Wednesday, June 24, 2026
Google search engine
HomeBusinessNewsबसस्थानक परिसरातील भला मोठा खड्डा शिवसैनिकांनी बुझविला.

बसस्थानक परिसरातील भला मोठा खड्डा शिवसैनिकांनी बुझविला.

राज ठाकरे चे “डॅशिंग” नेतृत्व।

बसस्थानक परिसरातील भला मोठा खड्डा शिवसैनिकांनी बुझविला.

मुल :-(तालुका प्रतिनिधी )
शिवसेना ( उबाठा) नवनियुक्त अध्यक्ष राज उर्फ राजू ठाकरे यांनी कामाची अलग ‘ स्टाईल ‘ दाखवून तालुक्याचे लक्ष
वेधून घेतले आहे. मूल शहरात नव्याने बनविण्यात येत असलेल्या बसस्थानक गेटवर निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आले. निकृष्ट कामाची माेठी ओरड झाली पण कुणी लक्ष दिले नाही. बस आवागमन करण्याचे जागेवर मोठा खड्डा पडला .या खड्या ने बस चालकाला व प्रवासी यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याने तसेच ह्या खड्डयामुळे अपघात होण्याचा व प्रसंगी जिव जाण्याचा लक्षात येताच नवनियुक्त
तालुका अध्यक्ष राज उर्फ राजू ठाकरे शिवसेना (उबाठा) याचे नेतृत्वाखाली तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी शिवसेना कार्यकर्त्यांनी प्रशाशनाकडे केली. माञ प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांनी एक पाऊल समाजसेवेसाठी म्हणत आपली स्टाईल वापरून शिवसेना मूल च्या वतीने काल रात्री वर्दळ कमी झाल्यानंतर खडया मध्ये काँक्रिटीकरण करून मोठा खडा बुजविला. व तालुका वासियांचे लक्ष वेधून घेतले.

शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे यांचे मार्गदर्शनात शिवसेना मूल तालुका प्रमुख राज ठाकरे, मैत्री ग्रुपचे अध्यक्ष डॉ. आनंदराव कुळे, शिवसेनाचे महेश चौधरी, सुनील काळे, ओमदेव मोहूरले , अमित आयलानी राहुल बारसागडे,बादल करपे, शिवम चलावार ,दत्तू चिटलोजवार, संजय चिटमलवार , माजी तालूका प्रमुख प्रशांत गट्टूरंवार शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या सहकार्यातून खड्डा बुजविण्यात आला. बसस्थानक अधिकारी चालक, वाहक व प्रवाशांनी या डॅशिंग कार्याबददल शिवसेनेचे आभार मानले आहे.

RELATED ARTICLES

मूल न. प. ॲक्शन मोडवर…. मान्सूनपूर्व तयारी सुरू.

मूल न. प. ॲक्शन मोडवर.... मान्सूनपूर्व तयारी सुरू.  मूल;-- उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची चणचण दूर सारण्याकरीता न. प. ची जरा दमछाक झाली खरी पण गाडी रूळावर आणून...

श्रीगुरूदेव भक्त डॉ. विठ्ठलराव बोरकुटे यांचे निधन.

श्रीगुरूदेव भक्त डॉ. विठ्ठलराव बोरकुटे यांचे निधन. नागभीड:- वंदनीय तुकडोजी महाराज यांचे सहवासात ज्यांचे बालपण गेले, महाराजांच्या विचारांनी ज्यांनी आयुष्यभर निस्वार्थ पणे रुग्ण सेवा दिली असे नवेगाव...

मूल न. प. ॲक्शन मोडवर….

मूल न. प. ॲक्शन मोडवर.... मान्सूनपूर्व तयारी सुरू. मूल;- उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची चणचण दूर करण्याकरीता न. प. ची जरा दमछाक झाली खरी पण गाडी रूळावर आणून...

शिक्षक आमदारांच्या उपस्थितीत महामानवांची जयंती संपन्न.

शिक्षक आमदारांच्या उपस्थितीत महामानवांची जयंती संपन्न. चंद्रपूर/मूल :- विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शिक्षक आमदार सुधाकरराव अडबाले यांच्या उपस्थितीत नवभारत विदयालय तथा कनिष्ट विज्ञान...

जागतिक आरोग्य दिन दिनांक : ७ एप्रिल २०२६ ‘आरोग्यम् धनसंपदा’

जागतिक आरोग्य दिन दिनांक : ७ एप्रिल २०२६ 'आरोग्यम् धनसंपदा' डॉ. ज्योत्स्ना प्रभाकर राऊत (येलमुले) मराठी विभाग महिला महाविद्यालय, गडचिरोली "आरोग्य परमं भाग्य स्वास्थ सर्वार्थसाधनम शरीरमाद्य खलू धर्मसाधनम"...
- Advertisment -spot_img

Breaking News

Popular News