ट्रॅव्हल्स युनियनची कार्यकारणी गठीत
शाम उराडे अध्यक्षपदी तर राजुभाऊ कावळे यांची सचिवपदी अविरोध निवड
मुल: सामाजिक कार्यात नेहमीच सहकार्य असणारे चंद्रपूर-गडचिरोली ट्रॅव्हल्स युनियनची कार्यकारणी नुकतीच मूल येथे गठीत करण्यात आली. समाजसेवा करणारे ह्या कार्यकारणीत अध्यक्षपदी शाम उराडे व सचिवपदी राजु कावळे यांची अविरोध निवड करण्यात आली.
मूल येथील कर्मवीर महाविद्यालयाच्या पटांगणावर 10 नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत नविन कार्यकारणी गठीत करण्यात आली. याकार्यकारणीत शाम उराडे यांची अध्यक्षपदी तर सचिवपदी राजु कावळे यांची निवड करण्यात आली, उपाध्यक्षपदी चंदन पाल, सहसचिवपदी साई गुंडोजवार, अमजद अल्ली, कोषाध्यक्षपदी मोसीम खान, सहकोषाध्यक्षपदी पप्पु शेख, संघटकपदी काजु खोब्रागडे, मार्गदर्शक अविनाश वरगंटीवार माजी सभापती नगरपरिषद गडचिरोली, सदस्यपदी अन्नु दिक्षीत, अभिजीत कावळे, मार्कंड कापगते, दुर्वेश चरडे, चंदुभाऊ बोहरा, महेश जेंगठे, लुकेश अडपल्लीवार, फिरोजभाई, नरेंद्र तिवाडे, योगेश दुर्योधन, राहुल कोकावार, दिपक महाडोळेे यांची अविरोध निवड करण्यात आली आहे.
नवनियुक्त कार्यकारणीचे माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. नवनियुक्त कार्यकारणीचे सर्वत्र अभिनंदन व शुभेच्छा करण्यात येत आहे.



