Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeBusinessNews२५ लाखाचे फुले चौकाचे सौंदर्यीकरण रखडले......

२५ लाखाचे फुले चौकाचे सौंदर्यीकरण रखडले……

२५ लाखाचे फुले चौकाचे सौंदर्यीकरण रखडले……

नगरपरिषदच ठरली अडसर?

मुल : शहरातील महात्मा फुले चौकाचे सौदयींकरण ठरले. एजन्सी निश्चित झाली. बांधकाम सुरू करण्याकरीता वर्क ऑर्डर झाला. सा. बा. विभाग काम करायला चातकासारखी वाट पहात आहे. मात्र ९ महिने लोटायला येऊनही न. प. अखत्यारीत असलेले सदर सौदयींकरण न. प. च्या बेजबाबदार पणाने रखडले असून माळी समाज प़चंड संतापला आहे. सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक तुकाराम गुरनूले यांनी उपोषणाची धमकी देऊनही न. प. प्रशाशनाच्या नाकावरील माशी न उडाल्याने प्रकरण आमदार मुंगटीवार यांचेकडे गेले, माळी समाजाचे वतीने समता परिषदेचे राकेश मोहुलै यांनी आ. मुनगंटीवार यांना निवेदन दिले.
आमदारांनी न. प. मुख्याधिकारी यांचे कान टोचले मात्र अतिक्रमीत जागेवर न. प. चाच असलेला बिऱ्हाड न. प. केव्हा हटव़ेल व सौदयींकरण केव्हा सुरू होईल याची शहरवासीय वाट पहात आहेत.
प्रशाशक काळात महात्मा फुले चौकाचे सौदयींकरण करण्याकरीता 25 लक्ष रूपये प्रस्तावीत झाले होते. चौकाचे सौदयींकरण करण्याकरीता आजूबाजूचा बिऱ्हाड हटविणे आवश्यक आहे. तसे अनेकदा सा. बा. विभागाने न. प. ला कळविले आहे.
कल्याणी मजूर संस्थेला सदर काम देण्यात आले आहे. 31आक्टो.2025 ला कामाचे वर्क ऑर्डर झाले. जवळपास 9 महिने होऊनही न. प. चे बिऱ्हाड न उठल्याने सौदयींकरणाला सुरू झालेली नाही.
महात्मा फुले चौक परिसरात न. प. चा आर.ओ, एक शेड व काही न. प. ने लावलेल्या खुर्चीचा समावेष आहे. 9 महिने
लोटूनही सौदयींकरणाला न. प. चाच अडथळा कारणीभूत ठरला आहे हे विशेष. या सौदयींकरणा बाबत माळी समाजाची मोठी उत्कंठा आहे. भा. ज. पा. युवा मोर्चा उपाध्यक्ष सुरज मांदाडे यांनी सुदधा पाठपुरावा केला होता मात्र न. प. प़शाशनाची मुजोरी कायम राहिल्याचीच चर्चा राहीली.
RELATED ARTICLES

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुका मध्ये २ ऑक्टोबरला इंटकचे राष्ट्रीय अधिवेशन

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुका मध्ये २ ऑक्टोबरला इंटकचे राष्ट्रीय अधिवेशन अधिवेशनाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजन समितीची बैठक. चंद्रपूर, दि. ९ ऑगस्ट २०२६  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे...

ने. ही. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी तुकाराम मुंढे चा संवाद….

ने. ही. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी तुकाराम मुंढे चा संवाद.... आयुक्तांनी दिला विद्यार्थ्यांना गुरुमंत्र! नागभीड:- मिशन IAS चे विभागीय संचालक श्री. मुनीराज कुथे व सहायक शिक्षक मनोज हेमके यांच्या मार्गदर्शनाखाली...

सौंदर्यकरण हवेच, सोबत फुले दांपत्यांचे स्मारक उभारा.

सौंदर्यकरण हवेच, सोबत फुले दांपत्यांचे स्मारक उभारा. इ अ. भा. समता परिषदेची भावनिक मागणी. मूल:- नगरपरिषदेतर्गत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले चौकाच्या सौंदर्यकरणाकरिता...

1 ऑगस्ट ला शहरात ” घर घर मे आयुर्वेद ” शिबीर.

1 ऑगस्ट ला शहरात " घर घर मे आयुर्वेद " शिबीर. मूल:--- गोर गरीबांना निशुल्क आरोग्य सेवा मिळावी व आयुर्वेद व आयुर्वेदाचे मौलिक महत्व घरोघरी...

राज्य पत्रकार संघ राज्य अध्यक्ष (निवड समिती) पदी प्रा. महेश पानसे.

राज्य पत्रकार संघ राज्य अध्यक्ष (निवड समिती) पदी प्रा. महेश पानसे. मुंबई :- ( विशेष प़तिनिधी) महाराष्ट्र राज्यातील अग्रगण्य व सर्वात मोठ्या पत्रकार संघ असलेल्या महाराष्ट्र...
- Advertisment -spot_img

Breaking News

Popular News