Saturday, April 18, 2026
Google search engine
HomeBusinessNewsविद्यार्थ्यांनी उच्च शिक्षित होऊन समाजाच्या प्रगतीची कास धरावी - विधिमंडळ पक्षनेते आ....

विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षित होऊन समाजाच्या प्रगतीची कास धरावी – विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार

विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षित होऊन समाजाच्या प्रगतीची कास धरावी – विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार

सावली येथे सामान्य ज्ञान स्पर्धेचे बक्षीस व स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांचे वितरण

सावली प्रतिनिधी रोशन बोरकर

सावली – दिनांक १४/१०२०२५ समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी उच्चशिक्षित होणे काळाची गरज असून शिक्षणाच्या बळावरच समाजाची व आपल्या कुटुंबाची प्रगती साधता येते. माझ्या मतदार संघातील प्रत्येक विद्यार्थ्याने प्रशासकीय सेवेत यशाचे शिखर गाठावे या हेतूनेच मी पुढाकार घेऊन सामान्य ज्ञान स्पर्धेचे, तसेच स्पर्धा परीक्षाचे मार्गदर्शन करणारी पुस्तके वितरण करीत आहे. आपण या संधीचे सोने करीत भविष्यात उच्चशिक्षित होऊन समाजाच्या प्रगतीची कास धरावी असे आवाहन राज्याचे माजी विरोधी पक्षनेते तथा विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी केले ते सावली येथे तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित सामान्य ज्ञान स्पर्धेचे बक्षीस व स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांचे वितरण सोहळ्या प्रसंगी अध्यक्ष म्हणून बोलत होते.

आयोजित सोहळ्यास प्रामुख्याने माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती दिनेश चिटणुरवार,माजी जि.प.सदस्य ॲड.राम मेश्राम,माजी तालुका अध्यक्ष बंडू बोरकुटे,तालुका अध्यक्ष नितीन गोहने,महिला तालुका अध्यक्ष उषा भोयर, सावली नगराध्यक्ष साधना वाढई,शहर अध्यक्ष व नगरसेवक विजय मुत्यालवार,माजी प.स.सभापती राकेश गड्डमवार,माजी प.स.सभापती विजय कोरेवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजू ठाकरे,माजी उपसभापती दिवाकर भांडेकर,विविध कार्यकारी सोसायटी अध्यक्ष मुन्ना स्वामी, युवक तालुका अध्यक्ष किशोर कारडे,महिला शहर अध्यक्ष भारती चौधरी यांचेसह अनेक मान्यवर मंचावर उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलतांना विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार म्हणाले की, बहुजन समाजाला आरक्षणाच्या सुविधां पासून वंचित ठेवण्यासाठी भांडणे लावण्याचा व जाती जातीत विभागण्याचा कटकारस्थानाचा गोरखधंदा सत्ताधाऱ्यांनी अवलंबला आहे. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देऊन महाज्योती अंतर्गत एकट्या मराठा समाजाला १३५०० कोटी व ३७४ जातींचा समावेश असलेल्या ओबीसी समाजाला केवळ ५०० कोटी अशी सावत्र पणाची वागणूक सरकार देत आहे. आज आपण जागृत झालो नाही तर भविष्यातील आपली पुढील पिढी यांचे भवितव्य धोक्यात गेल्या शिवाय राहणार नाही. असेही ते यावेळी म्हणाले. म्हणून आपण सर्व विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन प्रशासकीय सेवेत यशाचे शिखर गाठले व आपल्या समाजाला न्याय हक्क व प्रगतीचा मार्ग मिळवून द्यावा असे आवाहन ही राज्याचे माजी विरोधी पक्षनेते तथा विधिमंडळ पक्षनेते आ विजय वडेट्टीवार यांनी उपस्थितांना केले.

यानंतर नुकत्याच पार पडलेल्या सामान्य ज्ञान स्पर्धेत प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक, प्रशस्ती पत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. सोबतच सावली तालुक्यातील होतकरू व शिक्षणार्थी ५०० विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून तालुका काँग्रेस अध्यक्ष नितीन गोहणे यांनी आ. विजय वडेट्टीवार यांच्या सामाजिक कार्याचा आढावा उपस्थितांना दिला. कार्यक्रमाचे संचालन चंचल रोहनकर यांनी तर आभार कमलेश गेडाम यांनी मानले.कार्यक्रमाकरिता सावली तालुक्यातील व परिसरातील शेकडो विद्यार्थी, काँग्रेस पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

RELATED ARTICLES

शिक्षक आमदारांच्या उपस्थितीत महामानवांची जयंती संपन्न.

शिक्षक आमदारांच्या उपस्थितीत महामानवांची जयंती संपन्न. चंद्रपूर/मूल :- विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शिक्षक आमदार सुधाकरराव अडबाले यांच्या उपस्थितीत नवभारत विदयालय तथा कनिष्ट विज्ञान...

जागतिक आरोग्य दिन दिनांक : ७ एप्रिल २०२६ ‘आरोग्यम् धनसंपदा’

जागतिक आरोग्य दिन दिनांक : ७ एप्रिल २०२६ 'आरोग्यम् धनसंपदा' डॉ. ज्योत्स्ना प्रभाकर राऊत (येलमुले) मराठी विभाग महिला महाविद्यालय, गडचिरोली "आरोग्य परमं भाग्य स्वास्थ सर्वार्थसाधनम शरीरमाद्य खलू धर्मसाधनम"...

नवभारत विद्यालयात HVP लसीकरण समुपदेशन कार्यशाळा संपन्न

नवभारत विद्यालयात HVP लसीकरण समुपदेशन कार्यशाळा संपन्न मूल: -दि. 23 मार्च 2026 रोजी नवभारत विद्यालय मुल येथे पालक सभा आणि HVP लसीकरण समुपदेशन कार्यशाळा आयोजित...

नवभारत विद्यालयात सिडबाॅल तयार करण्याचे प्रशिक्षण .

नवभारत विद्यालयात सिडबाॅल तयार करण्याचे प्रशिक्षण . मुल :  दि. 13/03/2026रोज शुक्रवारला नवभारत विद्यालय मूल येथे मुख्याध्यापक श्री.सी.जी.बारसागडे यांचे मागॅदशॅनात राष्ट्रीय हरित सेना टीम व...

सावली येथे १५ मार्च ला विनामूल्य मोतीबिंदू डोळे तपासणी शिबिर

सावली येथे १५ मार्च ला विनामूल्य मोतीबिंदू डोळे तपासणी शिबिर सावली प्रतिनिधी रोशन बोरकर सावली :- दिनांक १२/०३/२०२६ सावली येथे दिनांक १५ मार्च २०२६ ला लॉयन आय...
- Advertisment -spot_img

Breaking News

Popular News