Wednesday, June 24, 2026
Google search engine
HomeBusinessNewsसावली तालुका काँग्रेस कमेटीची एक दिवसीय लक्षणिक उपोषणाची सांगता.

सावली तालुका काँग्रेस कमेटीची एक दिवसीय लक्षणिक उपोषणाची सांगता.

सावली तालुका काँग्रेस कमेटीची एक दिवसीय लक्षणिक उपोषणाची सांगता.

ओ.बी.सी. समाजाची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे ही प्रमुख मागणी

शेकडो कार्यकर्ते व समाज बांधवांची उत्स्फूर्त उपस्थिती

सावली प्रतिनिधी रोशन बोरकर

सावली तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने ओबीसी समाजाची स्वतंत्र जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे या प्रमुख मागणीसाठी गुरुवार, दिनांक २६ फेब्रुवारी २०२६ रोजी तहसील कार्यालय समोर, सावली, जि. चंद्रपूर येथे एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाचे आयोजन करण्यात आले होते.

या आंदोलनाला शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पाठिंबा दर्शविला. ओबीसी समाजाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात न्याय, हक्क आणि राजकीय तसेच प्रशासकीय प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी जातनिहाय जनगणना होणे अत्यावश्यक असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

यावेळी सावली तहसील प्रशासनाच्या माध्यमातून भारत सरकार व संबंधित मंत्रालयात ओ.बी.सी. समाजाची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे या प्रमुख मागणीला घेऊन निवेदन देण्यात आले.प्रस्तुत निवेदनात म्हटले आहे की,२२ जानेवारी २०२६ रोजी भारताच्या रजिस्ट्रार जनरलच्या कार्यालयातून जारी झालेल्या भारत सरकारच्या राजपत्रात, २०२७ मध्ये घरांची यादी आणि घरांच्या गणनेसाठी सर्व व्यक्तींना प्रश्न विचारण्यासाठी ३३ प्रश्नांची यादी तयार करण्यात आली आहे, १२ व्या प्रश्न यादीमध्ये, कुटुंब प्रमुख अनुसूचित जाती/अनुसूचित जमातीचा आहे की नाही आणि इतर संबंधित माहिती विचारण्यात आली आहे, परंतु त्यात इतर मागासवर्गीय (ओबीसी) यांचा उल्लेख केलेला नाही.३० एप्रिल २०२५ रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत, जात-आधारित जनगणना करण्याचा निर्णय घेण्यात आला.केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्याची माहिती प्रेस मीडियाला दिली होती, परंतु २२ जानेवारी २०२६ च्या राजपत्रात इतर मागासवर्गीय (ओबीसी) वर्गाचा स्पष्ट उल्लेख नसल्याने समाजात संभ्रम निर्माण झाला आहे, सरकारच्या हेतूबद्दल प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत, कृपया मागासवर्गीय वर्गाचे नवीन राजपत्र काढून हा गोंधळ दूर करा ही मागणी करण्यात आली आहे.

सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहने यांनी आपल्या भाषणात सांगितले की, ओबीसी समाजाच्या अस्तित्वाचा, अधिकारांचा आणि विकासाचा प्रश्न या जनगणनेशी निगडित आहे. त्यामुळे ही लढाई केवळ आकड्यांची नसून, सामाजिक न्यायाची लढाई आहे. सर्व समाजबांधवांनी एकजूट ठेवून हा संघर्ष अधिक तीव्र करावा, असे आवाहन त्यांनी केले.

