Monday, April 27, 2026
Google search engine
HomeBusinessELECTiON TiMESमुल नगर परिषद निवडणूक-2025.  "स्वतः च्या हिम्मतीवर लढा ना राजे हो...!! "

मुल नगर परिषद निवडणूक-2025.  “स्वतः च्या हिम्मतीवर लढा ना राजे हो…!! “

मुल नगर परिषद निवडणूक-2025. 
“स्वतः च्या हिम्मतीवर लढा
ना राजे हो…!! “

इतकी वर्षे आपले सत्ता भोगी नगरसेवक उमेदवार म्हणून कार्यकर्तृत्व शुन्य पण बोलबाला बड्या नेत्यांचा
व्वा रे राजकर्तानो ..!!
इतके वर्ष सत्ता भोगून गल्लीत आपला परिचय नाही वॉर्ड चा काय घेऊन बसलात उमेदवार हो…?

★हा प्रश्न जनतेला पडलाय ना..?

आपल्या कार्यातून जनतेशी नाळ जोडा आणि जा ना मतांचा जोगवा मागायला…!! हा प्रामाणिक सवाल आहे तुम्हाला….तुम्ही स्वतः सक्षम आहात ना तुम्हाला कोण नाकारतयं पण* *बड्या राजकीय नेता तुमच्या कडे सांगायला राहिले काय?

नगरपरिषद निवडणूक पुरते गाजर आणि मग मूळा हातात देणारे आपण काय सांगणार….?

त्यासाठी ग्राउंड लेव्हल वर जनतेची कामे कराव लागते सत्ता आहे म्हणून पाच वर्ष दिसेनासे झालात आणि आता फिरताय लाडक्या बहिणीचा , लाडक्या भावाचा मूलमंत्र सांगत आणि गाजर फिरवत बड्या राजकीय नेत्यांचे पोस्टर बॅनर लावून जसे काय तुम्ही विधानसभा लोकसभा लढत आहात. तुमच्या घराजवळचा मतदार तुमच्या नावाने बोंब मारतोय त्याकडे लक्ष द्यायला वेळ नव्हती का …?

★हा प्रश्न आहे जनतेचा ?

वार्डातील साध्या सरळ समस्या निराकरणाचा, निवडून येऊन वॉर्डांत कधी फेरफटका मारलाय का? कारण तुमच्या जवळ वेळेचं नाही? बडा राजकीय आला की पुढे पुढेआणि मागे मागे करायचं आणि नेता गेला की तू कोण मी कोण?

★ तुमचं अस्तिवचं शुन्य..काय करणार?

अरे उमेदवार हो….!!
ही राज्य/राष्ट्रीय स्तरावरील निवडणूक नाही.. !!
हि आपल्याच गल्लीतील आपल्या गावातील निवडणूक आहे..?
वेळ आली की पायलीचे पन्नास करून सांगता….
इतके वर्ष आपण स्वतः काय केले ते जनतेला दाखवा ना केवळ मलिंदा खाण्यासाठी आलात का?

तसेच शासनाची जबाबदारीच असते तुम्हाला काय हक्क
शासनाच्या केलेल्या मोठ्या मोठ्या कामाचा पाडा तुम्ही वाचवुन दाखवतात गल्लीतील नाली साफ करण्यासाठी कधी वार्ड बघीतले का ? नुसती फोटो बाजी करून दिखाऊ का ?

★म्हणून स्वतःची हिंमती वर
तर लढा ना…!
मोठ्या अभिमानाने राजकीय नेत्यांचे नावाने निवडणूक जिंकण्यासाठी वेळ मारून काय उपयोग हो?
★एका क्षणात सगळे नेस्तनाबूत व्हाल..!!

म्हणून आपल्या वार्डातील आपल्या नगरातील सच्चा , प्रामाणिक प्रतिनिधी हाकेला धावून येणारा, अर्ध्या रात्री तुमच्या हाकेला आणि कॉल ला धावून आला पाहिजे.. शेवटी आपला जवळचा माणूस माणुसकी म्हणून धावत आला पाहिजे….!!

बड्या नेत्यांचे गुणगाण आणि भेंडोळ्या गावभर फिरवून होत नाही… ना? उमेदवार हो… कर्णकर्कश आवाजाचा धूर सोडत
गावभर ध्वनी प्रदूषण करीत फिरताय? जनता तुम्हाला माफ करणार नाही कशाला गाजावाजा करता बड्या नेत्याच्या कुबड्यावर उड्या मारताय काय नुसते?

“” “जनता सतर्क आहे…
*जनता समर्थ आहे समर्थ राहणार..””

म्हणून विचार करा मतदारांनो आपले अमूल्य मत कार्यशील ,आपल्या नगरातील / प्रभागातील समस्या सोडवण्यास तत्पर व्यक्तीलाच द्या जो आपल्यासाठी कधीही कुठेही धावून येतो..एक काम कमी होईल पण आपल्यासाठी नकळत धावून येईल चला ठरलं तर मग… एक संधी आपल्या हाती आपले मत आपल्या हक्काच्या आणि हक्काच्याचं माणसाला!!!

सौ एकता प्रशांत समर्थ ✋
आणि त्यांच्या सर्व शिलेदारानाचं ….!!!!

RELATED ARTICLES

नगरपरिषद निवडणूक, आज फैसला. नेत्यांचे ” षटकार ” तर मतदारांचे “फटकार “…….. !

नगरपरिषद निवडणूक, आज फैसला..... नेत्यांचे " षटकार " तर मतदारांचे "फटकार "........ ! राजकारण प्रा. महेश पानसे. मुल : जिल्ह्यातील अनेक नगरपरिषदांच्या नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या भाग्याचा आज...

” मूल च्या राजकारणातील वलयांकित वादळ..!!”

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस नगरसेवक पदाचे उमेदवार श्री.प्रशांत समर्थ- " मूल च्या राजकारणातील वलयांकित वादळ..!!" ह्यांच्या तोडीचा एक तरी नगर सेवक दाखवा... ज्यांनी लोकांच्या मनात घर केला.. इतकी वर्ष ज्यांनी मूल...

मूल न. प. नगराध्यक्ष पद निवडणूक…. नेत्यांची पाळत, जोरदार भिडंत…!

मूल न. प. नगराध्यक्ष पद निवडणूक.... नेत्यांची पाळत, जोरदार भिडंत...! राजकारण महेश पानसे. मुल : महिला आरक्षण असलेल्या मूल नगराध्यक्ष पदाकरिता अखेर कांग्रेस तफै माजी सभापती प़शांत समथॅ...

जनशक्ती मजबूत राहिली तर धनशक्तीवाल्या सत्ताधाऱ्यांचा माज उतरण्यास वेळ लागणार नाही- खासदार प्रतिभा धानोरकर.

जनशक्ती मजबूत राहिली तर धनशक्तीवाल्या सत्ताधाऱ्यांचा माज उतरण्यास वेळ लागणार नाही- खासदार प्रतिभा धानोरकर. मूल - मूल नगर परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसला मिळत असलेला प्रतिसाद पाहून...

निधी नसताना दिवसभर नगर परिषदेत नुसतं बसून कांय करणार , सुधीरभाऊंच्या निधीनेच विकास शक्य , जनतेमध्ये कुजबुज

निधी नसताना दिवसभर नगर परिषदेत नुसतं बसून कांय करणार , सुधीरभाऊंच्या निधीनेच विकास शक्य , जनतेमध्ये कुजबुज मूल नगरपरिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षपदासाठी एकूण पाच...
- Advertisment -spot_img

Breaking News

Popular News