सनराईज मल्टिपर्पज ऑर्गनायझेशन, मूल तर्फे स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, मूल येथे महाराष्ट्र कृषी दिन साजरा
मूल : – सनराईज मल्टिपर्पज ऑर्गनायझेशन, मूल तर्फे मूल येथील स्वामी विवेकानंद विद्या मंदिर, मूल येथे महाराष्ट्र कृषी दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. महाराष्ट्रात 1 जुलै हा दिवस ‘कृषी दिन’ म्हणून साजरा केला जातो. हा दिवस राज्यातील शेतकऱ्यांच्या अथक परिश्रमाला आणि त्यांच्या कृषी क्षेत्रातील योगदानाला समर्पित आहे.
महाराष्ट्र कृषी दिन हा माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनी साजरा केला जातो. वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रात क्रांती घडवून आणली. त्यांच्या नेतृत्वाखाली हरित क्रांतीला चालना मिळाली, ज्यामुळे शेती उत्पादनात लक्षणीय वाढ झाली. त्यांच्या या योगदानामुळे हा दिवस शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ आणि त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी साजरा केला जातो. कार्यक्रमाप्रसंगी स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, मूल येथील मुख्याध्यापक नितीन घरोटे सर यांनी कृषी दिनाचे महत्त्व पटवून दिले व त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी सनराईज मल्टिपर्पज ऑर्गनायझेशन, मूल चे
अध्यक्ष, तन्मय उराडे, सनराईज मल्टिपर्पज ऑर्गनायझेशन, मूल चे उपाध्यक्ष अंकुश वाणी,सनराईज मल्टिपर्पज ऑर्गनायझेशन, मूल चे
सचिव, संकल्प गणवीर,सनराईज मल्टिपर्पज ऑर्गनायझेशन, मूल चे सहसचिव, जय मोहुर्ले, सनराईज मल्टिपर्पज ऑर्गनायझेशन, मूल चे कोशाद्यक्ष, प्रतीक लेनगुरे.
सनराईज मल्टिपर्पज ऑर्गनायझेशन, मूल चे
सदस्य रोशन मोहुर्ले.
यांनी यशस्वीरित्या कार्यक्रम राबवला.


