Friday, May 8, 2026
Google search engine
HomeBusinessNewsमाजी विद्यार्थी सत्कार सोहळा २०२६ जिल्हा परिषद शाळा बोरचांदली

माजी विद्यार्थी सत्कार सोहळा २०२६ जिल्हा परिषद शाळा बोरचांदली

माजी विद्यार्थी सत्कार सोहळा २०२६
जिल्हा परिषद शाळा बोरचांदली

मुल दि.३१ जानेवारी २०२६ रोज शनिवारला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बोरचांदली येथे विविध क्षेत्रात कार्यरत सर्व “माजी विद्यार्थी सत्कार सोहळा “आयोजित केला होता.सदर सोहळ्याची सुरुवात दुपारी २:००वाजता करण्यात आली.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी माजी विद्यार्थी
मा.श्री प्रफुल रमेश पोरेड्डीवार
(जिल्हा नियोजन अधिकारी)
सांख्यिकीय विभाग, गडचिरोली
तर उद् घाटिका
मा.सौ.ललिता नरेंद्र सेमस्कार
(सरपंच) ग्रा.पं. बोरचांदली
हे होते.
गावातील सर्व गणमान्य व्यक्ती ग्रामपंचायत पदाधिकारी,शालेय व्यवसापन समिती, विविध संस्थाचे आजी माजी पदाधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सदर कार्यक्रमाला
माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शालेय विद्यार्थी,कर्मवीर महाविद्यालयाचे विद्यार्थी, गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
बँड पथकाचे तालात आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या पुष्प वर्षावात अतिथीना व्यासपीठावर विराजमान करण्यात आले.तत्पूर्वी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ह्यांच्या प्रतिमेचे पूजन दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे विधिवत उद्घाटन करण्यात आले. जिल्हा परिषद शाळा बोरचांदलीच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या बहारदार स्वागत नृत्यांनी पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.
ह्या कार्यक्रमासाठी अनेक जुने माजी विद्यार्थी
ठिकठिकाणाहून आलेली होती. हे महत्वाचे!!
सदर कार्यक्रमादरम्यान माजी विद्यार्थ्याचा सत्कार चिन्ह, शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला .
माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला.समायोचित भाषणे झाली.
अध्यक्षीय भाषणानंतर कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम् गीताने करण्यात आली. तद्नंतर सर्व माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या वतीने आयोजित स्नेह भोजनाचा लाभ घेतला!!अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला.
सदरहू कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वरभे शिक्षिका,
प्रास्ताविक मारोती जिल्हेवार मुख्याध्यापक,तथा आभारप्रदर्शन कामडी सर सेवानिवृत्त मुख्याध्यापक ह्यांनी केले. ह्याच शाळेत शिकून इथेच शिक्षिका कार्यरत माधुरीताई पोरेड्डीवार
ह्यांचे सुद्धा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यात योगदान लाभले.
सदर कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रात कार्यरत माजी विद्यार्थी म्हणून सर्व श्री/सौ./श्रीमती
राजीव पा. येनुगवार,संजय पा. कुंटावार,दशरथ मडावी (पो.पा.)योगेश कटकमवार ,विपीन येनगंटीवार ,संदीप येनुगवार ,विनोद बोलीवार, साक्षी प्रमोद कुंटावार ,समीर अल्लुरवार, मीनाक्षी लक्ष्मण सेमस्कार ,आकाश निलेवार, सुषमा लक्ष्मण सेमसकार ,निलेश कटकमवार
महेंद्र खोब्रागडे दिवाकर भलवे ,शुभांगी लक्ष्मण सेमस्कार ,फिरोज सेमस्कार, अक्षय येनुगवार,कैलास कोसरे राजकुमार इप्पलवार ,कुमार बोलीवार , निखिल जंपालवार , राकेश कलसार ,सचिन गंगासागर हे उपस्थित होते.
सर्व प्रत्यक्ष उपस्थित तथा अप्रत्यक्ष रित्या उपस्थित राहू न शकले तरीही शाळेला भरभरून सहयोग निधी दिला सर्वांचे मनःपूर्वक
शाळेच्या वतीने मनपूर्वक ऋणी राहून
आल्हाददायक वातावरणात कार्यक्रम पार पडला.

वृतांत शब्दांकन ✍️ योगेश कटकमवार

RELATED ARTICLES

शिक्षक आमदारांच्या उपस्थितीत महामानवांची जयंती संपन्न.

शिक्षक आमदारांच्या उपस्थितीत महामानवांची जयंती संपन्न. चंद्रपूर/मूल :- विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शिक्षक आमदार सुधाकरराव अडबाले यांच्या उपस्थितीत नवभारत विदयालय तथा कनिष्ट विज्ञान...

जागतिक आरोग्य दिन दिनांक : ७ एप्रिल २०२६ ‘आरोग्यम् धनसंपदा’

जागतिक आरोग्य दिन दिनांक : ७ एप्रिल २०२६ 'आरोग्यम् धनसंपदा' डॉ. ज्योत्स्ना प्रभाकर राऊत (येलमुले) मराठी विभाग महिला महाविद्यालय, गडचिरोली "आरोग्य परमं भाग्य स्वास्थ सर्वार्थसाधनम शरीरमाद्य खलू धर्मसाधनम"...

नवभारत विद्यालयात HVP लसीकरण समुपदेशन कार्यशाळा संपन्न

नवभारत विद्यालयात HVP लसीकरण समुपदेशन कार्यशाळा संपन्न मूल: -दि. 23 मार्च 2026 रोजी नवभारत विद्यालय मुल येथे पालक सभा आणि HVP लसीकरण समुपदेशन कार्यशाळा आयोजित...

नवभारत विद्यालयात सिडबाॅल तयार करण्याचे प्रशिक्षण .

नवभारत विद्यालयात सिडबाॅल तयार करण्याचे प्रशिक्षण . मुल :  दि. 13/03/2026रोज शुक्रवारला नवभारत विद्यालय मूल येथे मुख्याध्यापक श्री.सी.जी.बारसागडे यांचे मागॅदशॅनात राष्ट्रीय हरित सेना टीम व...

सावली येथे १५ मार्च ला विनामूल्य मोतीबिंदू डोळे तपासणी शिबिर

सावली येथे १५ मार्च ला विनामूल्य मोतीबिंदू डोळे तपासणी शिबिर सावली प्रतिनिधी रोशन बोरकर सावली :- दिनांक १२/०३/२०२६ सावली येथे दिनांक १५ मार्च २०२६ ला लॉयन आय...
- Advertisment -spot_img

Breaking News

Popular News