Thursday, May 28, 2026
Google search engine
HomeArchitectureपावसाचा हाहाकार शेतकरी संकटात …

पावसाचा हाहाकार शेतकरी संकटात …

पावसाचा हाहाकार शेतकरी संकटात …
पावसामुळे पंचनामे करणे झाले कठीण

चंद्रपूर : या वर्षाला पावसाने हाहाकार माजवला आहे. आज अनेक ठिकाणी पावसाची उघडझाप आहे, पण विदर्भात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दर्शविला आहे. आज चंद्रपूर, गडचिरोली, आणि यवतमाळ जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट, तर भंडारा, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यांत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातील काही ठिकाणी वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

तसेच शुक्रवारी  चंद्रपूर,गडचिरोली, आणि यवतमाळ जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट असेल. ओडिशा आणि वायव्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने विदर्भात पावसाचा इशारा देण्यात आला आहे, अशी माहिती नागपूर हवामान विभागाचे तज्ज्ञनि दिली.

मध्य महाराष्ट्रातील परिस्थिती ?

शुक्रवारपासून राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.शुक्रवार आणि शनिवारी विदर्भ, मराठवाडा, खानदेश वगळता मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील सर्व जिल्ह्यांत काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. या दोन दिवसांत राज्यात ढगाळ वातावरण राहून बहुतांश भागांत पावसाची शक्यता आहे.

पाउस अजून थांबेना परिस्थिती

२५ ते २९ सप्टेंबर दरम्यान राज्यात जोरदार पावसाचा धोका कायम राहील. विशेषत: २७ सप्टेंबरला मराठवाड्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील २४ तासांत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे पुढील पाच ते ६ दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा आहे.

पावसामुळे मोठे नुकसान तसेच शेतकरी संकटात

राज्यात सध्या मुसळधार पावसाने खूप मोठे नुकसान केले आहे. मराठवाड्याला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. उभी पिके पाण्याखाली गेली असून, शेतकरी संकटात आहेत. वर्ष भर बळीराजा मातीत कष्ट करून हिरवीगार रोप चार महिन्यात उगवतो पण पावसाने कहर केल्यामुले शेतकरी संकटात सापडताना दिसत आहे काही ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर केला आहे नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळे परिस्थिती आणखी गंभीर होत चालली आहे. सततच्या पाण्यामुळे सरकारला पंचनामे करणेही कठीण झाले आहे असे दिसून येते.

RELATED ARTICLES

सावली तालुक्यात खरीप तक्रार निवारण तथा मार्गदर्शन कक्षाची स्थापना

सावली तालुक्यात खरीप तक्रार निवारण तथा मार्गदर्शन कक्षाची स्थापना सावली प्रतिनिधी रोशन बोरकर सावली :- दिनांक 25/05/2026 खरीप हंगाम सुरु झाले असून तालुक्यातील शेतकरी हंगामाचे अनुषंगाने कामाला...

सावली तालुक्यातील कृषी केंद्र संचालकांची सभा

सावली तालुक्यातील कृषी केंद्र संचालकांची सभा सावली प्रतिनिधी रोशन बोरकर सावली - दि.२८- ०४-२०२६ तालुक्यातील सर्व कृषि केंद्र संचालकांची नुकतीच पंचायत समितीचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृहात...

सावली तालुक्यात कृषि विभागाचे खरीप नियोजन

सावली तालुक्यात कृषि विभागाचे खरीप नियोजन सावली प्रतिनिधी रोशन बोरकर सावली - दि. 24/04/2026 खरीप हंगाम तोंडावर असल्याने शेतकरी व शासनाचे कृषि विभाग खरीप हंगाम पूर्व तयारीचे...

ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा सावली तालुका काँग्रेस कमेटीची मागणी

ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा सावली तालुका काँग्रेस कमेटीची मागणी हेक्टरी ५०,००० रु.आर्थिक मदत करण्याची निवेदनातून मागणी सावली प्रतिनिधी रोशन बोरकर सावली:- दिनांक ०७/१०/२०२५...

शेतकरी कर्जमाफीबाबत ! ‘या’ शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावीच लागणार, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Agriculture : गेल्या वर्षापासून महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा सातत्याने चर्चेत येतोय. गत वर्षी विधानसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान महायुतीने राज्यातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आम्ही कर्जमाफीची भेट...
- Advertisment -spot_img

Breaking News

Popular News