Saturday, October 3, 2026
Google search engine
HomeBusinessNewsसरन्यायाधिश यांचेवर झालेल्या भ्याड हल्ला विरोधात सावली शहरात निषेध मोर्चा

सरन्यायाधिश यांचेवर झालेल्या भ्याड हल्ला विरोधात सावली शहरात निषेध मोर्चा

सरन्यायाधिश यांचेवर झालेल्या भ्याड हल्ला विरोधात सावली शहरात निषेध मोर्चा

सावली प्रतिनिधी रोशन बोरकर

सावली:  १४/१०/२०२५ भारताचे सरन्यायाधिश न्यायमुर्ती भुषण गवई यांचेवर दि. ६ ऑक्टोंबर रोजी सर्वाच्च न्यायालयात झालेल्या भ्याड हल्याविरोधात सावली तालुका क्रांती मोर्चा च्या वतीने सावली शहरात तालुक्यातील संविधान प्रेमीचा मोर्चा १४ ऑक्टोंबर २०२५ रोजी काढण्यात आला. या मोर्चात असंख्य संविधान प्रेमी उपस्थित होते.

भारताचे सरन्यायाधिश न्यायमुर्ती भुषण गवई यांचेवर सर्वोच्च न्यायालयात विक्षिप्त मनोवृत्तीच्या मुनवादी माथेफिरु वकील राकेश किशोर तिवारी यांने अपमानजनक भ्याड हल्ला केला. हा हल्ला जातीयावादी मानसिकेतुन करण्यात आलेला होता. यामुळे भारताच्या संविधानाला गालबोट लागले असुन येथील सवर्ण मनुवादी मानसिकतेच्या लोकांनी घडवून आणलेला होता.

भारतीय संविधानाने प्रस्थापित व पुरस्क़त केलेल्या मानवतावादी समतेला अमान्य करण्याचे एक मोठे षडयंत्रच गेल्या काही वर्ष्ज्ञापासुन सुरु आहे. याला छुपा पाठींबा येथील वर्णविद्वेशी सरकाचा सुध्दा आहे भारतात स्वातंत्र, समता, बंधुता व न्यायावर आधारीत संविधान लागू झाल्यानंतर भारतातल्या बहुजन समाजाची होत असलेली सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व आर्थिक प्रगती पाहुन देशातील वर्णवर्चस्वादी मानसिकता असलेली लोकं घाबरुन गेली असुन बहुजन समाजावर असे हिंसक हल्ले करुन त्यांना नाउमेट करण्याचा केवीलवाना प्रयत्न हे षडयंत्रकारी लोक करीत आहेत. त्यामुळे भारतीय संविधानाचा अवमान झाला असुन असे दुष्कृत्य थांबविण्यासाठी सावली तालुका क्रांती समितीच्या वतीने भव्य निषेध मोर्चाचे आयोजन केले होते.
सदर मोर्चाचा सावली तहसिल कार्यालयात समारोप करण्यात आला तर सावलीचे तहसिलदार यांचे मार्फत भारताचे महामहिम राष्ट्रपती यांचेकडे निवेदन सादर केले.

RELATED ARTICLES

तालुकास्तरीय शालेय स्पर्धा परीक्षापूर्व मार्गदर्शन शिबिर

तालुकास्तरीय शालेय स्पर्धा परीक्षापूर्व मार्गदर्शन शिबिर मूल- जवाहर नवोदय परीक्षा मार्गदर्शन केंद्र चंद्रपूर अंतर्गत मूल तालुक्यातील इयत्ता चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षा तसेच इयत्ता पाचवी...

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुका मध्ये २ ऑक्टोबरला इंटकचे राष्ट्रीय अधिवेशन

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुका मध्ये २ ऑक्टोबरला इंटकचे राष्ट्रीय अधिवेशन अधिवेशनाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजन समितीची बैठक. चंद्रपूर, दि. ९ ऑगस्ट २०२६  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे...

ने. ही. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी तुकाराम मुंढे चा संवाद….

ने. ही. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी तुकाराम मुंढे चा संवाद.... आयुक्तांनी दिला विद्यार्थ्यांना गुरुमंत्र! नागभीड:- मिशन IAS चे विभागीय संचालक श्री. मुनीराज कुथे व सहायक शिक्षक मनोज हेमके यांच्या मार्गदर्शनाखाली...

सौंदर्यकरण हवेच, सोबत फुले दांपत्यांचे स्मारक उभारा.

सौंदर्यकरण हवेच, सोबत फुले दांपत्यांचे स्मारक उभारा. इ अ. भा. समता परिषदेची भावनिक मागणी. मूल:- नगरपरिषदेतर्गत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले चौकाच्या सौंदर्यकरणाकरिता...

1 ऑगस्ट ला शहरात ” घर घर मे आयुर्वेद ” शिबीर.

1 ऑगस्ट ला शहरात " घर घर मे आयुर्वेद " शिबीर. मूल:--- गोर गरीबांना निशुल्क आरोग्य सेवा मिळावी व आयुर्वेद व आयुर्वेदाचे मौलिक महत्व घरोघरी...
- Advertisment -spot_img

Breaking News

Popular News