Wednesday, June 24, 2026
Google search engine
HomeBusinessNewsसमाजकार्य विकास साधण्यासाठी शैक्षणिक आणि राजकीय कार्याची गरज

समाजकार्य विकास साधण्यासाठी शैक्षणिक आणि राजकीय कार्याची गरज

समाजकार्य विकास साधण्यासाठी शैक्षणिक आणि राजकीय कार्याची गरज – केंद्रीय अध्यक्ष श्री रघुनाथजी शेंडे

मुल : दि.१७.०९.२०२५ विदर्भ तेली समाज महासंघाची जिल्हा आढावा बैठक व समाजातील नवोदय परीक्षेला बसणाऱ्या मुल तालुक्यातील विद्यार्थ्यांना जिल्हा महासचिव श्री कैलास चलाख यांचे कडून बुक साहित्य वाटप कार्यक्रम केंद्रीय अध्यक्ष श्री रघुनाथ शेंडे यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाला याप्रसंगी केंद्रीय सरचिटणीस डॉ. नामदेवरावजी हटवार, विदर्भाचे मार्गदर्शक जेष्ठविधीतज्ञ ॲड विजय मोगरे,विदर्भ उपाध्यक्ष हृदय रोग तज्ञ डॉ. विश्वास झाडे, विदर्भ संघटक श्री.धनराज मुंगळे, जिल्हा मार्गदर्शक श्री.पांडुरंगजी आंबटकर, जिल्हा अध्यक्ष उपप्राचार्य डॉक्टर संजय बेले, कार्याध्यक्ष डॉक्टर नामदेवराव वरभे, जिल्हा महासचिव श्री कैलास चलाख,जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रभुदास चिलबुले, प्राचार्य डॉ.माधवराव वरभे,महिला जिल्हाध्यक्ष सौ. मीनाक्षीताई गुजरकर, महिला शहराध्यक्ष चंदाताई वैरागडे, जिल्हा सचिव श्री सतीश बावणे,शहराध्यक्ष प्रा.अभय घटे, महिला तालुकाध्यक्ष मुल सौ. चेतनाताई येणुरकर इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन दीपप्रज्वलन करून पाहुण्याच्या हस्ते करण्यात आले


याप्रसंगी केंद्रीय सरचिटणीस डॉ. नामदेवरावजी हटवार यांनी मार्गदर्शन करताना सर्व जिल्हा तसेच तालुका पदाधिकाऱ्यांनी आपल्या समाजातील लहानातल्या लहान घटकापर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या जाणून घ्यायला पाहिजे त्यांना शैक्षणिक सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या प्रबळ करण्यासाठी मार्गदर्शन करायला पाहिजे जेणेकरून विदर्भ तेली समाज महासंघाचे चळवळीचे उद्दिष्ट साध्य होईल.
तुम्ही समाजाला हात द्या, समाज तुमचं साथ कधीही सोडणार नाही.
तुम्ही समाजापर्यंत पोहचा समाज सदैव तुमचं नेहमी स्वागतच करेल यानंतर त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं
या जिल्हा आढावा बैठकीमध्ये संपूर्ण तालुक्यातील/जिल्हा पदाधिकाऱ्यांनी आपली कार्य आणि समाजाबद्दल असलेल्या आपले कर्तव्य यावर भाष्य केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा महासचिव श्री कैलास चलाख, संचालन श्री किरण खोब्रागडे आणि आभार मुल तालुकाध्यक्ष राजेश सावरकर यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा उपाध्यक्ष श्री गंगाधरजी कुंणघाडकर, मुल तालुकाध्यक्ष श्री राजेश सावरकर, सरचिटणीस श्री अतुल बुरांडे, श्री प्रशांत भरतकर, अतुल सातपैसे, नरेश आगडे,
चेतन कामडे, ऋषीदेव पिंपळे, प्रवीण आगडे,संजय कामडे, सुधीर कावळे तसेच बहुसंख्येने समाज कार्य उपस्थिती होते

 

RELATED ARTICLES

मूल न. प. ॲक्शन मोडवर…. मान्सूनपूर्व तयारी सुरू.

मूल न. प. ॲक्शन मोडवर.... मान्सूनपूर्व तयारी सुरू.  मूल;-- उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची चणचण दूर सारण्याकरीता न. प. ची जरा दमछाक झाली खरी पण गाडी रूळावर आणून...

श्रीगुरूदेव भक्त डॉ. विठ्ठलराव बोरकुटे यांचे निधन.

श्रीगुरूदेव भक्त डॉ. विठ्ठलराव बोरकुटे यांचे निधन. नागभीड:- वंदनीय तुकडोजी महाराज यांचे सहवासात ज्यांचे बालपण गेले, महाराजांच्या विचारांनी ज्यांनी आयुष्यभर निस्वार्थ पणे रुग्ण सेवा दिली असे नवेगाव...

मूल न. प. ॲक्शन मोडवर….

मूल न. प. ॲक्शन मोडवर.... मान्सूनपूर्व तयारी सुरू. मूल;- उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची चणचण दूर करण्याकरीता न. प. ची जरा दमछाक झाली खरी पण गाडी रूळावर आणून...

शिक्षक आमदारांच्या उपस्थितीत महामानवांची जयंती संपन्न.

शिक्षक आमदारांच्या उपस्थितीत महामानवांची जयंती संपन्न. चंद्रपूर/मूल :- विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शिक्षक आमदार सुधाकरराव अडबाले यांच्या उपस्थितीत नवभारत विदयालय तथा कनिष्ट विज्ञान...

जागतिक आरोग्य दिन दिनांक : ७ एप्रिल २०२६ ‘आरोग्यम् धनसंपदा’

जागतिक आरोग्य दिन दिनांक : ७ एप्रिल २०२६ 'आरोग्यम् धनसंपदा' डॉ. ज्योत्स्ना प्रभाकर राऊत (येलमुले) मराठी विभाग महिला महाविद्यालय, गडचिरोली "आरोग्य परमं भाग्य स्वास्थ सर्वार्थसाधनम शरीरमाद्य खलू धर्मसाधनम"...
- Advertisment -spot_img

Breaking News

Popular News