Wednesday, April 29, 2026
Google search engine
HomeArchitectureसावली तालुक्यातील कृषी केंद्र संचालकांची सभा

सावली तालुक्यातील कृषी केंद्र संचालकांची सभा

सावली तालुक्यातील कृषी केंद्र संचालकांची सभा

सावली प्रतिनिधी रोशन बोरकर

सावली – दि.२८- ०४-२०२६ तालुक्यातील सर्व कृषि केंद्र संचालकांची नुकतीच पंचायत समितीचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृहात सभेचे आयोजन कृषि विभागाचे वतीने करण्यात येऊन कृषि केंद्राचे कायदेशीर संचालन बाबत मार्गदर्शन करण्यात आले.

प्रसंगी गूण नियंत्रण निरीक्षक कृषि अधिकारी दिनेश पानसे यांनी सर्व कृषि केंद्र धरकांना वेळेत परवाना नूतनीकरण करणे व दर्शनी भागात प्रदर्शित करणे, साठा फलक व दरफलक लावणे, सर्व निविष्ठाचे प्रिंसिपल प्रमाणपत्र परवान्यास जोडून सुधारणा करणे,स्टॉक बुक, विक्री रजिस्टर व लेझर बुक प्रामाणित करून नियमित लिहिणे, विहित प्रपत्रात पक्के बिलबुक ठेऊन सर्व निविष्ठाचे सर्व तपशीलासह व वाजवी दरासह स्वाताची व शेतकऱ्याची स्वाक्षरी घेऊन मूळ प्रत शेतकऱ्यास देणे,खातांची विक्री पॉस मशीन वरून करूनच बिल लिहिणे व पॉस स्लिप बिलाचे स्थळ प्रतिस जोडून ठेवणे, खतांचा भौतिक साठा व पॉस मशीन वरील साठा सारखा ठेवणे, बियाण्याचे गार्ड शॅम्पल ठेवणे, बियाण्याचे माहीती पत्रक शेतकऱ्यांना देणे, लिंकिंग न करणे व नों लिंकिंग फलक लावणे, बॅन असलेले व कालबाह्य झालेले कीटकनाशके व निविष्ठाची विक्री न करणे,खते व बियाणे यांचे सुरळीत व गरजू शेतकऱ्यांनाच वितरण करणे इत्यादी विषयी सूचना व मार्गदर्शन केले.

प्रसंगी तालुका कृषि अधिकारी श्री ललित राऊत यांनी अध्यक्ष पदावरून मार्गदर्शन करतांना धरती माता बचाव अभियान व राऊंडअप (चोरबीटी ) कपास बियाणे बाबत इत्यभूत माहीती दिली व कृषि केंद्र संचालकांच्या संपचे शेतकऱ्यांचे उत्पादनावर व येत्या खरीप हंगामावर विपरीत परिणाम होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन करून रास्त मार्गे व नियमांचे पालन करून व्यवसाय करणाऱ्या केंद्र संचालकांना कृषि विभागाचे पुरेपूर साहाय्य मिळेल असे आश्वासन दिले.

तसेच कृषि निविष्ठा विक्रेते संघांचे अध्यक्ष श्री अजय पोटवार यांनी विनयशिलतेने व्यवसाय करून शेतकरी बांधवांची सेवा करण्याचे व नियंत्रण यंत्रनेस पुरेपूर सहकार्य करण्याचे आवाहन सर्व केंद्र संचालकांना केले. सदर प्रशिक्षणास श्री सचिन सांगिडवार, श्री मोहन जोशी, श्री राकेश काचिनवार, श्री राहुल कोंडबत्तूलवार, श्री प्रशांत वाढई इत्यादी सह तालुक्यातील बहुसंख्य कृषि केंद्र संचालक उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्रवीण वाघमारे यांनी केले.

RELATED ARTICLES

सावली तालुक्यात कृषि विभागाचे खरीप नियोजन

सावली तालुक्यात कृषि विभागाचे खरीप नियोजन सावली प्रतिनिधी रोशन बोरकर सावली - दि. 24/04/2026 खरीप हंगाम तोंडावर असल्याने शेतकरी व शासनाचे कृषि विभाग खरीप हंगाम पूर्व तयारीचे...

ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा सावली तालुका काँग्रेस कमेटीची मागणी

ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा सावली तालुका काँग्रेस कमेटीची मागणी हेक्टरी ५०,००० रु.आर्थिक मदत करण्याची निवेदनातून मागणी सावली प्रतिनिधी रोशन बोरकर सावली:- दिनांक ०७/१०/२०२५...

पावसाचा हाहाकार शेतकरी संकटात …

पावसाचा हाहाकार शेतकरी संकटात … पावसामुळे पंचनामे करणे झाले कठीण चंद्रपूर : या वर्षाला पावसाने हाहाकार माजवला आहे. आज अनेक ठिकाणी पावसाची उघडझाप आहे, पण विदर्भात...

शेतकरी कर्जमाफीबाबत ! ‘या’ शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावीच लागणार, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Agriculture : गेल्या वर्षापासून महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा सातत्याने चर्चेत येतोय. गत वर्षी विधानसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान महायुतीने राज्यातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आम्ही कर्जमाफीची भेट...

सावली तालुका ओला दुष्काळ जाहीर करा खुशाल लोडे यांची मागणी…

सावली तालुका ओला दुष्काळ जाहीर कराशेतकरी विविध सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष खुशाल लोडे यांची मागणी सावली प्रतिनिधी रोशन बोरकर सावली- दि.१७/०९/२०२५ सावली तालुक्यात माहे ऑगस्ट २०२५...
- Advertisment -spot_img

Breaking News

Popular News