Friday, October 2, 2026
Google search engine
HomeBusinessNewsविरखल येथील घरात घुसलेल्या अस्वलाला वनविभागाने केले जेरबंद

विरखल येथील घरात घुसलेल्या अस्वलाला वनविभागाने केले जेरबंद

विरखल येथील घरात घुसलेल्या अस्वलाला वनविभागाने केले जेरबंद

सावली प्रतिनिधी रोशन बोरकर

सावली – दिनांक २७/०२०२५ सावली वनपरिक्षेत्रातील उपवनक्षेत्र व्याहाड, नियतक्षेत्र गायडोंगरी अंतर्गत मौजा विरखल चक चे शेतशिवार व गाव शिवारात मागील चार पाच दिवसांपासून वन्यप्राणी अस्वलाचा वावर गावकऱ्यांना निदर्शनात येताच याची माहिती वनविभागाला देण्यात आली. मागील चार ते पाच दिवसांपासून नियत क्षेत्र वनरक्षक गायडोंगरी व PRT टीम निफांद्रा अस्वलावर लक्ष ठेऊन होते.

दिनांक २६/०९/२०२५ रोजी रात्री ८ वाजता च्या सुमारास गावाजवळ आली असता गावातील लोकांनी आरडाओरड केली असता भीतीने अस्वल चिंचेच्या झाडावर चढली. सदर अस्वल रात्रभर झाडावरच होती, परंतु पहाटे ५ वाजताच्या सुमारास अस्वल झाडावरून खाली उतरून विरखल चक येथील श्री. भास्कर लक्ष्मण मारभते यांच्या नवीन बांधकाम सुरू असलेल्या घरात घुसली, हे दृश्य बघत असलेल्या वन विभागाचे गस्तीवर असलेल्या वन कर्मचाऱ्यांनी तत्काळ सदर घराचे दरवाजे बंद करून याबाबत वरिष्ठ अधिकारी यांना माहिती दिली.

विकास तरसे सहाय्यक वनसंरक्षक वन विभाग चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली विनोद धूर्वे वनपरिक्षेत्र अधिकारी सावली यांच्या नेतृत्वात श्री घनश्याम नायगावकर वन परिक्षेत्र अधिकारी, कु. इंगळे परिविक्षाधीन, वन परिक्षेत्र अधिकारी डॉ. कुंदन पोडचेलवार पशुधन विकास अधिकारी टी टी सी चंद्रपूर RRU टीम चंद्रपूर यांनी अस्वलास पिंजऱ्यात जेरबंद केले.
अस्वलास पुढील उपचाराकरिता TTC चंद्रपूर येथे हलविण्यात आले असून गावकऱ्यांनी अस्वल पकडल्याने सुटकेचा श्वास घेतला आहे, अस्वलाला बघण्यास हजारोच्या संख्येने गर्दी जमा झालेली होती.

RELATED ARTICLES

तालुकास्तरीय शालेय स्पर्धा परीक्षापूर्व मार्गदर्शन शिबिर

तालुकास्तरीय शालेय स्पर्धा परीक्षापूर्व मार्गदर्शन शिबिर मूल- जवाहर नवोदय परीक्षा मार्गदर्शन केंद्र चंद्रपूर अंतर्गत मूल तालुक्यातील इयत्ता चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षा तसेच इयत्ता पाचवी...

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुका मध्ये २ ऑक्टोबरला इंटकचे राष्ट्रीय अधिवेशन

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुका मध्ये २ ऑक्टोबरला इंटकचे राष्ट्रीय अधिवेशन अधिवेशनाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजन समितीची बैठक. चंद्रपूर, दि. ९ ऑगस्ट २०२६  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे...

ने. ही. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी तुकाराम मुंढे चा संवाद….

ने. ही. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी तुकाराम मुंढे चा संवाद.... आयुक्तांनी दिला विद्यार्थ्यांना गुरुमंत्र! नागभीड:- मिशन IAS चे विभागीय संचालक श्री. मुनीराज कुथे व सहायक शिक्षक मनोज हेमके यांच्या मार्गदर्शनाखाली...

सौंदर्यकरण हवेच, सोबत फुले दांपत्यांचे स्मारक उभारा.

सौंदर्यकरण हवेच, सोबत फुले दांपत्यांचे स्मारक उभारा. इ अ. भा. समता परिषदेची भावनिक मागणी. मूल:- नगरपरिषदेतर्गत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले चौकाच्या सौंदर्यकरणाकरिता...

1 ऑगस्ट ला शहरात ” घर घर मे आयुर्वेद ” शिबीर.

1 ऑगस्ट ला शहरात " घर घर मे आयुर्वेद " शिबीर. मूल:--- गोर गरीबांना निशुल्क आरोग्य सेवा मिळावी व आयुर्वेद व आयुर्वेदाचे मौलिक महत्व घरोघरी...
- Advertisment -spot_img

Breaking News

Popular News