Saturday, April 18, 2026
Google search engine
HomeBusinessNewsआज नगराध्यक्ष, नगरसेवक पदग्रहण.......

आज नगराध्यक्ष, नगरसेवक पदग्रहण…….

आज नगराध्यक्ष, नगरसेवक पदग्रहण…….

शहरात “समर्थ अध्याय ” सुरवात!

वार्ता विशेष
महेश पानसे

मुल : मूल नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा व
नगरसेवक यांचा पदग्रहण सोहळा आज संपन्न होणार आहे. नगराध्यक्षा सौ.ऐकता प़शांत समर्थ व न. प. निवडणूक सामनावीर ठरलेले माजी न. प. सभापती तथा विद्यमान नगरसेवक प़शांत समथॅ हे इतर नगरसेवकांसोबत नगरविकासाकरीता आणाभाका घेतील. खऱ्या अर्थाने आजपासून मूल शहरात ” समर्थ अध्याय ” सुरू होणार आहे. साडेतीन ते चार वर्षाचे कालखंडानंतर लोकमताने निवडून आलेल्या जन सेवकांना बाशिंग बांधताना बघून शहरातील जनता आनंदीत होणार आहे. भा. ज. पा. समर्थकांना जरा
चुकचुकल्या सारखे होईल कारण अजूनही त्यांना सौ. ऐकता समर्थ व 20 पैकी 18 नगरसेवक कांग्रेस च्या झेंड्याखाली निवडून येणे पचलेले दिसत नाही. विकास पुरूष आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची जादू जरी चालली नसली तरी न. प. निवडणूकीचे ‘ सामनावीर ‘ ठरलेले प्रशांत समर्थ गत अनेक वर्ष भा. ज. पा. वासी होते व नगरवासियांच्या सेवेत राहून त्यांचे चाहते बनले हे विसरून चालणार नाही अशी जन भावना आहे. जन भावनेचा सन्मान करून आज होणाऱ्या आनंदोत्सवात सवाॅनी शुभेच्छुक बनून सहभागी होणे अपेक्षित ठरते.

न. प. निवडणूकीनंतर जे निकाल हातात आले ते अनेकांचा “ब्लडप्रेशर” वाढविणारे होते यात शंका नाही. सौ. ऐकता समर्थ व त्यांच्या 18 नगरसेवकांच्या विजयात व भा. ज. पा. च्या भारी पराभवात वाटेकरी असलेल्या अनेक बाबींचे चिंतन होत राहीलच, आता गरज आहे गत अनेक वर्षापासून लोकप्रतिनिधीं अभावी रखडलेल्या अनेक नागरी समस्या मागीं लावण्याची. यात मूल शहरातील आ. सुधिरभाऊ समथॅकांचीही भूमिका सुद्धा महत्वाची ठरणार आहे. कारण विद्यमान न. प. चा खरा चेहरा असलेले प़शांत समर्थ व इतर माजी न. प. पदाधिकारी (भा.ज.पा मंडळी) यांचे ” घरोब्याचे” संबंध आहेत. गत अनेक वर्ष न. प. सांभाळणारी ही माजी मंडळी मूल शहराच्या लहान मोठया समस्यांची जाणकार आहे. यात मोठा काळ प़शांत समथॅ हे सुद्धा यांचे सोबत राहीले आहेत. नाळ जुळली आहे.
यात शहरवासीयांचे भले होईल व पराभव पचविण्याची शक्ती भा. ज. पा. मंडळींना लाभेल असे जाणकार बोलताना दिसतात.

आज होणाऱ्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदग्रहण सोहळ्यास शहरातील मान्यवरांसोबत माजी न. प. पदाधिकारी ( भा. ज. पा. मंडळी)यांना सुद्धा पाचारण करण्यात आले असेलच. आता निवडणूक संपली आहे. तिकडे आ. सुधिरभाऊ नी आ. विजय वडेट्टीवारांना दिलेल्या शुभेच्छा मनापासून दिल्या आहेत. इकडे भा. ज. पा. कंपूने नगराध्यक्षा सो. एकता समथॅ, नगरसेवक प़शांत समथॅ यांचेसह इतर नवनिर्वाचिताना शुभेच्छा दिल्या तर मूल शहरवासीय अधिक आनंदीत होतील यात कुणाला शंका नसावी.

RELATED ARTICLES

शिक्षक आमदारांच्या उपस्थितीत महामानवांची जयंती संपन्न.

शिक्षक आमदारांच्या उपस्थितीत महामानवांची जयंती संपन्न. चंद्रपूर/मूल :- विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शिक्षक आमदार सुधाकरराव अडबाले यांच्या उपस्थितीत नवभारत विदयालय तथा कनिष्ट विज्ञान...

जागतिक आरोग्य दिन दिनांक : ७ एप्रिल २०२६ ‘आरोग्यम् धनसंपदा’

जागतिक आरोग्य दिन दिनांक : ७ एप्रिल २०२६ 'आरोग्यम् धनसंपदा' डॉ. ज्योत्स्ना प्रभाकर राऊत (येलमुले) मराठी विभाग महिला महाविद्यालय, गडचिरोली "आरोग्य परमं भाग्य स्वास्थ सर्वार्थसाधनम शरीरमाद्य खलू धर्मसाधनम"...

नवभारत विद्यालयात HVP लसीकरण समुपदेशन कार्यशाळा संपन्न

नवभारत विद्यालयात HVP लसीकरण समुपदेशन कार्यशाळा संपन्न मूल: -दि. 23 मार्च 2026 रोजी नवभारत विद्यालय मुल येथे पालक सभा आणि HVP लसीकरण समुपदेशन कार्यशाळा आयोजित...

नवभारत विद्यालयात सिडबाॅल तयार करण्याचे प्रशिक्षण .

नवभारत विद्यालयात सिडबाॅल तयार करण्याचे प्रशिक्षण . मुल :  दि. 13/03/2026रोज शुक्रवारला नवभारत विद्यालय मूल येथे मुख्याध्यापक श्री.सी.जी.बारसागडे यांचे मागॅदशॅनात राष्ट्रीय हरित सेना टीम व...

सावली येथे १५ मार्च ला विनामूल्य मोतीबिंदू डोळे तपासणी शिबिर

सावली येथे १५ मार्च ला विनामूल्य मोतीबिंदू डोळे तपासणी शिबिर सावली प्रतिनिधी रोशन बोरकर सावली :- दिनांक १२/०३/२०२६ सावली येथे दिनांक १५ मार्च २०२६ ला लॉयन आय...
- Advertisment -spot_img

Breaking News

Popular News