Tuesday, August 11, 2026
Google search engine
HomeBusinessNewsसावली तालुक्यातील बोगस नावे मतदार यादीतून वगळा

सावली तालुक्यातील बोगस नावे मतदार यादीतून वगळा

सावली तालुक्यातील बोगस नावे मतदार यादीतून वगळा

बोगस मतदार यादीतून वगळून,शहानिशा करून अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करा सावली तालुका काँग्रेस कमिटीची मागणी

सावली तालुका प्रतिनिधी रोशन बोरकर

सावली :- दिनांक १६/१०२०२५ तालुक्यामध्ये अनेक ठिकाणच्या मतदार यादीत बोगस नावे समाविष्ट करण्यात आलेली आहेत अनेक व्यक्तींची प्रत्यक्ष गावात न राहता आपली नावे नोंदवली आहेत. रहिवासी असल्याबाबतचा कोणताही पुरावा अनेकांनी जोडलेला नाही गावचे सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, तलाठी यांचा रहिवासी असल्याबाबतचा कोणताही पुरावा न जोडता मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यात आल्याचे दिसून येते त्यामुळे जे व्यक्ती त्या गावातील मूळचे रहिवासी नाहीत अशा व्यक्तींचे नावे मतदार यादी समाविष्ट होणे लोकशाही शासन व्यवस्थेसाठी हानिकारक आहे.

त्यामुळे पूर्ण मतदार यादीची शहानिशा करूनच मतदार यादी अंतिम करावी जोपर्यंत बोगस मतदार यादीतून वगळण्यात येणार नाही तोपर्यंत अंतिम मतदार यादी प्रकाशित करू नये अशी मागणी तहसीलदार सावली यांचेकडे सावली तालुका काँग्रेस कमिटीने केली आहे.

निवेदन देताना तालुका अध्यक्ष नितीन गोहने,महिला तालुका अध्यक्ष उषा भोयर, सावली नगराध्यक्ष साधना वाढई, माजी शहर अध्यक्ष व नगरसेवक विजय मुत्यालवार,माजी प.स.सभापती विजय कोरेवार,माजी उपसभापती राजेंद्र भोयर,चिखलीच्या सरपंच रेखा बाणबले,चारगावच्या सरपंच ज्योती बहिरवार,जेष्ठ पदाधिकारी नानाजी तावाडे, प्रकाश घोटेकर,दिपक जवादे,रवी डोहने,चंद्रकांत संतोषवार,नगरसेवक सचिन संगीडवार,प्रीतम गेडाम,गुणवंत सुरमवार,युवा पदाधिकारी डोमा शेंडे,श्रीकांत बहिरवार,वामन भोपये,आकाश खोब्रागडे,कमलेश गेडाम आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुका मध्ये २ ऑक्टोबरला इंटकचे राष्ट्रीय अधिवेशन

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुका मध्ये २ ऑक्टोबरला इंटकचे राष्ट्रीय अधिवेशन अधिवेशनाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजन समितीची बैठक. चंद्रपूर, दि. ९ ऑगस्ट २०२६  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे...

ने. ही. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी तुकाराम मुंढे चा संवाद….

ने. ही. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी तुकाराम मुंढे चा संवाद.... आयुक्तांनी दिला विद्यार्थ्यांना गुरुमंत्र! नागभीड:- मिशन IAS चे विभागीय संचालक श्री. मुनीराज कुथे व सहायक शिक्षक मनोज हेमके यांच्या मार्गदर्शनाखाली...

सौंदर्यकरण हवेच, सोबत फुले दांपत्यांचे स्मारक उभारा.

सौंदर्यकरण हवेच, सोबत फुले दांपत्यांचे स्मारक उभारा. इ अ. भा. समता परिषदेची भावनिक मागणी. मूल:- नगरपरिषदेतर्गत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले चौकाच्या सौंदर्यकरणाकरिता...

1 ऑगस्ट ला शहरात ” घर घर मे आयुर्वेद ” शिबीर.

1 ऑगस्ट ला शहरात " घर घर मे आयुर्वेद " शिबीर. मूल:--- गोर गरीबांना निशुल्क आरोग्य सेवा मिळावी व आयुर्वेद व आयुर्वेदाचे मौलिक महत्व घरोघरी...

राज्य पत्रकार संघ राज्य अध्यक्ष (निवड समिती) पदी प्रा. महेश पानसे.

राज्य पत्रकार संघ राज्य अध्यक्ष (निवड समिती) पदी प्रा. महेश पानसे. मुंबई :- ( विशेष प़तिनिधी) महाराष्ट्र राज्यातील अग्रगण्य व सर्वात मोठ्या पत्रकार संघ असलेल्या महाराष्ट्र...
- Advertisment -spot_img

Breaking News

Popular News