Thursday, June 4, 2026
Google search engine
HomeArchitectureसावली तालुक्यात कृषि विभागाचे खरीप नियोजन

सावली तालुक्यात कृषि विभागाचे खरीप नियोजन

सावली तालुक्यात कृषि विभागाचे खरीप नियोजन

सावली प्रतिनिधी रोशन बोरकर

सावली – दि. 24/04/2026
खरीप हंगाम तोंडावर असल्याने शेतकरी व शासनाचे कृषि विभाग खरीप हंगाम पूर्व तयारीचे कामात व्यस्त आहेत. शेतकरी अधिक उत्पादन देणाऱ्या नवीन व दर्जेदार वानांची विचारपूस करून शोध घेतांना दिसत आहेत. तसेच चालू वर्षात जागतिक युद्धजन्य परिस्थिमुळे रासायनिक खते योग्य वेळी व हव्या त्या प्रमाणात मिळतील की नाही या काळजीत आहेत. तर शासनाचे कृषि विभाग येत्या खरीपात अधिक उत्पादन येण्याकरिता विविध तंत्रज्ञान व योजना अवलंबाचे नियोजन करण्याचे तयारीत आहे. खरीपात बियाणे व खते यांची कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यारीता कृषि विभागाने नियोजनत्मक आराखडा तयार केला आहे.

तसेच खते, बियाणे व कीटकनाशके विक्रेते यांनी नियमानुसार शेतकऱ्यांना योग्य प्रकारे, खंडितपणे दर्जेदार व माफक कृषि निविष्ठा पुरवठा व विक्री करने करीता कृषि केंद्र तपासण्यांचे कामास जोमाने सुरुवात केली आहे. तालुक्यात 70 हुन अधिक कृषि केंद्र नोंदनीकृत आहेत मात्र 35 ते 40 कृषि केंद्रे नियमित कार्यरत आहेत. अश्या सर्व कृषि केंद्राची ते नियमांचे पालन करून शेतकऱ्यांना सेवा देतात की नाही, याची चौकशी हंगामापूर्वी करण्यात येत असून दोषी आढळलेल्या कृषि केद्रांवर कार्यवाही प्रस्तावित करण्यात येत आहे. 1 एप्रिल पासून 25 कृषि केंद्राच्या तपासण्या करण्यात आल्या असून दोषी आढळलेल्या 7 कृषि केंद्रान्ना नोटीस बजावण्यात आले असल्याची माहीती तालुका गुण नियंत्रण निरीक्षक दिनेश पानसे असून शेतकऱ्यांनी कृषि निविष्ठाची खरेदी काळजीपूर्वक पुरेपूर चौकशी व खरी करून नोंदणीकृत कृषि केंद्रानातून पक्या बिलावरच करावी, कोणतेही लिंकिंगला स्पष्ट नकार द्यावा व कोणतेही दुर्वेहार व तक्रार असल्यास कृषि विभागास निसंकोच कळवावे असे आवाहन केले आहे.
तसेच येत्या खरीपाकरीता योग्य त्या प्रमाणात खते उपलब्ध होणार असून प्रत्येक ग्राम पंचायत स्तरावर ग्राम दक्षता समिती स्थापन करण्यात आली असून त्याद्वारे खते वितरनावर लक्ष ठेवण्यात येणार आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी राषयनिक खातांचे बाबतीत कोणतेही चिंता न करता नियोजन पूर्वक शिफारशीत मात्रेच्या प्रमाणात व योग्य वेळी पिकांना खते वापर करावे तसेच कोनीही खातांचा साठा किंवा जमाखोरी करू नये असे सांगितले आहे.

RELATED ARTICLES

सावली तालुक्यात खरीप तक्रार निवारण तथा मार्गदर्शन कक्षाची स्थापना

सावली तालुक्यात खरीप तक्रार निवारण तथा मार्गदर्शन कक्षाची स्थापना सावली प्रतिनिधी रोशन बोरकर सावली :- दिनांक 25/05/2026 खरीप हंगाम सुरु झाले असून तालुक्यातील शेतकरी हंगामाचे अनुषंगाने कामाला...

सावली तालुक्यातील कृषी केंद्र संचालकांची सभा

सावली तालुक्यातील कृषी केंद्र संचालकांची सभा सावली प्रतिनिधी रोशन बोरकर सावली - दि.२८- ०४-२०२६ तालुक्यातील सर्व कृषि केंद्र संचालकांची नुकतीच पंचायत समितीचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृहात...

ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा सावली तालुका काँग्रेस कमेटीची मागणी

ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा सावली तालुका काँग्रेस कमेटीची मागणी हेक्टरी ५०,००० रु.आर्थिक मदत करण्याची निवेदनातून मागणी सावली प्रतिनिधी रोशन बोरकर सावली:- दिनांक ०७/१०/२०२५...

पावसाचा हाहाकार शेतकरी संकटात …

पावसाचा हाहाकार शेतकरी संकटात … पावसामुळे पंचनामे करणे झाले कठीण चंद्रपूर : या वर्षाला पावसाने हाहाकार माजवला आहे. आज अनेक ठिकाणी पावसाची उघडझाप आहे, पण विदर्भात...

शेतकरी कर्जमाफीबाबत ! ‘या’ शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावीच लागणार, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Agriculture : गेल्या वर्षापासून महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा सातत्याने चर्चेत येतोय. गत वर्षी विधानसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान महायुतीने राज्यातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आम्ही कर्जमाफीची भेट...
- Advertisment -spot_img

Breaking News

Popular News