नगरपरिषद निवडणूक, आज फैसला….. नेत्यांचे ” षटकार ” तर मतदारांचे “फटकार “…….. !
राजकारण
प्रा. महेश पानसे.
मुल : जिल्ह्यातील अनेक नगरपरिषदांच्या नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या भाग्याचा आज फैसला होणार. गत पंधरवाडा प़चाराचे भोंगे, लहान मोठया नेत्याचे गळा फाटेस्तोवर रंगलेल्या
प़चारसभा , सेलीब़ेटींची फुदकन यांनी गाजला. मात्र यंदा निवडणूक प़चारा दरम्यान मतदारांनी अनेक विषयाला धरून लावलेले “फटकार”विशेष चचैत राहिले
घुगुस नगरपरिषद वगळता इतर 9 नगरपरिषद व 1 नगरपंचायत निवडणूक आज होऊ घातली आहे. यातील नगराध्यक्ष व नगरसेवक यांच्या भविष्याचा फैसला आज मतदार करतील. दरम्यान विविध राजकीय पक्ष व अपक्षांनी
आपापल्या पद्धतीने प़चाराचा धुमाळी चालविली. मतदारांना रिझविण्यासाठी वेगवेगळे फंडे वापरण्यात आले. जिल्ह्यातील
आमदारांनी आपापल्या क्षेत्रातील न. प. निवडणुकांची धुरा सांभाळली. जवळपास साऱ्या नगरपरिषदेमध्ये कांग्रेस व भा. ज. पा. प़ामुख्याने आमने सामने उभे टाकणार हे निश्चित दिसते. काही ठिकाणी अपक्ष वा इतर पक्षांची मंडळी मोठया राजकीय पक्षांच्या गेम बिघडवू शकेल अशी स्थिती चचैत आहे.
नगरपरिषद निवडणूक स्थानिक विषयावर व संबंधांवर लढली जात असल्याने आपापल्या सभांमध्ये नेत्यांनी गळा बसेपावेतो
“षटकार” ठोकले मात्र यंदा मतदारांनी भूत काळाची गोळाबेरीज
करून अनेक ठिकाणी उमेदवारांनी “हुडहुडी ” वाढविण्याचे चित्र व चचाॅ राहीली. ही यंदाची प़चाराची विशेषता राहीली आहे.
निवडणूकी पुवॅ व दरम्यान मूल व वरोरा येथील काही स्थानीक
नेत्यांनी इकडून तिकडे उडया मारल्याने राजकीय पक्षांची गोची
झाल्याची चर्चा सुद्धा रंगल्या व या विषयाला धरून मतदारांच्या चार गोष्टी उमेदवारांना ऐकावे लागले आहे. जिल्ह्यातील 6 पैकी 5 आमदार भा. ज. पा. चे आहेत. प़चारा दरम्यान या पक्षाला नेत्यांची कमतरता भासली नसली तरी आपापल्या क्षेत्राबाहेर
कुणी घुसखोरी केलेली दिसली नाही. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मूल व बललारशा न. प.निवडणूक एकहाती सांभाळली. मूल न. प. निवडणूक आधी सुधीरभाऊ नंतर उमेदवार असा प़चार रंगला. ब़म्हपूरी न. प. निवडणूक प़चारात विजय वडेट्टीवार कांग्रेस चे म्होरके राहीले. मूल न. प. प़चाराची रणनिती वडेट्टीवारांनीच आखली.
मूल न. प. बाबत जिल्ह्यात उत्सुकता.
निवडणूकी आधी भा. ज. पा. ला रामराम करून कांग्रेस वासी झालेल्या माजी सभापती प़शात समथॅ यांनी कांग्रेस प़वेश करून आपल्या श्रीमती ला नगराध्यक्ष पदाकरिता मैदानात उतरविल्याने ठकराव जोरदार असल्याची चर्चा आहे. भा. ज. पा. ने सुद्धा नगराध्यक्ष पदाकरिता तोडीचा उमेदवार म्हणून किरण कापगते यांना मैदानात उतरविल्याने कांग्रेस जणांनी बारीक लक्ष ठेवून प़चार केल्याचे बघावयास मिळाले.
कांग्रेस व भा. ज. पा. या दोन्ही पक्षांनी मूल न. प. करीता चांगले उमेदवार मैदानात सोडल्याने शहरातील मतदारांच्या अपेक्षा सुद्धा उंचावल्या आहेत. ही यंदाची मूल न. प. ची विशेषतः आहे.
न. प. निवडणूक स्थानीक असते. अनेक उमेदवार ” रिपीट” होतात. मूल न. प. करीता आ. सुधीर मुनगंटीवार यांनी भरपूर फंड ओढून आणला मात्र गुणवत्तेबाबत ओरड कायम राहिली. फंडाचे योग्य व्यय झाला की अपव्यय यावर मतदार यंदा जास्तच ओरड लेले दिसते. विरोधी पक्ष म्हणून कांग्रेस जण यावर बोलतांना दिसले नसल्याने दोन्ही पक्षांना मतदारांची भावना धारेवर धरणारी दिसली. 28 कोटी रूपयाची पाणी पुरवठा योजना सपशेल खड्डयात गेली यावर मात्र नेत्यांना नसलेली खंत मतदारांना डिवचणारी दिसली. मात्र कांग्रेस च्या एकता समथॅ व भा. ज. पा. च्या किरण कापगते दोन्ही नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भविष्यात नगरवासियांना न्याय
देण्यास सक्षम उमेदवार असल्याची प़चारा दरम्यान मोठी चचाॅ राहिली हे विशेष.

राजकारण प्रा. महेश पानसे ✍️


