Sunday, July 19, 2026
Google search engine
HomeBusinessNewsगडचिरोलीतील जहाल नक्षलवादी भूपती सह ६० नक्षवादि चे आत्मसमर्पण…

गडचिरोलीतील जहाल नक्षलवादी भूपती सह ६० नक्षवादि चे आत्मसमर्पण…

गडचिरोलीतील जहाल नक्षलवादी भूपती सह ६० नक्षवादि चे आत्मसमर्पण…
नक्षलवाद लवकरच नष्ट होणार – आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

गडचिरोली: १५.१०.२०२५ जहाल नक्षलवादी भूपती व तब्बल ६० नक्षलवाद्यांनी काल मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत गडचिरोली येथे आत्मसमर्पण केले आहे. हा विश्वास, विकास आणि शांततेचा नक्षलवादावरचा विजय आहे.

पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी जी व गृहमंत्री आदरणीय अमित शहा भाई यांच्या मार्गदर्शनात मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस जी यांनी नक्षलवादाविरोधात युद्धपातळीवर मोहीम उभी केली. पोलीस दलांचे आधुनिकीकरण, गुप्तचर यंत्रणांची बळकटी व स्थानिक तरुणांना विकासाच्या प्रवाहात सामील करण्याचे प्रयत्न यामुळे आज गडचिरोलीत नवा बदल दिसत आहे.

देवेंद्रजींनी नक्षलवादग्रस्त भागात रस्ते, शिक्षण, आरोग्य, उद्योग आणि पायाभूत सुविधा यांच्या विकासगंगेचा अविरत प्रवाह सुरू केला. या विकासाच्या माध्यमातून शासन आणि समाज यांच्यातील विश्वासाचे बंध अधिक दृढ झाले, आणि नक्षलवाद्यांना शस्त्राऐवजी शांततेचा मार्ग स्वीकारण्यास प्रेरणा मिळाली.

या ऐतिहासिक घडामोडीसाठी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी, केंद्रीय गृहमंत्री आदरणीय अमितभाई शाह व मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या सक्षम आणि दूरदर्शी नेतृत्वाचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार व्यक्त होत आहे.

काल गडचिरोलीत उमटलेली ही नवी पहाट शांती, विकास, विश्वास आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण असलेल्या भारताचा विजयघोष आहे. गडचिरोली पोलिसांच्या या कार्याला सुद्धा सलाम.

RELATED ARTICLES

ने.हि.विद्यालयात गणवेश वितरण सोहळा उत्साहात संपन्न.

ने.हि.विद्यालयात गणवेश वितरण सोहळा उत्साहात संपन्न. जिद्द व चिकाटी हिच यशाचा गुरुमंत्र ....... अशोकजी भैया नागभीड;--- जिद्द, चिकाटी, परिश्रम व संस्कार यातूनच सुसंस्कृत व यशस्वी विद्यार्थी घडतात....

सनराईज मल्टिपर्पज ऑर्गनायझेशन, मूल तर्फे स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, मूल येथे महाराष्ट्र कृषी दिन साजरा

सनराईज मल्टिपर्पज ऑर्गनायझेशन, मूल तर्फे स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, मूल येथे महाराष्ट्र कृषी दिन साजरा  मूल : - सनराईज मल्टिपर्पज ऑर्गनायझेशन, मूल तर्फे मूल येथील स्वामी...

मूल न. प. ॲक्शन मोडवर…. मान्सूनपूर्व तयारी सुरू.

मूल न. प. ॲक्शन मोडवर.... मान्सूनपूर्व तयारी सुरू.  मूल;-- उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची चणचण दूर सारण्याकरीता न. प. ची जरा दमछाक झाली खरी पण गाडी रूळावर आणून...

श्रीगुरूदेव भक्त डॉ. विठ्ठलराव बोरकुटे यांचे निधन.

श्रीगुरूदेव भक्त डॉ. विठ्ठलराव बोरकुटे यांचे निधन. नागभीड:- वंदनीय तुकडोजी महाराज यांचे सहवासात ज्यांचे बालपण गेले, महाराजांच्या विचारांनी ज्यांनी आयुष्यभर निस्वार्थ पणे रुग्ण सेवा दिली असे नवेगाव...

मूल न. प. ॲक्शन मोडवर….

मूल न. प. ॲक्शन मोडवर.... मान्सूनपूर्व तयारी सुरू. मूल;- उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची चणचण दूर करण्याकरीता न. प. ची जरा दमछाक झाली खरी पण गाडी रूळावर आणून...
- Advertisment -spot_img

Breaking News

Popular News