लाक्षणिक उपोषणाला सावली तालुका काँग्रेसचे अध्यक्ष नितीन गोहने,महिला तालुका अध्यक्षा उषा भोयर,नगराध्यक्ष साधना वाढई,युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष किशोर कारडे,कृषी उत्पन्न बाजार समिती सावलीचे सभापती राजू पाटील ठाकरे,माजी सभापती प.स.सावली राकेश पाटील गड्डमवार,माजी सभापती प.स.सावली विजय कोरेवार,उपनगराध्यक्ष संदीप पुण्यपकार,माजी नगराध्यक्ष लता लाकडे,माजी युवक काँग्रेस तालुका काँग्रेस आशिष मंबतुलवार,कृषी.उ.बा.संचालक नरेश सुरमवार,सुनील बोमनवार,माजी संचालक खुशाल लोडे,ग्राम काँग्रेस अध्यक्ष मोखाळा अनिल मशाखेत्रि,ग्राम काँग्रेस अध्यक्ष उसेगाव सुनील पाल,ग्राम काँग्रेस अध्यक्ष वाघोली टिकाराम रोहनकर,ग्राम काँग्रेस अध्यक्ष लोंढोली दिलीप लटारे,ग्राम काँग्रेस बोथलीचे अध्यक्ष विजय गड्डमवार, ग्राम काँग्रेस अध्यक्ष सोनापूर डोमाजी शेंडे,जेष्ठ काँग्रेस पदाधिकारी प्रकाश घोटेकर,दिवाकर काचिनवार,अनिल गुरुनुले,दिपक जवादे,प्रमोद खोबे,चंद्रकांत संतोषवार तसेच नगरसेवक सचिन संगीडवार, प्रीतम गेडाम,गुणवंत सुरमवार,नितेश रस्से,नगरसेविका ज्योती शिंदे,सीमा संतोषवार,युवा पदाधिकारी श्रीकांत बहिरवार,राकेश घोटेकर,संदीप सायत्रावार,रोशन बोरकर,भाऊराव कोठारे,प्रल्हाद भोयर,प्रवीण गेडाम, कुणाल मालवणकर, आकाश कोरडे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व कार्यकर्ते व समाजबांधवांचे सावली तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

RELATED ARTICLES

मूल न. प. ॲक्शन मोडवर…. मान्सूनपूर्व तयारी सुरू.

मूल न. प. ॲक्शन मोडवर.... मान्सूनपूर्व तयारी सुरू.  मूल;-- उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची चणचण दूर सारण्याकरीता न. प. ची जरा दमछाक झाली खरी पण गाडी रूळावर आणून...

श्रीगुरूदेव भक्त डॉ. विठ्ठलराव बोरकुटे यांचे निधन.

श्रीगुरूदेव भक्त डॉ. विठ्ठलराव बोरकुटे यांचे निधन. नागभीड:- वंदनीय तुकडोजी महाराज यांचे सहवासात ज्यांचे बालपण गेले, महाराजांच्या विचारांनी ज्यांनी आयुष्यभर निस्वार्थ पणे रुग्ण सेवा दिली असे नवेगाव...

मूल न. प. ॲक्शन मोडवर….

मूल न. प. ॲक्शन मोडवर.... मान्सूनपूर्व तयारी सुरू. मूल;- उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची चणचण दूर करण्याकरीता न. प. ची जरा दमछाक झाली खरी पण गाडी रूळावर आणून...

शिक्षक आमदारांच्या उपस्थितीत महामानवांची जयंती संपन्न.

शिक्षक आमदारांच्या उपस्थितीत महामानवांची जयंती संपन्न. चंद्रपूर/मूल :- विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शिक्षक आमदार सुधाकरराव अडबाले यांच्या उपस्थितीत नवभारत विदयालय तथा कनिष्ट विज्ञान...

जागतिक आरोग्य दिन दिनांक : ७ एप्रिल २०२६ ‘आरोग्यम् धनसंपदा’

जागतिक आरोग्य दिन दिनांक : ७ एप्रिल २०२६ 'आरोग्यम् धनसंपदा' डॉ. ज्योत्स्ना प्रभाकर राऊत (येलमुले) मराठी विभाग महिला महाविद्यालय, गडचिरोली "आरोग्य परमं भाग्य स्वास्थ सर्वार्थसाधनम शरीरमाद्य खलू धर्मसाधनम"...
- Advertisment -spot_img

Breaking News

Popular News