मूल न. प. नगराध्यक्ष पद निवडणूक….
नेत्यांची पाळत, जोरदार भिडंत…!
राजकारण
महेश पानसे.
मुल : महिला आरक्षण असलेल्या मूल नगराध्यक्ष पदाकरिता अखेर कांग्रेस तफै माजी सभापती प़शांत समथॅ यांच्या
‘श्रीमती’ एकता समथॅ तर भा. ज.प. तफै इंजीनियर तथा व्यावसायिक किशोर कापगते यांच्या ‘श्रीमती’ डॉ. प़ा. किरण कापगते यांना मैदानात उतरविण्यात उतरविले. दोहोंपैकी एक ‘ श्रीमती ‘मैदान मारेल व नगराध्यक्ष बनेल. कोण बनेल हे मतदानानंतर ईव्हीएम ठरवेल.
उमेदवार दोन्ही उजवे आहेत यात नगरवासियांना शंका नाही. दोन्ही उमेदवार नगराध्यक्ष पदास न्याय देऊ शकतील. मात्र शेवटी राजकारण आहे. नवनवीन विषय पुढे मांडून विरोधकांना कोंडीत पकडून पुढे राहण्याची हौस उत्साही नेते व कायॅकतॅ बाळगून आहेत. प़चारातून हे लक्षातही येऊ लागले आहे. सुशिक्षित मतदार याकडे कानडोळा करताना दिसतात.
विकासाबाबत बोलण्याचा सल्ला उमेदवारांना देताना दिसतात.
नगराध्यक्ष पदाकरीता इतरही अनेक उमेदवार मैदानात असले तरी काट्याची लढत सौ. किरण कापगते व सौ. एकता समर्थ यांचेमध्येच असणार आहे हे ठरले आहे. निवडणूकीला चार दिवस उरले आहेत. सुधिरभाऊंचे नाव पुढे ठेऊन भारतीय जनता पक्षाने मतदारांना रिझविण्यात आघाडी मिळविण्याची
संधी सोडली नाही हे स्पष्ट पणे जाणवते. पक्षाची हवा जोरात आहे, स्वताचा आत्मविश्वास वाढवून सौ. किरण कापगते हसतमुखाने घरपोच सलामी देत आहेत. विशेष म्हणजे
संपूर्ण प़भागातील 21 भा. ज. पा. उमेदवार नगराध्यक्ष पदाचे उमेदवारास घरोघरी पोहोचविण्यासाठी पुढाकार घेत आहेत ही सौ. किरण कापगते यांची मोठी मिळकत असल्याची चर्चा आहे.
मूल शहरातील ही निवडणूक आ. सुधीर मुनगंटीवार यांचे नाव पुढे करून लढली जात आहे. मूल शहराच्या विकासात आ. मुनगंटीवार यांचा सिंहाचा वाटा आहे जगजाहीर आहे. सुधिरभाऊंचे नावाने चांदी सुद्धा सोन्याचे भावाने इथे विकली जाते, अशात प़त्यक्ष निवडणूकीत इथे उमेदवार आधी आ. सुधिरभाऊंना पुढे करीत असल्याने भा. ज. पा. मंडळींना लढाई सोपी झाली आहे यात शंका नसली तरी नगराध्यक्ष पदाचे निवडणुकीत काँग्रेस वाल्यांनी प़शात समर्थ यांच्या श्रीमती एकता समर्थ यांना पक्षात ओढून मैदानात उतरविल्याने टक्कर
जोरदार आहे.
कारण भूतकाळात भा. ज. पा. वासी असलेले प़शांत समर्थ यांची शहरात पकड मोठी आहे. मात्र भा. ज. पा. उमेदवार सौ. किरण कापगते यांचे तुलनेत एकता समर्थ यांना नेते व पक्षीय बलाची कमतरता जाणविल्यास नवल नसावे.
“गटबाज” येत आहेत चचैत?
निवडणूक म्हंटली की गुटबाज आलीच. मूल नगर परिषद निवडणुकीत सुद्धा गुटबाज चैत्र येत आहे. खास करून नगराध्यक्ष पदाचे निवडणुकीत हे गुटबाज तन, मन, धनाने कामात लागले अशी ओरड सुरू झालेली आहे. भा. ज. पा. कडे सुधिर मुनगंटीवार यांचे सक्षम नेतृत्व असल्याने अनेक गुटबाज छुपे डाव खेळताना दिसत असल्याची चर्चा आहे. शहरात या भा. ज. पा. वासी गुटबाजांची बऱ्यापैकी चलती आहे त्यामुळे
भा. ज. पा. उमेदवारांस सावध राहण्यास शुभचिंतक सांगतात.
कांग्रेस मध्ये छुपे रूस्तम लय आहेत. इथला तसा इतिहास आहे. मात्र कांग्रेस उमेदवारांचे यजमान पैशांत समर्थ गत अनेक सालापासून न. प. राजकारणात मुरले असल्याने जागरूकता असल्याचे बोलले जाते. कांग्रेस प़वेशाआधी व निवडणुकी आधी पेशात समर्थ यानी काही रूस्तम दिग्गजांना खुंटी ला बांधून ठेवल्याचे बोलले जाते.
दोन्ही उमेदवार स्व कामाने, पारिवारिक कायाॅने ‘ श्रीमंत” असल्याने मतदारांनी आपल्या सदविवेक बुद्धीने मतदान
करावे व आदशॅ घडवावा असे जाणकारांना वाटते.



