Monday, August 10, 2026
Google search engine

पैशाच्या वादातून सेवानिवृत्त केंद्र प्रमुखाची हत्या

सावली प्रतिनिधी रोशन बोरकर

मुल : दिनांक २७/०९/२०२५ मुल एम आय डी सी – टेकाडी मार्गावर सेवा निवृत्त केंद्र प्रमुखाचा मृतदेह आढळला, घातपाताची शक्यता असल्याचे मुल पोलिसांच्या तपासात आढळून आल्याने संशयित व्यक्तीला ताब्यात घेऊन झडती घेतली असता हत्या केल्याची कबुली किस्मत मोहम्मद अली सय्यद यांनी दिली असून पुढील तपास सुरू आहे.

मुल तालुक्यातील टेकाडी येथील सेवानिवृत्त केंद्र प्रमुख सुनील कालिदास गेडाम वय ६० वर्ष असे मृतकाचे नाव आहे. तर टेकाडी येथील आरोपी किस्मत मोहम्मद अली सय्यद वय २४ वर्ष, शुक्रवार दिनांक २६/०९/२०२५ ला सायंकाळी ७ वाजता दोघेही सावली मार्गावरील रानसंपन्न हॉटेल येथे जेवण करून एम आय डी सी मार्गाने मुलला परत जातांना आरोपी किस्मत अली याने उसने घेतलेले पैसे देण्यास नकार देत असल्याच्या कारणावरून काही मित्रांच्या मदतीने सुनील गेडाम यांच्या डोक्यावर लोखंडी सळाखिने वार करून हत्या करून पुरावा नष्ट करण्यासाठी मारेगाव – टेकाडी मार्गावरील नाल्यात मृतदेह फेकून दिला.

याच दरम्यान सुनील गेडाम उशीर होऊनही घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला, सुनील गेडाम यांना घरून बोलावून नेणाऱ्या किस्मत अली याच्यावर शंका आल्याने मुलगा पंकज गेडाम यांनी पोलिस स्टेशन मुल येथे हरवल्याची तक्रार दाखल केली. दरम्यान आकापुर जवळील वळण मार्गावर सुनील गेडाम यांची पल्सर गाडी, मोबाईल, चश्मा आणि चप्पल दिसत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

मुल पोलिसांनी संशयित म्हणून किस्मत अली याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता उसने घेतलेले सहा लाख रुपये देण्यास नकार दिल्याच्या वादातून जीव मारल्याची कबुली देऊन प्रेत लपविल्याचे ठिकाण पोलिसांना सांगितले. घटनेतील आरोपी याचा गुरे खरेदी विक्रीचा व्यवसाय असल्याने सदर प्रकरणात पुन्हा काही जणांचा सहभाग असल्याचे बोलल्या जात आहे पुढील तपास पोलीस स्टेशन मुल करीत आहे.

RELATED ARTICLES

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुका मध्ये २ ऑक्टोबरला इंटकचे राष्ट्रीय अधिवेशन

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुका मध्ये २ ऑक्टोबरला इंटकचे राष्ट्रीय अधिवेशन अधिवेशनाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजन समितीची बैठक. चंद्रपूर, दि. ९ ऑगस्ट २०२६  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे...

ने. ही. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी तुकाराम मुंढे चा संवाद….

ने. ही. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी तुकाराम मुंढे चा संवाद.... आयुक्तांनी दिला विद्यार्थ्यांना गुरुमंत्र! नागभीड:- मिशन IAS चे विभागीय संचालक श्री. मुनीराज कुथे व सहायक शिक्षक मनोज हेमके यांच्या मार्गदर्शनाखाली...

सौंदर्यकरण हवेच, सोबत फुले दांपत्यांचे स्मारक उभारा.

सौंदर्यकरण हवेच, सोबत फुले दांपत्यांचे स्मारक उभारा. इ अ. भा. समता परिषदेची भावनिक मागणी. मूल:- नगरपरिषदेतर्गत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले चौकाच्या सौंदर्यकरणाकरिता...

1 ऑगस्ट ला शहरात ” घर घर मे आयुर्वेद ” शिबीर.

1 ऑगस्ट ला शहरात " घर घर मे आयुर्वेद " शिबीर. मूल:--- गोर गरीबांना निशुल्क आरोग्य सेवा मिळावी व आयुर्वेद व आयुर्वेदाचे मौलिक महत्व घरोघरी...

राज्य पत्रकार संघ राज्य अध्यक्ष (निवड समिती) पदी प्रा. महेश पानसे.

राज्य पत्रकार संघ राज्य अध्यक्ष (निवड समिती) पदी प्रा. महेश पानसे. मुंबई :- ( विशेष प़तिनिधी) महाराष्ट्र राज्यातील अग्रगण्य व सर्वात मोठ्या पत्रकार संघ असलेल्या महाराष्ट्र...
- Advertisment -spot_img

Breaking News

Popular News