Thursday, October 1, 2026
Google search engine
HomeBusinessNewsक्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

मूल:- 3 जानेवारी 2025 रोजी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित नवभारत विद्यालय मुल येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोकराव झाडे तसेच प्रमुख अतिथी म्हणून विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सौ वर्षा भांडारकर, ज्येष्ठ शिक्षक गुरुदास चौधरी , ज्येष्ठ शिक्षिका कु. प्रतिमा उमक , कु.दीपा गोंगल , कु.माधुरी तलांडे तसेच सर्व शिक्षक उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन तथा दीपप्रज्वलन शाळेचे मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षक वृंद यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थीनी सुंदर सुमधुर आवाजात स्वागत गीत सादर केले. सर्व शिक्षकवृंदाचे विद्यार्थ्यांनी पुष्पगुच्छ देऊन आनंददाही वातावरणात स्वागत केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी प्रतिनिधी कु. तनश्री उपरीकर हिने केले. त्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित भाषणे दिली. वर्ग आठवी ची विद्यार्थिनी कुमारी भाग्यश्री चिंचोलकर हिने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर एकांकिका सादर केली. क्रांतिज्योती सावित्रीबाई च्या अथक परिश्रमुळे स्त्रि शिक्षित झाल्याने देशाच्या विकासाला हातभार लागून देश प्रगतीपथावर जात आहे..असे प्रमुख अतिथी म्हणून सौ.भांडारकर यांनी आपल्या भाषणातून सांगितले. अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक श्री अशोक झाडे यांनी क्रांतीसुर्य महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी समस्त भारतातील स्त्री शिक्षणाकरिता शिक्षणाचे द्वारे खुले करून स्त्रीमुक्तीचा लढा दिला. अहोरात्र परिश्रम घेऊन भारतातील पहिली शाळा 1 जानेवारी 1848 पुण्याच्या भिडे वाड्यामध्ये काढली असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी प्रतिनिधी कु.तेजश्री शेरकी आणि अक्षरा चौधरी हिने केले. उपस्थितांचे आभार कु.रिद्धी गौरकर हिने मानले.या कार्यक्रमाला सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

तालुकास्तरीय शालेय स्पर्धा परीक्षापूर्व मार्गदर्शन शिबिर

तालुकास्तरीय शालेय स्पर्धा परीक्षापूर्व मार्गदर्शन शिबिर मूल- जवाहर नवोदय परीक्षा मार्गदर्शन केंद्र चंद्रपूर अंतर्गत मूल तालुक्यातील इयत्ता चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षा तसेच इयत्ता पाचवी...

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुका मध्ये २ ऑक्टोबरला इंटकचे राष्ट्रीय अधिवेशन

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुका मध्ये २ ऑक्टोबरला इंटकचे राष्ट्रीय अधिवेशन अधिवेशनाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजन समितीची बैठक. चंद्रपूर, दि. ९ ऑगस्ट २०२६  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे...

ने. ही. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी तुकाराम मुंढे चा संवाद….

ने. ही. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी तुकाराम मुंढे चा संवाद.... आयुक्तांनी दिला विद्यार्थ्यांना गुरुमंत्र! नागभीड:- मिशन IAS चे विभागीय संचालक श्री. मुनीराज कुथे व सहायक शिक्षक मनोज हेमके यांच्या मार्गदर्शनाखाली...

सौंदर्यकरण हवेच, सोबत फुले दांपत्यांचे स्मारक उभारा.

सौंदर्यकरण हवेच, सोबत फुले दांपत्यांचे स्मारक उभारा. इ अ. भा. समता परिषदेची भावनिक मागणी. मूल:- नगरपरिषदेतर्गत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले चौकाच्या सौंदर्यकरणाकरिता...

1 ऑगस्ट ला शहरात ” घर घर मे आयुर्वेद ” शिबीर.

1 ऑगस्ट ला शहरात " घर घर मे आयुर्वेद " शिबीर. मूल:--- गोर गरीबांना निशुल्क आरोग्य सेवा मिळावी व आयुर्वेद व आयुर्वेदाचे मौलिक महत्व घरोघरी...
- Advertisment -spot_img

Breaking News

Popular News