Wednesday, July 15, 2026
Google search engine
HomeBusinessNewsमूल- मारोडयातील सट्टा, जुगार, अवैध दारू विक्री ची लागली नजर?

मूल- मारोडयातील सट्टा, जुगार, अवैध दारू विक्री ची लागली नजर?

मूल- मारोडयातील सट्टा, जुगार, अवैध दारू विक्री ची लागली नजर?

“सोमनाथ ” पर्यटन स्थळाचा होत
आहे पचका?

लक्षवेधी
महेश पानसे.

मुल: जिल्ह्यातील मूल तालुका मुख्यालयापासून 7 कि. मी. अंतरावर विस्थापित पुरातन व निसर्गरम्य ” सोमनाथ ” देवस्थान परिसरास शासनाने ‘ब ‘ वर्ग पर्यटन स्थळ घोषित केले. क्षेत्राचे आमदार तथा माजी अर्थ व वनमंत्री सुधिर मुनगंटीवार यांनी या विलोभनीय परिसराकरीता तब्बल शंभरावर कोटीचा निधी आणून या परिसरास स्वर्ग बनविले. पर्यटकांचा मोठा लोंढा या पर्यटन स्थळाकडे आकषिंत झाला खरा मात्र या देवस्थान परिसराचे प्रवेशद्धारातच जुगार, सट्टा व तुफान सुरू असलेल्या अवैध दारू अडडयांनी पयॅटकांचे स्वागत होत असल्याने सोमनाथ परिसर अप़ेक्षणीय ठरू लागल्याची ओरड सुरू झाली आहे.

मूल शहरापासून अवघ्या 7 कि. मी. अंतरावर हेमाडपंथी पुरातन देवस्थान वनराईने नटलेल्या जंगलव्याप्त डोंगरांवर वसलेले आहे. पुरातन महादेव मंदीर पावन असल्याची श्रद्धा भाविकांना सतत आकर्षित करीत राहीली आहे. या देवालय परिसरापासून अवघ्या किलोमीटर अंतरावर पद्मश्री बाबा आमटे यांचे प्रसिद्ध ‘ आमटे फॉर्म’ वसलेले आहे.

पुरातन सोमनाथ देवस्थान, लागून असलेले प्रसिद्ध आमटे फॉर्म , वनराईने नटलेला सभोवतालचा डौलदार ताडोबा-अधारी वनक्षेत्र लक्षात घेऊन शासनाने तब्बल शंभरावर कोटीचा निधी खर्च करुन या क्षेत्राला ‘ ब’ दजाॅचे प़ेक्षणीय स्थळ घोषीत केले. ताडोबा क्षेत्र पयॅटनासाठी खास एन्ट्री गेट’ सुरू करण्यात आले. मात्र मूल शहराबाहेर निघताच सराॅस सुरू झालेल्या बेकायदेशीर भाल धंदयांनी या पयॅटन स्थळाचा पार पचका करून टाकल्याची खंत व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES

ने.हि.विद्यालयात गणवेश वितरण सोहळा उत्साहात संपन्न.

ने.हि.विद्यालयात गणवेश वितरण सोहळा उत्साहात संपन्न. जिद्द व चिकाटी हिच यशाचा गुरुमंत्र ....... अशोकजी भैया नागभीड;--- जिद्द, चिकाटी, परिश्रम व संस्कार यातूनच सुसंस्कृत व यशस्वी विद्यार्थी घडतात....

सनराईज मल्टिपर्पज ऑर्गनायझेशन, मूल तर्फे स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, मूल येथे महाराष्ट्र कृषी दिन साजरा

सनराईज मल्टिपर्पज ऑर्गनायझेशन, मूल तर्फे स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, मूल येथे महाराष्ट्र कृषी दिन साजरा  मूल : - सनराईज मल्टिपर्पज ऑर्गनायझेशन, मूल तर्फे मूल येथील स्वामी...

मूल न. प. ॲक्शन मोडवर…. मान्सूनपूर्व तयारी सुरू.

मूल न. प. ॲक्शन मोडवर.... मान्सूनपूर्व तयारी सुरू.  मूल;-- उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची चणचण दूर सारण्याकरीता न. प. ची जरा दमछाक झाली खरी पण गाडी रूळावर आणून...

श्रीगुरूदेव भक्त डॉ. विठ्ठलराव बोरकुटे यांचे निधन.

श्रीगुरूदेव भक्त डॉ. विठ्ठलराव बोरकुटे यांचे निधन. नागभीड:- वंदनीय तुकडोजी महाराज यांचे सहवासात ज्यांचे बालपण गेले, महाराजांच्या विचारांनी ज्यांनी आयुष्यभर निस्वार्थ पणे रुग्ण सेवा दिली असे नवेगाव...

मूल न. प. ॲक्शन मोडवर….

मूल न. प. ॲक्शन मोडवर.... मान्सूनपूर्व तयारी सुरू. मूल;- उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची चणचण दूर करण्याकरीता न. प. ची जरा दमछाक झाली खरी पण गाडी रूळावर आणून...
- Advertisment -spot_img

Breaking News

Popular News