Sunday, August 9, 2026
Google search engine
HomeBusinessNewsगणराज्य दिनानिमित्त उपजिल्हा रूग्णालयात विशेष कार्यक्रम.

गणराज्य दिनानिमित्त उपजिल्हा रूग्णालयात विशेष कार्यक्रम.

गणराज्य दिनानिमित्त उपजिल्हा रूग्णालयात विशेष कार्यक्रम.

मूल:- उपजिल्हा रुग्णालय मूल येथे 77 वा गणराज्य दिन उपजिल्हा रुग्णालयात विशेष उपक्रम घेऊन साजरा करण्यात आला. वैद्यकिय अधिक्षक डॉ . बंडू रामटेके यांच्या हस्ते तिरंगा फडकविण्यात आला व मानवंदना देण्यात आली. येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. तिरथ उराडे यांनी खास उपजिल्हा रूग्णालयाकरीता भेट दिलेल्या दुमिंळ तैलचित्र ज्यामध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे डॉ. राजेंद्र प्रसाद यांना संविधान सुपूर्द करीत असताना चे ऐतिहासिक प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करण्यात आली. वैद्यकीय अधिक्षक डॉ. बंडू रामटेके यांनी संविधानातील नागरिकांचे कर्तव्य समजावून सांगितले व प्रत्येक भारतीय नागरिकाने आपले कर्तव्य काटेकोरपने बजावल्यास भारत देश समृध्द होईल अशी ग्वाही दिली.

सर्वअधिकारी व कमॅचारी यांनीआपल्या रुग्णालयातून उच्च दर्जाच्या सेवा प्रदान कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली. उपजिल्हा रुग्णालयात राष्ट्रीय असंसर्ग कार्यक्रमाअंतर्गत कार्यरत असलेल्या अधिपरिचारिका श्रीमती विजया शिवणकर यांंचा त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्धल व जिल्हास्तरावर गणराज्यदिनी सत्कार करण्यात आला त्याबद्दल उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ.बंडू रामटेके यांनी सन्मान करून अभिनंदन केले डॉ. तिरथ उराडे वैद्यकीय अधिकारी यांनी भारतीय नागरिकांनी वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासून समाजातील अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
वैद्यकीय अधिकारी डॉ. देवतळे यांनी भारतीय नागरिकांनी संविधानातील समतेचे तत्व सर्व नागरिकांनी आत्मसात करून समाजात सामाजीक समता प्रस्थापित करून देशाची प्रगती साधावी असे विचार मांडले.
डॉ. देवेंद्र लाडे यांनी देशातील नागरिकांमध्ये बंधुभाव वृद्धिंगत झाल्याशिवाय समता स्वातंत्र्य न्याय ही लोकशाहीची मूलभूत तत्वे दृढ होणार नाहीत असे विचार व्यक्त केले राष्ट्रीय अंससर्गिक विभाग मुल च्या समुपदेशक ममता शेंडे यांनी तंबाखुमुक्त भारत अभियान अंतर्गत सर्वांना शपथ दिली.
कुष्ठरोग तंत्रज्ञ श्री रंगारी यांनी कुष्ठरोग मुक्त भारत बनविणे बाबत शपथ दिली.डॉ.परचाके यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार प्रदर्शन समुपदेशक श्रीमती ममता शेंडे यांनी केले.

RELATED ARTICLES

ने. ही. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी तुकाराम मुंढे चा संवाद….

ने. ही. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी तुकाराम मुंढे चा संवाद.... आयुक्तांनी दिला विद्यार्थ्यांना गुरुमंत्र! नागभीड:- मिशन IAS चे विभागीय संचालक श्री. मुनीराज कुथे व सहायक शिक्षक मनोज हेमके यांच्या मार्गदर्शनाखाली...

सौंदर्यकरण हवेच, सोबत फुले दांपत्यांचे स्मारक उभारा.

सौंदर्यकरण हवेच, सोबत फुले दांपत्यांचे स्मारक उभारा. इ अ. भा. समता परिषदेची भावनिक मागणी. मूल:- नगरपरिषदेतर्गत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले चौकाच्या सौंदर्यकरणाकरिता...

1 ऑगस्ट ला शहरात ” घर घर मे आयुर्वेद ” शिबीर.

1 ऑगस्ट ला शहरात " घर घर मे आयुर्वेद " शिबीर. मूल:--- गोर गरीबांना निशुल्क आरोग्य सेवा मिळावी व आयुर्वेद व आयुर्वेदाचे मौलिक महत्व घरोघरी...

राज्य पत्रकार संघ राज्य अध्यक्ष (निवड समिती) पदी प्रा. महेश पानसे.

राज्य पत्रकार संघ राज्य अध्यक्ष (निवड समिती) पदी प्रा. महेश पानसे. मुंबई :- ( विशेष प़तिनिधी) महाराष्ट्र राज्यातील अग्रगण्य व सर्वात मोठ्या पत्रकार संघ असलेल्या महाराष्ट्र...

श्रीगुरूदेव आदिवासी सेवा छात्रालय अध्यक्षपदी प्रा. महेश पानसे.

श्रीगुरूदेव आदिवासी सेवा छात्रालय अध्यक्षपदी प्रा. महेश पानसे. नागभीड:-- वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पावन हस्ते सुभारंभ करण्यात आलेल्या श्रीगुरूदेव आदिवासी सेवा छात्रालय अध्यक्षपदी प़ा. महेश...
- Advertisment -spot_img

Breaking News

Popular News