Sunday, August 9, 2026
Google search engine
HomeBusinessNewsनवभारत विद्यालयात गाडगे महाराज जयंती साजरी.

नवभारत विद्यालयात गाडगे महाराज जयंती साजरी.

नवभारत विद्यालयात गाडगे महाराज जयंती साजरी.

मूल:- शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित नवभारत विद्यालय, कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय, एम सी व्हि सी मुल येथे थोर समाजसुधारक संत गाडगे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.विदयालयातील स्काऊट गाईड, राष्ट्रीय हरीत सेना यांनी स्वच्छता अभियान राबवून
जयंती साजरी केली हे विशेष.

सर्वप्रथम सामुहिक प्रार्थनेनी कार्यक्रमाची सुरुवात झाली
कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री छत्रपती बारसागडे होते. प्रमुख अतिथी म्हणून विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सौ. वषाॅ भांडारकर , जेष्ठ शिक्षक श्री गुरुदास चौधरी तसेच सर्व शिक्षक वृंद होते. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री छत्रपती बारसागडे यांनी संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.माथनकर सरांनी केले.. त्यानंतर जेष्ठ शिक्षक श्री गुरुदास चौधरी यांनी गाडगे महाराज यांच्या कार्याचे विस्तृत असे वर्णन केले..
त्यानंतर गाडगे महाराज यांच्या थोर कार्याची माहिती विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सौ.भांडारकर मॅडम ने आपल्या भाषणातून दिली

संत गाडगेबाबांनी विवेकाच्या खराट्याने गावोगावी फिरून लोकांची मने स्वच्छ केली. साक्षरतेचा प्रचार-प्रसार केला. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात स्वच्छतेची शिकवण देऊन समाज सुधारणा करणारे ते थोर संत होते, असे प्रतिपादन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री बारसागडे यांनी केले.
कार्यक्रमाला शाळेचे सर्व शिक्षकवृंद ,प्राध्यापक, विद्यार्थी विद्यार्थिनी, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ने. ही. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी तुकाराम मुंढे चा संवाद….

ने. ही. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी तुकाराम मुंढे चा संवाद.... आयुक्तांनी दिला विद्यार्थ्यांना गुरुमंत्र! नागभीड:- मिशन IAS चे विभागीय संचालक श्री. मुनीराज कुथे व सहायक शिक्षक मनोज हेमके यांच्या मार्गदर्शनाखाली...

सौंदर्यकरण हवेच, सोबत फुले दांपत्यांचे स्मारक उभारा.

सौंदर्यकरण हवेच, सोबत फुले दांपत्यांचे स्मारक उभारा. इ अ. भा. समता परिषदेची भावनिक मागणी. मूल:- नगरपरिषदेतर्गत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले चौकाच्या सौंदर्यकरणाकरिता...

1 ऑगस्ट ला शहरात ” घर घर मे आयुर्वेद ” शिबीर.

1 ऑगस्ट ला शहरात " घर घर मे आयुर्वेद " शिबीर. मूल:--- गोर गरीबांना निशुल्क आरोग्य सेवा मिळावी व आयुर्वेद व आयुर्वेदाचे मौलिक महत्व घरोघरी...

राज्य पत्रकार संघ राज्य अध्यक्ष (निवड समिती) पदी प्रा. महेश पानसे.

राज्य पत्रकार संघ राज्य अध्यक्ष (निवड समिती) पदी प्रा. महेश पानसे. मुंबई :- ( विशेष प़तिनिधी) महाराष्ट्र राज्यातील अग्रगण्य व सर्वात मोठ्या पत्रकार संघ असलेल्या महाराष्ट्र...

श्रीगुरूदेव आदिवासी सेवा छात्रालय अध्यक्षपदी प्रा. महेश पानसे.

श्रीगुरूदेव आदिवासी सेवा छात्रालय अध्यक्षपदी प्रा. महेश पानसे. नागभीड:-- वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पावन हस्ते सुभारंभ करण्यात आलेल्या श्रीगुरूदेव आदिवासी सेवा छात्रालय अध्यक्षपदी प़ा. महेश...
- Advertisment -spot_img

Breaking News

Popular News