Sunday, August 9, 2026
Google search engine
HomeBusinessNewsश्री विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या प्रयत्नना यश

श्री विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या प्रयत्नना यश

राज्याचे काँग्रेस विधिमंडळ नेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार माननीय श्री विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या प्रयत्नना यश

सावली प्रतिनिधी रोशन बोरकर

सावली :- दिनांक – २०/१२/२०२५ विविध सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष  श्री खुशाल लोडे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे चिमुर, सिंदेवाही, पाथरी, पालेबारसा, निफंद्रा, व्याहाड, गडचिरोली महामंडळाची एसटी बस दिनांक २५ आगस्ट २०१० पासून नियमित सुरु होती. परंतु मागील ८ ते १० महिन्यापासुन बस बंद करण्यात आली होती.

 

याबाबतीत दिनांक २४ नोव्हेंबर २०२५ ला परिवहन मंत्री, परीवहन आयुक्त आणि विभाग नियंत्रक चंद्रपूर यांना बस सुरु करण्यासाठी पत्राद्वारे मागणी रेटून धारली. राज्याचे काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते माननीय श्री विजय भाऊ वडेट्टीवार दोन दिवसापूर्वी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना चंद्रपूर येथील विभाग नियंत्रकाला फोन द्वारे संबंधित बस सेवा सुरू लवकरात लवकर सुरू करावी अशा सूचना दिल्या.
त्यांच्या सूचनांचा पालन करून २३ डिसेंबर २०२५ रोजी चिमूर सिंदेवाही पाथरी पालेबारसा निफंद्रा व्याहाड गडचिरोली मार्गे बस सुरू करण्यात येईल अशा आशयाचे पत्र महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ विभाग चंद्रपूर च्या वतीने २०- १२ -२०२५ रोजी श्री खुशाल लोडे अध्यक्ष विविध सेवा सहकारी संस्था यांचे नावे पत्र काढून बस सुरू करण्यात येईल असे कळविण्यात आले. राज्याचे विधिमंडळ पक्षनेते तथा लोकप्रिय आमदार माननीय श्री विजय भाऊ वडेट्टीवार साहेब यांच्या प्रयत्नामुळे आणि श्री खुशाल लोडे यांच्या पाठपुराव्यामुळे बंद झालेली बस पुन्हा पूर्ववत सुरू होत आहे.

RELATED ARTICLES

ने. ही. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी तुकाराम मुंढे चा संवाद….

ने. ही. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी तुकाराम मुंढे चा संवाद.... आयुक्तांनी दिला विद्यार्थ्यांना गुरुमंत्र! नागभीड:- मिशन IAS चे विभागीय संचालक श्री. मुनीराज कुथे व सहायक शिक्षक मनोज हेमके यांच्या मार्गदर्शनाखाली...

सौंदर्यकरण हवेच, सोबत फुले दांपत्यांचे स्मारक उभारा.

सौंदर्यकरण हवेच, सोबत फुले दांपत्यांचे स्मारक उभारा. इ अ. भा. समता परिषदेची भावनिक मागणी. मूल:- नगरपरिषदेतर्गत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले चौकाच्या सौंदर्यकरणाकरिता...

1 ऑगस्ट ला शहरात ” घर घर मे आयुर्वेद ” शिबीर.

1 ऑगस्ट ला शहरात " घर घर मे आयुर्वेद " शिबीर. मूल:--- गोर गरीबांना निशुल्क आरोग्य सेवा मिळावी व आयुर्वेद व आयुर्वेदाचे मौलिक महत्व घरोघरी...

राज्य पत्रकार संघ राज्य अध्यक्ष (निवड समिती) पदी प्रा. महेश पानसे.

राज्य पत्रकार संघ राज्य अध्यक्ष (निवड समिती) पदी प्रा. महेश पानसे. मुंबई :- ( विशेष प़तिनिधी) महाराष्ट्र राज्यातील अग्रगण्य व सर्वात मोठ्या पत्रकार संघ असलेल्या महाराष्ट्र...

श्रीगुरूदेव आदिवासी सेवा छात्रालय अध्यक्षपदी प्रा. महेश पानसे.

श्रीगुरूदेव आदिवासी सेवा छात्रालय अध्यक्षपदी प्रा. महेश पानसे. नागभीड:-- वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पावन हस्ते सुभारंभ करण्यात आलेल्या श्रीगुरूदेव आदिवासी सेवा छात्रालय अध्यक्षपदी प़ा. महेश...
- Advertisment -spot_img

Breaking News

Popular News