Sunday, August 9, 2026
Google search engine
HomeBusinessNewsनवभारत विद्यालय, मुल येथील "प्रेरणोत्सव वार्षिक स्नेहसंमेलन" उत्साहात संपन्न

नवभारत विद्यालय, मुल येथील “प्रेरणोत्सव वार्षिक स्नेहसंमेलन” उत्साहात संपन्न

नवभारत विद्यालय, मुल येथील “प्रेरणोत्सव वार्षिक स्नेहसंमेलन” उत्साहात संपन्न

मुल दिनांक 24 डिसेंबर 2025 रोजी शिक्षण प्रसारक मंडळ मुल द्वारा संचालित नवभारत विद्यालय, कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय एम सी व्ही सी मुल मध्ये नुकतेच प्रेरणोत्सव’ या थीमवर आधारित वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अशोक झाडे सर होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सौ वर्षा भांडारकर, ज्येष्ठ शिक्षक गुरुदास चौधरी, प्रा.महेश पानसे, प्रा.किसन वासाडे, प़ा. संजय
येरोजवार, प्रा.काटकर, प्रा.पुस्तोडे, प्रा.डॉ.कामडी, प्रा.येलमुले, प्रा.बोलीवार, प्रा. पठाण उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात संस्थापक अध्यक्ष दलितमित्र माजी खासदार स्व.वि तु.नागपुरे साहेब आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे दीपप्रज्वलन आणि स्वागतगीताने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनीने गणनायकाय सुंदर नृत्य सादर केले आणि उपस्थितांची मने जिंकली. सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे दर्शन घडले.

दिनांक 23 डिसेंबर 2025 रोजी विद्यार्थ्यांनी एकल नृत्य, समूह नृत्य, नाटिका, एकपात्री प्रयोग सादर केले. सर्व स्पर्धेचे बक्षिस वितरण करण्यात शिक्षकवृंदाच्या हस्ते करण्यात आले.
वार्षिक अहवालवाचन विद्यालयाचे शिक्षक श्री निलेश माथनकर यांनी केले. प्राचार्य श्री अशोक झाडे सर यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध कार्यक्रम उपयुक्त ठरतात. पुस्तकी अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांनी विविध कला, चांगले छंद जोपासावेत. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा कार्यक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका कु. माधुरी तलांडे, शिक्षक श्री ताराचंद निमसरकर यांनी केले. विद्यार्थी प्रतिनिधी कु. दिक्षा बनकर, कु. किर्ती बनकर यांनी विद्यार्थ्यांचे बक्षिस वितरण पार पाडले. प्रा. कु. उगेमुगे मॅडम यांनी शिक्षकांची सविस्तर माहिती देऊन सन्मान केला. उपस्थितांचे आभार कु. श्रद्धा कावळे हिने मानले. कार्यक्रमाला शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेचे शिक्षक प्रतिमा उमक, विकास मोडक,राजू बोढे, विजय निखारे,चैतन्य पुप्पलवार, भारत सलाम, पुनमचंद वाळके,सुनिल चौधरी, उदय चौधरी, कु. दिपा गोंगल आणि शिक्षकेत्तर कर्मचारी विजय नागपुरे,मनीषा मडावी, संगीता टांगले, राहुल नागपुरे यांनी अथक परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

ने. ही. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी तुकाराम मुंढे चा संवाद….

ने. ही. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी तुकाराम मुंढे चा संवाद.... आयुक्तांनी दिला विद्यार्थ्यांना गुरुमंत्र! नागभीड:- मिशन IAS चे विभागीय संचालक श्री. मुनीराज कुथे व सहायक शिक्षक मनोज हेमके यांच्या मार्गदर्शनाखाली...

सौंदर्यकरण हवेच, सोबत फुले दांपत्यांचे स्मारक उभारा.

सौंदर्यकरण हवेच, सोबत फुले दांपत्यांचे स्मारक उभारा. इ अ. भा. समता परिषदेची भावनिक मागणी. मूल:- नगरपरिषदेतर्गत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले चौकाच्या सौंदर्यकरणाकरिता...

1 ऑगस्ट ला शहरात ” घर घर मे आयुर्वेद ” शिबीर.

1 ऑगस्ट ला शहरात " घर घर मे आयुर्वेद " शिबीर. मूल:--- गोर गरीबांना निशुल्क आरोग्य सेवा मिळावी व आयुर्वेद व आयुर्वेदाचे मौलिक महत्व घरोघरी...

राज्य पत्रकार संघ राज्य अध्यक्ष (निवड समिती) पदी प्रा. महेश पानसे.

राज्य पत्रकार संघ राज्य अध्यक्ष (निवड समिती) पदी प्रा. महेश पानसे. मुंबई :- ( विशेष प़तिनिधी) महाराष्ट्र राज्यातील अग्रगण्य व सर्वात मोठ्या पत्रकार संघ असलेल्या महाराष्ट्र...

श्रीगुरूदेव आदिवासी सेवा छात्रालय अध्यक्षपदी प्रा. महेश पानसे.

श्रीगुरूदेव आदिवासी सेवा छात्रालय अध्यक्षपदी प्रा. महेश पानसे. नागभीड:-- वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पावन हस्ते सुभारंभ करण्यात आलेल्या श्रीगुरूदेव आदिवासी सेवा छात्रालय अध्यक्षपदी प़ा. महेश...
- Advertisment -spot_img

Breaking News

Popular News