इम्पॅक्ट मूल नगरपरिषद निवडणूक २०२५
मूल काँग्रेस मध्ये नव पर्वाचा नवा जोश आणि नव ऊर्जा घेऊन येणार वादळ….!!!
मुल आदरणीय आमदार तथा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार आणि प्रदेश कार्यकारणीचे महासचिव संतोषसिंह रावत ह्यांच्या नेतृत्वाखाली होऊ घातलेल्या नगरपरिषद निवडणूक रणांगणात नवी उमेद नव परिवर्तनाची लाट उसळणार हे नक्की…!!
त्यासाठी साथीला असलेले मातब्बर उमेदवार राकेशभाऊ रत्नावार प्रशांतभाऊ समर्थ आणि सर्व नवप्रवर्तनाचे युवा शिलेदार (उमेदवार) ऋत्विक दिनेश गोयल,राहूल प्रेमलवार,विवेक मुत्यालवार अशोक येरमे,मिथुन उर्फ नितीन गद्देवार,अतुल गोवर्धन विलास कागदेलवार तुकाराम गुरूनूले लिना सुरेश फुलझेले, , समिक्षा जगदिश कडस्कर ज्योती चंद्रकांत चटारे कु.काजल दीपक धारणे,पायल सुनील महाडोळे, उज्ज्वला अंकुश कामडी,शालू किसन शेरकी,भारती गणेश मेश्राम, नलिनी दिनेश आडपवार, सुशिला डेव्हिड खोब्रागडे
ह्या सारखे धडाडीचे उमेदवार तथा मूल कांग्रेस च्या पदाधिकारीनी व निष्ठावंत कार्यकर्ते ह्यांनी कंबर कसली त्यामुळे नवी ऊर्जा व नवचैतन्य निर्माण झाला आहे.
कोणत्याही भूलथापांना बळी न पडता हि निवडणूक प्रस्थापित सत्तेला हाणून पाडणारी ठरेल हे निश्चित..!! सर्व उमेदवार स्वताच्या कर्तृत्वावर स्वतःच्या प्रतिमेवर रिंगणात उतरले आहे.
काही पक्षांनी क्षेत्रातील पक्षातील बॅकफूट वर असलेल्या नेत्याच्या प्रतिमा वापरून स्वतःची कार्यक्षमता शून्य असल्याची जाणीव करून देत आहे.निष्फळ जनतेचा आशावाद निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. सत्ताधीश पक्षातील निष्क्रिय उमेदवाराला धडा शिकवतील व ह्यांना जनता माफ करणार नाही.
शासनाचा वेतन लाटणाऱ्या चाकरमानी म्हणजेचं नोकरदार व्यक्तीला ‘नगराध्यक्षपद` उमेदवार म्हणून निवडणुकीत उतरवून स्वतःची पाठ स्वतः थोपटून घेण्याचा निष्फळ आणि केविलवाणा प्रयत्न करीत आहे.ह्याचा विचार सुजाण नागरिक करतीलचं. आणि अनागोंदी कारभाराला आळा घालतील..!! हे निर्विवाद सत्य आहे.
म्हणूनच नगरातील समंजस नागरिकांनो आपले अमूल्य मत सार्थकी लावण्यासाठी आपल्या हक्काचे,आपल्यासाठी धावून येणाऱ्या, उमेदवारांना द्यालचं . हे वेगळे सांगायला नको. तुम्ही सुज्ञ आहातचं..तो विश्वास मुलशहरातील जनतेचा आहेचं.शहराची उत्तम प्रतिमा निर्माण कराल..!! जागरूक नागरिक म्हणून ह्या सर्व बाबींचा विचार गांभीर्याने करुन
चोवीस तास नगरात वास्तव्य करून राहणारी नगरातील समस्येची जाण असणारी भारतीय राष्ट्रीय कांग्रेस ची
प्रामाणिक, होतकरू, कर्तव्यदक्ष सुशिक्षित, सुसंस्कृत, सक्षम स्वच्छ प्रतिमा असलेली नगराध्यक्ष पदाची उमेदवार सौ.एकता प्रशांत समर्थ ह्यांचा झंझावात सदैव तेवत राहील. आणि काँगेस चे सर्व युवा शिलेदार(उमेदवार) प्रचंड मताधिक्यांनी निवडून येतील. आणि प्रस्थापित सत्तेला व दूटप्प्पी धोरणाला नेस्तनाबूत करतील. हा विश्वास आहे …!!
“बुंद बूँद मे समाये हुऑ आगाज है||
अबकी बार परिवर्तन का नारा हमारा है||”
जनता सर्व काँग्रेस पक्षाचे पाठीशी भक्कमपणे उभे असल्यामुळे काँग्रेस च्या गोटात `नवा जोश, नवा उत्साह , नवी ऊर्जा घेऊन येणार वादळ आहे.`. आणि मूलनगरातील जनतेचा कौल सार्थ ठरविणारा आहे नक्की….!!!



