Monday, April 27, 2026
Google search engine
HomeBusinessELECTiON TiMESजनशक्ती विरुद्ध धनशक्तीच्या वादाला भाजपचा प्रतिवाद: “कामशक्ती, संघटनशक्तीच आमची खरी ताकद”

जनशक्ती विरुद्ध धनशक्तीच्या वादाला भाजपचा प्रतिवाद: “कामशक्ती, संघटनशक्तीच आमची खरी ताकद”

जनशक्ती विरुद्ध धनशक्तीच्या वादाला भाजपचा प्रतिवाद: “कामशक्ती, संघटनशक्तीच आमची खरी ताकद”

मूल प्रतिनिधी
नगरपालिकेच्या निवडणुकीत ‘जनशक्ती विरुद्ध धनशक्ती’ असा वाद सध्या चांगलाच तापलेला असताना आता भाजपने या आरोपांवर जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. काँग्रेसकडून प्रचारात “पैसा बोलतोय”, “धनशक्तीचा वापर होतोय” असे आरोप होत असताना भाजपने या वक्तव्यांवर आक्षेप नोंदवत त्याला “जाणूनबुजून पेरलेला गैरसमज” असे म्हटले आहे.
भाजपने प्रत्युत्तर देत सांगितले की,
धनशक्तीचा आरोप हा निवडणुकीत सहानुभूती मिळवण्यासाठी काँग्रेसची युक्ती आहे.भाजपकडे पैसा नाही, तर *कामशक्ती* , *संघटनशक्ती* आणि गेल्या पाच वर्षांत केलेली ठोस *विकासकामे* हा आमचा मुद्दा आहे.भाजपने असेही नमूद केले आहे की,विरोधकांकडे ठोस कामगिरी नसल्यामुळे,धनशक्तीचे चित्र निर्माण केले जात आहे.
धनशक्तीच्या आरोपांव्यतिरिक्त भाजपने काँग्रेसविषयी नव्या शंका उपस्थित केल्या आहेत.भाजपने म्हटले,विरोधी पक्षाचा, ठेकेदारीशी संबंध असल्याने निर्णयप्रक्रियेत हितसंबंधांचे संघर्ष निर्माण होऊ शकतात.
एकता समर्थ नगराध्यक्ष झाल्या तर संपूर्ण व्यवहार, निविदा आणि प्रशासकीय निर्णय त्यांच्या पतींकडूनच चालवले जातील. त्यामुळे त्या फक्त ‘ *रबर स्टॅम्प* ’ बनण्याची शक्यता आहे.

“किरण कापगते स्वतः सक्षम”
भाजप उमेदवार प्रा. किरण कापगते या शिक्षणक्षेत्रात काम करणाऱ्या, स्वतंत्र विचारसरणीच्या, प्रशासकीय समज असलेल्या आणि निर्णयक्षम उमेदवार आहेत.नगरपालिका चालवण्यासाठी जे तांत्रिक, कायदेशीर व आर्थिक कौशल्य आवश्यक आहे ते किरण कापगते यांच्याकडे आहे .त्यांना कोणत्याही व्यक्तीच्या छायेखाली काम करावे लागणार नाही.त्यांच्यामध्ये स्वतंत्र नेतृत्व करण्याची क्षमता आहे. उलट एकता समर्थ हे संपुर्णपणे आपल्या प्रशांत समर्थ यांच्या निर्णयांवर अवलंबून राहील असा दिसते, आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात भाजपचे लक्ष शहर विकासाकडे लागलेले आहे.परंतु, विपक्षांचे लक्ष नुसतं लोकांमध्ये गैरसमज पसरवणे,हेच त्यांच्याकडे काम उरलेलं आहे.

RELATED ARTICLES

नगरपरिषद निवडणूक, आज फैसला. नेत्यांचे ” षटकार ” तर मतदारांचे “फटकार “…….. !

नगरपरिषद निवडणूक, आज फैसला..... नेत्यांचे " षटकार " तर मतदारांचे "फटकार "........ ! राजकारण प्रा. महेश पानसे. मुल : जिल्ह्यातील अनेक नगरपरिषदांच्या नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या भाग्याचा आज...

मुल नगर परिषद निवडणूक-2025.  “स्वतः च्या हिम्मतीवर लढा ना राजे हो…!! “

मुल नगर परिषद निवडणूक-2025.  "स्वतः च्या हिम्मतीवर लढा ना राजे हो...!! " इतकी वर्षे आपले सत्ता भोगी नगरसेवक उमेदवार म्हणून कार्यकर्तृत्व शुन्य पण बोलबाला बड्या नेत्यांचा व्वा रे...

” मूल च्या राजकारणातील वलयांकित वादळ..!!”

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस नगरसेवक पदाचे उमेदवार श्री.प्रशांत समर्थ- " मूल च्या राजकारणातील वलयांकित वादळ..!!" ह्यांच्या तोडीचा एक तरी नगर सेवक दाखवा... ज्यांनी लोकांच्या मनात घर केला.. इतकी वर्ष ज्यांनी मूल...

मूल न. प. नगराध्यक्ष पद निवडणूक…. नेत्यांची पाळत, जोरदार भिडंत…!

मूल न. प. नगराध्यक्ष पद निवडणूक.... नेत्यांची पाळत, जोरदार भिडंत...! राजकारण महेश पानसे. मुल : महिला आरक्षण असलेल्या मूल नगराध्यक्ष पदाकरिता अखेर कांग्रेस तफै माजी सभापती प़शांत समथॅ...

जनशक्ती मजबूत राहिली तर धनशक्तीवाल्या सत्ताधाऱ्यांचा माज उतरण्यास वेळ लागणार नाही- खासदार प्रतिभा धानोरकर.

जनशक्ती मजबूत राहिली तर धनशक्तीवाल्या सत्ताधाऱ्यांचा माज उतरण्यास वेळ लागणार नाही- खासदार प्रतिभा धानोरकर. मूल - मूल नगर परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसला मिळत असलेला प्रतिसाद पाहून...
- Advertisment -spot_img

Breaking News

Popular News