Friday, October 2, 2026
Google search engine
HomeBusinessNewsनुकसानग्रस्त शेतकऱ्या ला आमदार विजय वडेट्टीवार यांचा मदतीचा हात

नुकसानग्रस्त शेतकऱ्या ला आमदार विजय वडेट्टीवार यांचा मदतीचा हात

नुकसानग्रस्त शेतकऱ्या ला आमदार विजय वडेट्टीवार यांचा मदतीचा हात

आकापूर येथील घटना २ एकर शेतीचे पुंजने आगीत जळून खाक

सावली प्रतिनिधी रोशन बोरकर

सावली – दिनांक ०६/१२/२०२५ सावली तालुक्यातील मौजा. आकापूर येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत पांडुरंग यादव चालीरवार या गरीब शेतकऱ्याच्या दोन एकर शेतीच्या पुंजन्याला अचानक लागलेल्या आगीने मोठे नुकसान झाले. शेतीत तयार झालेले पिक पूर्णपणे जळून खाक झाले असून शेतकरी पूर्णपणे हतबल झाला आहे.शेतीशिवाय दुसरा कोणताही जोडधंदा नसल्याने शेतकरी पांडुरंग यादव चालीरवार यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळलेले आहे.

घटनेची माहिती सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहने व महिला तालुका अध्यक्ष उषा भोयर यांनी काँग्रेस विधिमंडळ गटनेते, लोकलेखा समिती अध्यक्ष म.रा.तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजयभाऊ वडेट्टीवार साहेब यांना माहिती दिली.आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांनी पुढाकार घेत शेतकऱ्याला तात्काळ आर्थिक मदत जाहीर केली. आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांनी सावली तालुका काँग्रेस कमिटीच्या एका शिष्टमंडळाला पाठवून शेतकऱ्याच्या परिस्थितीची पाहणी केली.सदर शिष्टमंडळाने पांडुरंग यादव चालीरवार यांना दिलासा दिला आणि भविष्यातही आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

शेतकऱ्याचे पिक होण्याच्या उंबरठ्यावर असतानाच झालेल्या या नुकसानीमुळे कुटुंबावर मोठे संकट कोसळले होते. मात्र आमदारांच्या मदतीमुळे शेतकऱ्याला काहीसा दिलासा मिळाला आहे.स्थानिक नागरिकांनीही ही मदत वेळेत मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले असून अशा प्रसंगात लोकप्रतिनिधींनी पुढे येण्याचे कौतुक केले आहे.

याप्रसंगी आर्थिक मदत देताना सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहने,महिला तालुका अध्यक्ष उषा भोयर,सरपंच ममता गुरुनुले,गेवरा बुज येथील उपसरपंच टिलक वाढणकर,ग्राम काँग्रेस अध्यक्ष आकापूर देविदास बारसागडे,जेष्ठ कार्यकर्ते विजय खोब्रागडे,जास्वंदा खोब्रागडे,संदीप सायत्रावार आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

तालुकास्तरीय शालेय स्पर्धा परीक्षापूर्व मार्गदर्शन शिबिर

तालुकास्तरीय शालेय स्पर्धा परीक्षापूर्व मार्गदर्शन शिबिर मूल- जवाहर नवोदय परीक्षा मार्गदर्शन केंद्र चंद्रपूर अंतर्गत मूल तालुक्यातील इयत्ता चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षा तसेच इयत्ता पाचवी...

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुका मध्ये २ ऑक्टोबरला इंटकचे राष्ट्रीय अधिवेशन

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुका मध्ये २ ऑक्टोबरला इंटकचे राष्ट्रीय अधिवेशन अधिवेशनाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजन समितीची बैठक. चंद्रपूर, दि. ९ ऑगस्ट २०२६  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे...

ने. ही. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी तुकाराम मुंढे चा संवाद….

ने. ही. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी तुकाराम मुंढे चा संवाद.... आयुक्तांनी दिला विद्यार्थ्यांना गुरुमंत्र! नागभीड:- मिशन IAS चे विभागीय संचालक श्री. मुनीराज कुथे व सहायक शिक्षक मनोज हेमके यांच्या मार्गदर्शनाखाली...

सौंदर्यकरण हवेच, सोबत फुले दांपत्यांचे स्मारक उभारा.

सौंदर्यकरण हवेच, सोबत फुले दांपत्यांचे स्मारक उभारा. इ अ. भा. समता परिषदेची भावनिक मागणी. मूल:- नगरपरिषदेतर्गत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले चौकाच्या सौंदर्यकरणाकरिता...

1 ऑगस्ट ला शहरात ” घर घर मे आयुर्वेद ” शिबीर.

1 ऑगस्ट ला शहरात " घर घर मे आयुर्वेद " शिबीर. मूल:--- गोर गरीबांना निशुल्क आरोग्य सेवा मिळावी व आयुर्वेद व आयुर्वेदाचे मौलिक महत्व घरोघरी...
- Advertisment -spot_img

Breaking News

Popular News