Saturday, April 18, 2026
Google search engine
HomeArchitectureसावली तालुक्यात युरिया खताचा तुटवडा..

सावली तालुक्यात युरिया खताचा तुटवडा..

सावली तालुक्यात युरिया खताचा तुटवडा
धान पिकावर रोगराईचा प्रादुर्भाव
शेतकरी संकटात

सावली प्रतिनिधी
रोशन बोरकर

सावली– दि. १७/०९/२०२५सावली तालुक्यात धानाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते, शेतीची पेरणी झाल्यानंतर आता धान पिकाच्या वाढीसाठी तसेच इतर रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी युरीया खताची नितांत गरज आहे.
खरीप हंगामातील धानाची रोवणी होऊन दिड महिन्यांचा कालावधी लोटला आहे, आता या धानाच्या वाढीसाठी खताची मात्रा देणे आवश्यक आहे. यासाठी शेतकऱ्यांकडून युरिया खताची प्रचंड मागणी वाढली आहे. मात्र युरियाचा अल्प पुरवठा झाल्याने तालुक्यात खताचा प्रचंड तुटवडा दिसून येत आहे.

कृषी केंद्रात खत उपलब्ध होत नसल्याने शेतकरी संकटात सापडल्याचे चित्र आहे. सद्यस्थितीत हलक्या प्रतीच्या धानाच्या वाढीसाठी खताची मात्रा देणे गरजेचे आहे. यासाठी शेतकरी युरिया खताला सर्वाधिक प्राधान्य दिले जाते, मात्र सावली तालुक्यात युरिया खताची उपलब्धता न झाल्याने खताची प्रचंड टंचाई निर्माण झाली आहे. मात्र केंद्रावरच युरिया खताचा पुरवठा कमी असल्याचे बोलले जाते, त्यातच यांचा फायदा घेत काही कृषी केंद्र धारक वाजवीपेक्षा जास्त भावाने विकत असल्याचे शेतकऱ्यांकडुन बोलले जात आहे.

सावली तालुक्यात जवळपास ३२ हजार हेक्टर शेती आहे,या पैकी २६ हजार हेक्टर शेती वर धान पिकांचे रोवणी व आवत्या करण्यात आले आहे,तर उर्वरित शेतीत कापूस, सोयाबीन लागवड केली आहे. मागील चार -पाच दिवसांपूर्वी तालुक्यात कृषी विभागाच्या मागणी नुसार ८० मेट्रीक टन युरीयाचा पुरवठा करण्यात आला,तर दोन दिवसांपूर्वी विभागाच्या वतीने जास्त मागणी केली असतानाही केवळ १० मेट्रीक टन पुरवठा होऊ शकला. कृषी विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन युरिया खताचा मुबलक पुरवठा करून दिलासा द्यावा, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.


आवश्यक यूरिया व इतर खतांची मागणी करण्यात आलेली आहे. तालुक्यात खते प्राप्त होताच शेतकऱ्यांना उपलब्ध होतील. मात्र तत्पूर्वी शेतकऱ्यांनी तात्कालिक उपाय योजना म्हणून 1 टक्का (10 लिटर पाण्यात 100 ग्राम) युरियाचे द्रावण अथवा नॅनो युरिया 50 मिली 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी. तसेच साठेबाजी, खते तुटवड्याचा गैर फायदा घेत अधिक दर, लिंकिंग, अडवणूक असे गैर प्रकार होत असल्यास शेतकऱ्यांनी तक्रार करावी. संबंधीतावर कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल.

दिनेश पानसे,
तालुका गूण नित्रण अधिकारी, कृषी विभाग सावली

RELATED ARTICLES

ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा सावली तालुका काँग्रेस कमेटीची मागणी

ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा सावली तालुका काँग्रेस कमेटीची मागणी हेक्टरी ५०,००० रु.आर्थिक मदत करण्याची निवेदनातून मागणी सावली प्रतिनिधी रोशन बोरकर सावली:- दिनांक ०७/१०/२०२५...

पावसाचा हाहाकार शेतकरी संकटात …

पावसाचा हाहाकार शेतकरी संकटात … पावसामुळे पंचनामे करणे झाले कठीण चंद्रपूर : या वर्षाला पावसाने हाहाकार माजवला आहे. आज अनेक ठिकाणी पावसाची उघडझाप आहे, पण विदर्भात...

शेतकरी कर्जमाफीबाबत ! ‘या’ शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावीच लागणार, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Agriculture : गेल्या वर्षापासून महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा सातत्याने चर्चेत येतोय. गत वर्षी विधानसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान महायुतीने राज्यातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आम्ही कर्जमाफीची भेट...

सावली तालुका ओला दुष्काळ जाहीर करा खुशाल लोडे यांची मागणी…

सावली तालुका ओला दुष्काळ जाहीर कराशेतकरी विविध सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष खुशाल लोडे यांची मागणी सावली प्रतिनिधी रोशन बोरकर सावली- दि.१७/०९/२०२५ सावली तालुक्यात माहे ऑगस्ट २०२५...
- Advertisment -spot_img

Breaking News

Popular News