Wednesday, September 30, 2026
Google search engine
HomeBusinessNewsमहाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा "जनसेवक सन्मान" सोहळा थाटात संपन्न.

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा “जनसेवक सन्मान” सोहळा थाटात संपन्न.

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा “जनसेवक सन्मान” सोहळा थाटात संपन्न.

मूल(तालुका प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या चंद्रपूर जिल्हा शाखेतर्फे मूल येथील माॅ दुर्गा माता सभागृहात आयोजित जनसेवक सन्मान सोहळा २०२६ व प़ा.महेश पानसे यांचा अनिष्ट चिंतन सोहळा उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा ज्येष्ठ संपादक निलेश सोमानी होते. तर प्रमुख अतिथी म्हणून मूल नगर परिषदेच्या नगराध्यक्ष एकताताई समर्थ, उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले, चंद्रपूर जिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. बंडू रामटेके, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा.महेश पानसे, विदर्भ अध्यक्ष अनुपकुमार भार्गव, नागपूर जिल्हाध्यक्ष शेंडे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

प्रमुख अतिथी उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी प्रा.महेश पानसे यांचा केक कापून वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच पत्रकार संघाच्या जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांतर्फे पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी मूल नगर परिषदेतील नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांचा पत्रकार संघाच्या वतीने शाल, पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.तसेच शैक्षणिक, समाजकार्य आणि पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचाही यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सदर शानदार कायॅक़माचे
आयोजन राज्य पत्रकार संघ जिल्हा शाखा व तालुका शाखांनी केले होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हा संघटक रुपचंद धारणे यांनी केले.सुंदर संचालन मुनिराज कुथे यांनी केले, तर आभार ॲड. राहील थोरात यांनी मानले. कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“जनसेवक सन्मान” प़ाप्त”

सौ.एकताताई समर्थ नगराध्यक्षा मूल
सौ. नलिनीताई अडपवार सभापती, न. प. मूल
सौ. ललिताताई फुलझेले सभापती, न. प. मूल
सौ. समिक्षा कडस्कर उपसभापती, न. प. मूल
श्री.मिलींदजी खोब्रागडे माजी सभापती, न. प. मूल
डॉ.तिरथ उराडे वैद्यकीय अधिकारी उप जिल्हा रुग्णालय, मूल.
चंदशेखर अडगुनवार माजी सैनिक
गजेंद्र रायपुरे तहसील कार्यालय, मूल

“गुरूवर्य “सन्मान”

अशोक झाडे सर माजी प्राचार्य
अविनाश जगताप सर मुख्याध्यापक सुभाष विद्यालय, मूल

“दर्पणकार स्मृती” सन्मान”
आशिष घुमे संपादक
विजय सिदधावार संपादक
प्रविण बत्की जिल्हा प़तिनीधी दै. महासागर
सुनील बोकडे जिल्हा प़तिनीधी दै. लोकमत टाईम्स
मनिष रक्षमवार जिल्हा प़तिनीधी NDTV.
विनोद पन्नासे मुख्य वितरक तथा संपादक.
गिरीश नवघडे पत्रकार.

RELATED ARTICLES

तालुकास्तरीय शालेय स्पर्धा परीक्षापूर्व मार्गदर्शन शिबिर

तालुकास्तरीय शालेय स्पर्धा परीक्षापूर्व मार्गदर्शन शिबिर मूल- जवाहर नवोदय परीक्षा मार्गदर्शन केंद्र चंद्रपूर अंतर्गत मूल तालुक्यातील इयत्ता चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षा तसेच इयत्ता पाचवी...

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुका मध्ये २ ऑक्टोबरला इंटकचे राष्ट्रीय अधिवेशन

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुका मध्ये २ ऑक्टोबरला इंटकचे राष्ट्रीय अधिवेशन अधिवेशनाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजन समितीची बैठक. चंद्रपूर, दि. ९ ऑगस्ट २०२६  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे...

ने. ही. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी तुकाराम मुंढे चा संवाद….

ने. ही. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी तुकाराम मुंढे चा संवाद.... आयुक्तांनी दिला विद्यार्थ्यांना गुरुमंत्र! नागभीड:- मिशन IAS चे विभागीय संचालक श्री. मुनीराज कुथे व सहायक शिक्षक मनोज हेमके यांच्या मार्गदर्शनाखाली...

सौंदर्यकरण हवेच, सोबत फुले दांपत्यांचे स्मारक उभारा.

सौंदर्यकरण हवेच, सोबत फुले दांपत्यांचे स्मारक उभारा. इ अ. भा. समता परिषदेची भावनिक मागणी. मूल:- नगरपरिषदेतर्गत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले चौकाच्या सौंदर्यकरणाकरिता...

1 ऑगस्ट ला शहरात ” घर घर मे आयुर्वेद ” शिबीर.

1 ऑगस्ट ला शहरात " घर घर मे आयुर्वेद " शिबीर. मूल:--- गोर गरीबांना निशुल्क आरोग्य सेवा मिळावी व आयुर्वेद व आयुर्वेदाचे मौलिक महत्व घरोघरी...
- Advertisment -spot_img

Breaking News

Popular News