Monday, August 10, 2026
Google search engine
HomeBusinessNewsनामदार छगनराव भुजबळ यांचा वाढदिवस ठरला "ज्ञानवर्धक"..!

नामदार छगनराव भुजबळ यांचा वाढदिवस ठरला “ज्ञानवर्धक”..!

नामदार छगनराव भुजबळ यांचा वाढदिवस ठरला “ज्ञानवर्धक”..!

मूल: ऐरव्ही नेतेमंडळींचे वाढदिवस रंगीबेरंगी असतात. माञ अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष ना. छगन भुजबळ यांचा वाढदिवस ” ज्ञानवर्धक ” पद्धतीने साजरा करून क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या पावन
अपेक्षेनुसार साजरा करण्याचे महतकार्य समता परिषदेचे जिल्हा अध्यक्ष प़ा. विजय लाेनबल् व सहकारी मंडळीनी पार पाडले.

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा राज्याचे अन्न , नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री नामदार छगनराव भुजबळ यांचा वाढदिवस दिनांक 15 आक्टोंबर 2025 ला सायंकाळी 7 वाजता चिमढा येथील महात्मा फुले वाचनालयाला विविध स्पर्धा परीक्षेचे 25 पुस्तक भेट व उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना रजिस्टर व पेन वितरित करून मिठाई वाटून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या अनोख्या उपक्रमाचे आयोजन समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रा. विजय लोनबले व त्यांच्या सहचारिणी सौ. सीमाताई लोनबले यांनी केले. वाचाल तर वाचाल या उक्तीप्रमाणे वाचन संस्कृती ला चालला मिळावी व ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे पुस्तक उपलब्ध व्हावे या उदात्त हेतूने स्वखर्चाने पुस्तक घेऊन वाचनालयाला भेट देण्यात आली.

चिमढा येथे नव्यानेच सुरू झालेल्या वाचनालयात अनेक युवक व युवती विविध स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहेत. या स्पर्धेच्या युगात ग्रामीण भागातील होतकरू व गुणवंत विद्यार्थी असूनही स्पर्धा परीक्षांमध्ये टिकण्यासाठी योग्य मार्गदर्शन व पुस्तकाचा साठा असणे गरजेचे असते, ही बाब लक्षात घेऊन प्रा. लोनबले यांनी ना. भुजबळ यांचा वाढदिवस वाचन संस्कृतीला चालना देणारा ठरावा व ग्रामीण विद्यार्थी शासकीय नोकरीत यावे ज्ञानवर्धक वाढदिवस साजरा केला. गावाबद्दल प्रेम व आस्था आणि सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून हा उपक्रम घेण्यात आला. याप्रसंगी सरपंच श्री. कालिदास खोब्रागडे, उपसरपंच श्री. योगेश लेनगुरे, मुल शहराध्यक्ष श्री. राकेश मोहुलें, स्वराज्य पतसंस्थेचे श्री. संदीप मोरे, एल्गार अकॅडमी चे श्री. किशोर राऊत, समता परिषदेचे श्री. धनराज मोहलें, श्री. वासुदेव नागोसे, माजी उपसरपंच भारत वाळके, सदस्य श्री. विनोद मांदाळे, श्री. जितेंद्र लेनगुरे, डॉ. दौलत शेंडे, श्री. प्रवीण लोनबले,श्री. राहुल कोटरंगे, श्री. पंकज लोनबले तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे युवक ,युवती व शालेय विद्यार्थी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुका मध्ये २ ऑक्टोबरला इंटकचे राष्ट्रीय अधिवेशन

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुका मध्ये २ ऑक्टोबरला इंटकचे राष्ट्रीय अधिवेशन अधिवेशनाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजन समितीची बैठक. चंद्रपूर, दि. ९ ऑगस्ट २०२६  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे...

ने. ही. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी तुकाराम मुंढे चा संवाद….

ने. ही. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी तुकाराम मुंढे चा संवाद.... आयुक्तांनी दिला विद्यार्थ्यांना गुरुमंत्र! नागभीड:- मिशन IAS चे विभागीय संचालक श्री. मुनीराज कुथे व सहायक शिक्षक मनोज हेमके यांच्या मार्गदर्शनाखाली...

सौंदर्यकरण हवेच, सोबत फुले दांपत्यांचे स्मारक उभारा.

सौंदर्यकरण हवेच, सोबत फुले दांपत्यांचे स्मारक उभारा. इ अ. भा. समता परिषदेची भावनिक मागणी. मूल:- नगरपरिषदेतर्गत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले चौकाच्या सौंदर्यकरणाकरिता...

1 ऑगस्ट ला शहरात ” घर घर मे आयुर्वेद ” शिबीर.

1 ऑगस्ट ला शहरात " घर घर मे आयुर्वेद " शिबीर. मूल:--- गोर गरीबांना निशुल्क आरोग्य सेवा मिळावी व आयुर्वेद व आयुर्वेदाचे मौलिक महत्व घरोघरी...

राज्य पत्रकार संघ राज्य अध्यक्ष (निवड समिती) पदी प्रा. महेश पानसे.

राज्य पत्रकार संघ राज्य अध्यक्ष (निवड समिती) पदी प्रा. महेश पानसे. मुंबई :- ( विशेष प़तिनिधी) महाराष्ट्र राज्यातील अग्रगण्य व सर्वात मोठ्या पत्रकार संघ असलेल्या महाराष्ट्र...
- Advertisment -spot_img

Breaking News

Popular News