Monday, August 10, 2026
Google search engine
HomeBusinessNewsनवभारत विद्यालय मुल येथे संविधान दिन साजरा

नवभारत विद्यालय मुल येथे संविधान दिन साजरा

नवभारत विद्यालय मुल येथे संविधान दिन साजरा

मुल : दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी नवभारत विद्यालय मुल येथे संविधान दिन साजरा करण्यात आला. विद्यार्थांची शालेय परिसरातून गांधी चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत घोषवाक्य सह रॅली काढण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अशोक झाडे सर होते .कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून श्री. उपेंद्र वनकर सर तालुका समन्वयक डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे, पर्यवेक्षिका सौ वर्षा भांडारकर मॅडम जेष्ठ शिक्षक गुरुदास चौधरी सर होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रतिमेचे पूजन तथा द्वीपप्रज्वलन मान्यवर मंडळींच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे जेष्ठ शिक्षक विजय मेश्राम यांनी केले. त्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी संविधान या विषयावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक श्री उपेंद्र वनकर तालुका समन्वयक डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.सुंदर सुमधुर असे गीत गायन केले.त्यानंतर सौ.भांडारकर मॅडमने विद्यार्थांना आंबा,व कडूलिंबाची रोप भेट दिली.संविधानाबाबत जनजागृती करण्यासाठी आणि आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने देशभरात २६ नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो.
शाळेचे मुख्याध्यापक अशोक झाडे सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विध्यार्थ्यांना भारतीय संविधानाचे महत्व सांगितले. तसेच भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ भारतीय संविधान दिन साजरा केला जातो.असे प्रतिपादन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी भक्ती मारकवार, लक्ष्मी कवाडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार गाथा निमगडे हिने मानले. याप्रसंगी विद्यालयाचे शिक्षक विकास मोडक, निलेश माथनकर, विजय निखारे, भारत सलाम, राजू बोढे, चैतन्य पुप्पलवार, सुनील चौधरी, ताराचंद निमसरकर, पुनमचंद वाळके, उदयचंद्र चौधरी तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

 

RELATED ARTICLES

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुका मध्ये २ ऑक्टोबरला इंटकचे राष्ट्रीय अधिवेशन

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुका मध्ये २ ऑक्टोबरला इंटकचे राष्ट्रीय अधिवेशन अधिवेशनाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजन समितीची बैठक. चंद्रपूर, दि. ९ ऑगस्ट २०२६  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे...

ने. ही. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी तुकाराम मुंढे चा संवाद….

ने. ही. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी तुकाराम मुंढे चा संवाद.... आयुक्तांनी दिला विद्यार्थ्यांना गुरुमंत्र! नागभीड:- मिशन IAS चे विभागीय संचालक श्री. मुनीराज कुथे व सहायक शिक्षक मनोज हेमके यांच्या मार्गदर्शनाखाली...

सौंदर्यकरण हवेच, सोबत फुले दांपत्यांचे स्मारक उभारा.

सौंदर्यकरण हवेच, सोबत फुले दांपत्यांचे स्मारक उभारा. इ अ. भा. समता परिषदेची भावनिक मागणी. मूल:- नगरपरिषदेतर्गत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले चौकाच्या सौंदर्यकरणाकरिता...

1 ऑगस्ट ला शहरात ” घर घर मे आयुर्वेद ” शिबीर.

1 ऑगस्ट ला शहरात " घर घर मे आयुर्वेद " शिबीर. मूल:--- गोर गरीबांना निशुल्क आरोग्य सेवा मिळावी व आयुर्वेद व आयुर्वेदाचे मौलिक महत्व घरोघरी...

राज्य पत्रकार संघ राज्य अध्यक्ष (निवड समिती) पदी प्रा. महेश पानसे.

राज्य पत्रकार संघ राज्य अध्यक्ष (निवड समिती) पदी प्रा. महेश पानसे. मुंबई :- ( विशेष प़तिनिधी) महाराष्ट्र राज्यातील अग्रगण्य व सर्वात मोठ्या पत्रकार संघ असलेल्या महाराष्ट्र...
- Advertisment -spot_img

Breaking News

Popular News