कीटकनाशके नजीकचे कृषी केंद्रातून खरेदी करीत असतात. त्यात शेताकऱ्यांची निविष्ठा दर्जा, निविष्ठा दर, निविष्ठा उपलब्धता, लिंकिंग व अन्य बाबीत फसवबुक होऊ नये याबाबत कृषी विभाग लक्ष ठेऊन आहे.
त्यातही शेतकऱ्यांची काही तक्रार असल्यास ती तात्काळ सोडविन्या करीता तालुका कृषी अधिकारी कार्यालयात तक्रार निवारण व मार्गदर्शन कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. सादर कक्षाची स्थापना 15 मे 2026 ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधी करीता राहणार आहे. कक्षात शेतकऱ्यांच्या तक्रारी घेण्या करीता सोमवार ते शनिवार रो सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.30 पर्यंत कर्मचाऱ्यांची नियुक्त करण्यात आली आहे. सदर कक्ष तालुका कृषी अधिकारी श्री ललित राऊत यांचे अध्यक्षतेत व मार्गदर्शनात असून सचिव, कृषी अधिकारी, (गुण नियंत्रण ) श्री दिनेश पानसे हे आहेत. शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कक्षात भेट देऊन तथा कक्षात नियुक्त कर्मचाऱ्यांचे मोबाईल क्रमांक वर तक्रार तक्रार नोंदता येणार आहे. सदर तक्रार निवारण कक्षाबाबत तालुका कृषी अधिकारी यांनी नुकतेच आदेश जारी केले असून शेतकऱ्यांनी अधिक दक्षतेने नोंदणीकृत विक्रेते यांचेकडून, निविष्ठा बाबत सर्व आवशक माहीती घेऊन, पक्या बिलासह सर्व निविष्ठा खरेदी करावे, अधीक दर तसेच लिंकिंग बाबत स्पष्ठ नकार द्यावा व निविष्ठा खरेदी करतांना व त्यानंतर येणाऱ्या अडचणी व तक्रार वेळेत तक्रार निवारण कक्षाकडे नोंदणी करावी असे आव्हान करण्यात आले आहे.


