Monday, August 10, 2026
Google search engine
HomeBusinessNewsसावली शहरातील अतिक्रमण धारकांना पट्टे मिळावे यासाठी तहसीलदार सावली यांना निवेदन..

सावली शहरातील अतिक्रमण धारकांना पट्टे मिळावे यासाठी तहसीलदार सावली यांना निवेदन..

सावली शहरातील अतिक्रमण धारकांना पट्टे मिळावे यासाठी तहसीलदार सावली यांना निवेदन..

सावली प्रतिनिधी रोशन बोरकर

सावली: – दिनांक ३१/१०/२०२५ सावली शहरातील अनेक प्रभागात कित्येक वर्षापासून अतिक्रमणि जागेवरील ताबा मिळवण्यासाठी सावली नगर सावली शहरातील अनेक प्रभागात कित्येक वर्षापासून अतिक्रमणि जागेवरील ताबा मिळवण्यासाठी सावली नगरवासी यांची मागणी नगरपंचायत येथे सुरू होती.त्या मागणीला धरून नगरपंचायत सावलीचे अध्यक्ष उपाध्यक्ष तथा सर्व सदस्य यांनी ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार मान. विजयभाऊ वडेट्टीवार यांच्याकडे अतिक्रमणी पट्टेधारकांचे म्हणणे सांगितल्यानंतर आमदार विजयभाऊ वडेट्टीवार साहेबांनी सावलीचे मुख्याधिकारी संदीप डोडे तसेच उपविभागीय अधिकारी मूल अजय चरडे यांच्याशी चर्चा करून सावली शहरातील सरकार जमा जागेवरील अतिक्रमणित धारकांना पट्टे मिळण्याकरिता प्रशासन स्तरावर योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले.त्या अनुषंगाने सावली शहरातील अतिक्रमी धारकांना आता काही दिवसातच पट्टे उपलब्ध होतील असे तहसीलदार प्रांजली चिरडे यांनी नगरपंचायत सावलीच्या शिष्टमंडळाला सांगितले.वन हक्क पाणीपट्ट्या अधिकारातील जागेवरील अतिक्रमणित लोकांना सुद्धा पट्टे मिळावेत याकरिता वरील अधिकाऱ्यांशी चर्चा करून तोही मार्ग मोकळा करून देऊ अशी ग्वाही तहसीलदार साहेबांनी दिली.

यावेळी निवेदन देताना सावली शहरातील नगराध्यक्ष साधनाताई वाडाई माजी सभापती विजय कोरेवार उपनगर अध्यक्ष संदीप पुणेकर निवेदन देताना सावली शहरातील नगराध्यक्ष साधनाताई वाढई, माजी सभापती विजय कोरेवार उपनगराध्यक्ष संदीप पुण्यपकार,सावली शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कृष्णा राऊत कृष्णा राऊत तसेच नगरसेवक प्रामुख्याने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुका मध्ये २ ऑक्टोबरला इंटकचे राष्ट्रीय अधिवेशन

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुका मध्ये २ ऑक्टोबरला इंटकचे राष्ट्रीय अधिवेशन अधिवेशनाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजन समितीची बैठक. चंद्रपूर, दि. ९ ऑगस्ट २०२६  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे...

ने. ही. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी तुकाराम मुंढे चा संवाद….

ने. ही. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी तुकाराम मुंढे चा संवाद.... आयुक्तांनी दिला विद्यार्थ्यांना गुरुमंत्र! नागभीड:- मिशन IAS चे विभागीय संचालक श्री. मुनीराज कुथे व सहायक शिक्षक मनोज हेमके यांच्या मार्गदर्शनाखाली...

सौंदर्यकरण हवेच, सोबत फुले दांपत्यांचे स्मारक उभारा.

सौंदर्यकरण हवेच, सोबत फुले दांपत्यांचे स्मारक उभारा. इ अ. भा. समता परिषदेची भावनिक मागणी. मूल:- नगरपरिषदेतर्गत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले चौकाच्या सौंदर्यकरणाकरिता...

1 ऑगस्ट ला शहरात ” घर घर मे आयुर्वेद ” शिबीर.

1 ऑगस्ट ला शहरात " घर घर मे आयुर्वेद " शिबीर. मूल:--- गोर गरीबांना निशुल्क आरोग्य सेवा मिळावी व आयुर्वेद व आयुर्वेदाचे मौलिक महत्व घरोघरी...

राज्य पत्रकार संघ राज्य अध्यक्ष (निवड समिती) पदी प्रा. महेश पानसे.

राज्य पत्रकार संघ राज्य अध्यक्ष (निवड समिती) पदी प्रा. महेश पानसे. मुंबई :- ( विशेष प़तिनिधी) महाराष्ट्र राज्यातील अग्रगण्य व सर्वात मोठ्या पत्रकार संघ असलेल्या महाराष्ट्र...
- Advertisment -spot_img

Breaking News

Popular News