Monday, April 27, 2026
Google search engine
HomeBusinessELECTiON TiMESनिधी नसताना दिवसभर नगर परिषदेत नुसतं बसून कांय करणार , सुधीरभाऊंच्या निधीनेच...

निधी नसताना दिवसभर नगर परिषदेत नुसतं बसून कांय करणार , सुधीरभाऊंच्या निधीनेच विकास शक्य , जनतेमध्ये कुजबुज

निधी नसताना दिवसभर नगर परिषदेत नुसतं बसून कांय करणार , सुधीरभाऊंच्या निधीनेच विकास शक्य , जनतेमध्ये कुजबुज

मूल
नगरपरिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षपदासाठी एकूण पाच उमेदवार रिंगणात असले तरी खरी टक्कर भाजपाच्या प्रा.डॉ. किरण किशोर कापगते- बोरकर आणि काँग्रेसच्या सौ. एकता प्रशांत समर्थ यांच्यातच असल्याचे राजकीय वर्तुळात स्पष्ट दिसत आहे.
काँग्रेसतर्फे असा सवाल उपस्थित करण्यात आला की, “महाविद्यालयीन अध्यापनाच्या कामात व्यस्त असणाऱ्या किरण कापगते नगराध्यक्ष झाल्यानंतर शहरासाठी वेळ कसा देणार?” अध्यापन करून नप, जीप, आमदारकी सांभाळणारे अनेक उदाहरण आहेत, उलट निधीच जर नसली तर नुसतं खाली पिली नगर परिषदेत कुणी नुसतं बसुन काय करणार, प्रा कापगते या आजपर्यंत सकाळ पाळीच महाविद्यालय सांभाळून सामाजिक कार्य करतच आहेत, त्यामुळे महाविद्यालया नंतरचा संपूर्ण वेळ त्या नगरपरिषद कामकाजासाठी देऊ शकतात. अनेक वर्षांपासून त्या सामाजिक,जनसेवा व लोकसेवा क्षेत्रात सक्रिय आहेत आणि वेळेचे नियोजन पद्धतशीर करत आल्या आहेत. त्यामुळे वेळेचे नियोजन करून त्या नगरपरिषदेसाठी प्रभावीपणे काम करू शकतील, असा त्यांचा विश्वास आहे.
याउलट, काँग्रेसच्या उमेदवार सौ. एकता समर्थ या संपूर्ण वेळ नगरपरिषदेला देण्यास तयार असल्या तरी *“शासनाकडून पुरेसा निधीच मिळणार नसेल तर वेळ देऊनही विकासकामे कशी होणार?”* असा प्रतिप्रश्न भाजपकडून उपस्थित केला जात आहे. केंद्र, राज्य आणि स्थानिक आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे मार्गदर्शन असताना नगरपरिषदेस निधीअभावी कामे ठप्प राहतील, हे वास्तव पटण्याजोगे नसल्याचेही भाजप कार्यकर्त्यांचे म्हणणे.
म्हणूनच, *“संपूर्ण वेळ देणारी,पण निधीअभावी विकास करू न शकणारी नगराध्यक्षा योग्य”*, की सकाळचा काही वेळ महाविद्यालयासाठी राखून *”उर्वरित वेळ नगरपरिषदेसाठी देत विकास घडवू शकणारी, अनुभवी व सक्षम उमेदवार किरण कापगते योग्य?”* असा निर्णय आता मतदार जनतेलाच घ्यायचा आहे.
शहरातील वातावरण मात्र याच चर्चेने तापले असून कोणत्या उमेदवारावर जनता अंतिम विश्वास ठेवते हे मतदानातूनच स्पष्ट होणार आहे.

RELATED ARTICLES

नगरपरिषद निवडणूक, आज फैसला. नेत्यांचे ” षटकार ” तर मतदारांचे “फटकार “…….. !

नगरपरिषद निवडणूक, आज फैसला..... नेत्यांचे " षटकार " तर मतदारांचे "फटकार "........ ! राजकारण प्रा. महेश पानसे. मुल : जिल्ह्यातील अनेक नगरपरिषदांच्या नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या भाग्याचा आज...

मुल नगर परिषद निवडणूक-2025.  “स्वतः च्या हिम्मतीवर लढा ना राजे हो…!! “

मुल नगर परिषद निवडणूक-2025.  "स्वतः च्या हिम्मतीवर लढा ना राजे हो...!! " इतकी वर्षे आपले सत्ता भोगी नगरसेवक उमेदवार म्हणून कार्यकर्तृत्व शुन्य पण बोलबाला बड्या नेत्यांचा व्वा रे...

” मूल च्या राजकारणातील वलयांकित वादळ..!!”

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस नगरसेवक पदाचे उमेदवार श्री.प्रशांत समर्थ- " मूल च्या राजकारणातील वलयांकित वादळ..!!" ह्यांच्या तोडीचा एक तरी नगर सेवक दाखवा... ज्यांनी लोकांच्या मनात घर केला.. इतकी वर्ष ज्यांनी मूल...

मूल न. प. नगराध्यक्ष पद निवडणूक…. नेत्यांची पाळत, जोरदार भिडंत…!

मूल न. प. नगराध्यक्ष पद निवडणूक.... नेत्यांची पाळत, जोरदार भिडंत...! राजकारण महेश पानसे. मुल : महिला आरक्षण असलेल्या मूल नगराध्यक्ष पदाकरिता अखेर कांग्रेस तफै माजी सभापती प़शांत समथॅ...

जनशक्ती मजबूत राहिली तर धनशक्तीवाल्या सत्ताधाऱ्यांचा माज उतरण्यास वेळ लागणार नाही- खासदार प्रतिभा धानोरकर.

जनशक्ती मजबूत राहिली तर धनशक्तीवाल्या सत्ताधाऱ्यांचा माज उतरण्यास वेळ लागणार नाही- खासदार प्रतिभा धानोरकर. मूल - मूल नगर परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसला मिळत असलेला प्रतिसाद पाहून...
- Advertisment -spot_img

Breaking News

Popular News