Wednesday, September 30, 2026
Google search engine
HomeBusinessNewsसावली येथे १५ मार्च ला विनामूल्य मोतीबिंदू डोळे तपासणी शिबिर

सावली येथे १५ मार्च ला विनामूल्य मोतीबिंदू डोळे तपासणी शिबिर

सावली येथे १५ मार्च ला विनामूल्य मोतीबिंदू डोळे तपासणी शिबिर

सावली प्रतिनिधी रोशन बोरकर

सावली :- दिनांक १२/०३/२०२६
सावली येथे दिनांक १५ मार्च २०२६ ला लॉयन आय सेंटर सेवाग्राम वर्धा, लॉयन क्लब चंद्रपूर महावीर इंटरनॅशनल चंद्रपूर केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने महावीर इंटरनॅशनल सेंटर सावली आयोजित विनामूल्य मोतीबिंदू डोळे तपासणी शिबिर स्थळ विश्वशांती विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय सावली येथे १५ मार्च ला शिबीर आयोजित केला आहे. महावीर इंटरनॅशनल सेंटर सावली यांच्या माध्यमाने मागील २४ वर्षापासून अविरत जनसेवेचे कार्य सुरू आहे.

मागील वर्षी मोतीबिंदू डोळे तपासणी शिबिरात ५० वर्षा वरील महिला आणि पुरुष एकूण ५३७ रुग्णांनी लाभ घेतला होता त्यापैकी १७० रुग्णाची निवड झाली, निवड झालेल्या रुग्णांची मोफत भिंगारोपण शस्त्रक्रिया सेवाग्राम येथे सेवाग्राम मेडिकल कॉलेजच्या नेत्रतज्ञांच्या हस्ते करण्यात आला.

महावीर इंटरनॅशनल सेंटर सावली तर्फे *”मानव हिच ईश्वर सेवा”* समजून दरवर्षी विनामूल्य मोतीबिंदू डोळे तपासणी शिबिर आयोजित करण्यात येतो. कित्येक गरीब आणि निराधार लोकांना याचा लाभ प्रत्यक्ष होताना दिसत आहे. त्यामुळे अनेक स्तरातून महावीर इंटरनॅशनल सेंटर सावलीच्या सर्व पदाधिकारी आणि सर्व संचालकांचे कौतुक आणि अभिनंदन केल्या जात आहे. तसेच यावर्षी सुध्दा मोतीबिंदू डोळे तपासणी शिबिर यशस्वी करण्याकरिता महावीर इंटरनॅशनल सेंटर सावलीचे विभागीय संघटक, पदाधिकारी व संचालक प्रचार आणि प्रसार करीत आहेत.व कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता अथक परिश्रम घेतले जात आहे. तरी जास्तीत जास्त लोकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे महावीर इंटरनॅशनल सेंटर सावली यांच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

तालुकास्तरीय शालेय स्पर्धा परीक्षापूर्व मार्गदर्शन शिबिर

तालुकास्तरीय शालेय स्पर्धा परीक्षापूर्व मार्गदर्शन शिबिर मूल- जवाहर नवोदय परीक्षा मार्गदर्शन केंद्र चंद्रपूर अंतर्गत मूल तालुक्यातील इयत्ता चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षा तसेच इयत्ता पाचवी...

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुका मध्ये २ ऑक्टोबरला इंटकचे राष्ट्रीय अधिवेशन

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुका मध्ये २ ऑक्टोबरला इंटकचे राष्ट्रीय अधिवेशन अधिवेशनाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजन समितीची बैठक. चंद्रपूर, दि. ९ ऑगस्ट २०२६  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे...

ने. ही. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी तुकाराम मुंढे चा संवाद….

ने. ही. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी तुकाराम मुंढे चा संवाद.... आयुक्तांनी दिला विद्यार्थ्यांना गुरुमंत्र! नागभीड:- मिशन IAS चे विभागीय संचालक श्री. मुनीराज कुथे व सहायक शिक्षक मनोज हेमके यांच्या मार्गदर्शनाखाली...

सौंदर्यकरण हवेच, सोबत फुले दांपत्यांचे स्मारक उभारा.

सौंदर्यकरण हवेच, सोबत फुले दांपत्यांचे स्मारक उभारा. इ अ. भा. समता परिषदेची भावनिक मागणी. मूल:- नगरपरिषदेतर्गत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले चौकाच्या सौंदर्यकरणाकरिता...

1 ऑगस्ट ला शहरात ” घर घर मे आयुर्वेद ” शिबीर.

1 ऑगस्ट ला शहरात " घर घर मे आयुर्वेद " शिबीर. मूल:--- गोर गरीबांना निशुल्क आरोग्य सेवा मिळावी व आयुर्वेद व आयुर्वेदाचे मौलिक महत्व घरोघरी...
- Advertisment -spot_img

Breaking News

Popular News