Sunday, August 9, 2026
Google search engine
HomeBusinessNews“छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान” पोंभुर्णा तालुक्यात येत्या १४ मार्च पासून राबविण्यात...

“छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान” पोंभुर्णा तालुक्यात येत्या १४ मार्च पासून राबविण्यात येत आहे.

“छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान” पोंभुर्णा तालुक्यात येत्या १४ मार्च पासून राबविण्यात येत आहे.

पोंभुर्णा, दि. २ मार्च २०२६:

 

महाराष्ट्र शासन यांच्या निर्देशानुसार उपअधीक्षक भूमी अभिलेख, पोंभुर्णा (जि. चंद्रपूर) कार्यालयामार्फत तालुक्यात “छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान” राबविण्यात येणार आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश नागरिकांना महसूल विषयक सेवा पारदर्शक, जलद आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देणे हा आहे.

अभियानांतर्गत तालुक्यातील विविध ठिकाणी सकाळी ११.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत विशेष महसूल शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरांमध्ये जमीन अभिलेख दुरुस्ती, फेरफार नोंदी, नकाशे, प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे तसेच तांत्रिक अडचणींचे तात्काळ निराकरण करण्यात येणार आहे.

📅 नियोजित शिबिरांचे दिनांक:
• १४ फेब्रुवारी २०२६ स्थळ:-ग्रामपंचायत परिसर उमरी पोतदार
• १० मार्च २०२६ स्थळ:- ग्रामपंचायत सभागृह नवेगाव मोरे
• १७ मार्च २०२६ स्थळ:- ग्रामपंचायत सभागृह चिंतलढाबा
• ०८ एप्रिल २०२६ स्थळ:- राजराजेश्वर मंदिर सभागृह पोंभुर्णा

संबंधित अधिकारी श्रीमती माधुरी गोमासे उपाधिक्षक भूमी अभिलेख पोंभुर्णा , श्री संदिप मा भंडारे निमतानदार शिबिरस्थळी उपस्थित राहून नागरिकांच्या तक्रारी व अर्ज स्वीकारणार असून आवश्यक मार्गदर्शन करणार आहेत.

तालुक्यातील सर्व नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह नियोजित तारखांना उपस्थित राहून या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपअधीक्षक भूमी अभिलेख, पोंभुर्णा कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

जारीकर्ते: माधुरी गोमासे
उपअधीक्षक भूमी अभिलेख, पोंभुर्णा
जि. चंद्रपूर

RELATED ARTICLES

ने. ही. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी तुकाराम मुंढे चा संवाद….

ने. ही. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी तुकाराम मुंढे चा संवाद.... आयुक्तांनी दिला विद्यार्थ्यांना गुरुमंत्र! नागभीड:- मिशन IAS चे विभागीय संचालक श्री. मुनीराज कुथे व सहायक शिक्षक मनोज हेमके यांच्या मार्गदर्शनाखाली...

सौंदर्यकरण हवेच, सोबत फुले दांपत्यांचे स्मारक उभारा.

सौंदर्यकरण हवेच, सोबत फुले दांपत्यांचे स्मारक उभारा. इ अ. भा. समता परिषदेची भावनिक मागणी. मूल:- नगरपरिषदेतर्गत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले चौकाच्या सौंदर्यकरणाकरिता...

1 ऑगस्ट ला शहरात ” घर घर मे आयुर्वेद ” शिबीर.

1 ऑगस्ट ला शहरात " घर घर मे आयुर्वेद " शिबीर. मूल:--- गोर गरीबांना निशुल्क आरोग्य सेवा मिळावी व आयुर्वेद व आयुर्वेदाचे मौलिक महत्व घरोघरी...

राज्य पत्रकार संघ राज्य अध्यक्ष (निवड समिती) पदी प्रा. महेश पानसे.

राज्य पत्रकार संघ राज्य अध्यक्ष (निवड समिती) पदी प्रा. महेश पानसे. मुंबई :- ( विशेष प़तिनिधी) महाराष्ट्र राज्यातील अग्रगण्य व सर्वात मोठ्या पत्रकार संघ असलेल्या महाराष्ट्र...

श्रीगुरूदेव आदिवासी सेवा छात्रालय अध्यक्षपदी प्रा. महेश पानसे.

श्रीगुरूदेव आदिवासी सेवा छात्रालय अध्यक्षपदी प्रा. महेश पानसे. नागभीड:-- वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पावन हस्ते सुभारंभ करण्यात आलेल्या श्रीगुरूदेव आदिवासी सेवा छात्रालय अध्यक्षपदी प़ा. महेश...
- Advertisment -spot_img

Breaking News

Popular News