Monday, August 10, 2026
Google search engine
HomeBusinessNewsश्रीकांत बहिरवार व विजय कोरेवार यांचा जलसमाधी आंदोलनाचा सार्वजनिक बांधकाम विभागाला इशारा..

श्रीकांत बहिरवार व विजय कोरेवार यांचा जलसमाधी आंदोलनाचा सार्वजनिक बांधकाम विभागाला इशारा..

श्रीकांत बहिरवार व विजय कोरेवार यांचा जलसमाधी आंदोलनाचा सार्वजनिक बांधकाम विभागाला इशारा..

सावली :- सावली ते चारगाव भरपायली मार्गावरील नवीन पुलाचे काम मंजूर झाले होते आणि ते बांधकाम एस डी मुलानी कन्स्ट्रक्शन कंपनी ला मिळाले मुलानी कन्स्ट्रक्शन ने आपल्या कामाला सुरवात केली नवीन पुलाचे बांधकाम करतांना जूना पुल तोडून नवीन पूल बांधकाम करण्यास सुरवात केली नवीन पुलाचे काम सुरू असल्यामुळे पर्यायी रस्ता म्हणून त्याकडेला दुसरा रस्ता बनवून दिला मात्र या वर्षीच्या पावसाच्या अती वृष्टी मुळे पर्यायी रस्ता वाहून गेला परिणामी येण्या जाण्याचा मार्ग बंद पडला त्यामुळे चारगाव भरपायली ते पांढरसराड कडे जाण्या येण्याचा रस्ता बंद पडला परिणामी या सर्व बाबीचा नाहक त्रास चारगाव भरपायली येथील नागरिकांना सहन करावा लागत आहे.

आता पाऊस कमी झाला असून नदीचे पाणी ओसरले आहे त्यामुळे त्वरीत रपटा करा अन्यथा पुलावर जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा माजी सभापती विजय कोरेवार व श्रीकांत बहिरवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे.
चारगाव पुलावर मागील वर्षीपासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत नवीन पूलाचे बांधकाम सुरु आहे. उन्हाळ्यात नवीन पुलाचे बांधकाम करतांना जुने पूल क्षतिग्रस्त करण्यात आले होते आणि तात्पुरता बाजूला रस्ता बनविण्यात आला होता व तेथून रहदारी सुरु होती. मात्र या वर्षी संततधार पावसाने नदीला पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे टेम्प्ररी बांधण्यात आलेला रस्ता वाहून गेला परिणामी याचा नाहक त्रास चारगाव वासियांना सहन करावा लागला रस्ता बंद असल्यामुळे टेकडी वरून सावली कडे प्रवास करावा लागत आहे. फेब्रुवारी २०२४ पासून पुलाचे बांधकामाला एस. डी. मुलानी कन्स्ट्रॅक्शन कपंनीने सुरवात केली. मागील पावसाळ्यात जुने पूल कायम असल्याने वाहतुकीस अडचण गेली नाही मात्र उन्हाळ्यात जुने पूल तोडून काम संत गतीने सुरू असल्यामुळे नाहक त्रास त्या भागातील वासियांना नाईलाजाने सहन करावा लागत आहे. आता पावसाचे पाणी ओसरले आहे तरी पुलाचे बांधकाम लवकरात लवकर सुरू करून चारगाव मार्ग सुरू करावा अन्यथा २० ऑक्टोबर पासून परिसरातील नागरिकांना घेऊन पुलावर जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा पंचायत समितीचे माजी सभापती विजय कोरेवार व श्रीकांत बहिरवार यांनी निवेदनातून सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे.

 

RELATED ARTICLES

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुका मध्ये २ ऑक्टोबरला इंटकचे राष्ट्रीय अधिवेशन

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुका मध्ये २ ऑक्टोबरला इंटकचे राष्ट्रीय अधिवेशन अधिवेशनाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजन समितीची बैठक. चंद्रपूर, दि. ९ ऑगस्ट २०२६  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे...

ने. ही. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी तुकाराम मुंढे चा संवाद….

ने. ही. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी तुकाराम मुंढे चा संवाद.... आयुक्तांनी दिला विद्यार्थ्यांना गुरुमंत्र! नागभीड:- मिशन IAS चे विभागीय संचालक श्री. मुनीराज कुथे व सहायक शिक्षक मनोज हेमके यांच्या मार्गदर्शनाखाली...

सौंदर्यकरण हवेच, सोबत फुले दांपत्यांचे स्मारक उभारा.

सौंदर्यकरण हवेच, सोबत फुले दांपत्यांचे स्मारक उभारा. इ अ. भा. समता परिषदेची भावनिक मागणी. मूल:- नगरपरिषदेतर्गत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले चौकाच्या सौंदर्यकरणाकरिता...

1 ऑगस्ट ला शहरात ” घर घर मे आयुर्वेद ” शिबीर.

1 ऑगस्ट ला शहरात " घर घर मे आयुर्वेद " शिबीर. मूल:--- गोर गरीबांना निशुल्क आरोग्य सेवा मिळावी व आयुर्वेद व आयुर्वेदाचे मौलिक महत्व घरोघरी...

राज्य पत्रकार संघ राज्य अध्यक्ष (निवड समिती) पदी प्रा. महेश पानसे.

राज्य पत्रकार संघ राज्य अध्यक्ष (निवड समिती) पदी प्रा. महेश पानसे. मुंबई :- ( विशेष प़तिनिधी) महाराष्ट्र राज्यातील अग्रगण्य व सर्वात मोठ्या पत्रकार संघ असलेल्या महाराष्ट्र...
- Advertisment -spot_img

Breaking News

Popular News