Saturday, October 3, 2026
Google search engine
HomeBusinessNewsगुरुनानक जयंतीनिमित्त माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांची किसाननगर गुरुद्वारा येथे सदिच्छा...

गुरुनानक जयंतीनिमित्त माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांची किसाननगर गुरुद्वारा येथे सदिच्छा भेट!

गुरुनानक जयंतीनिमित्त माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांची किसाननगर गुरुद्वारा येथे सदिच्छा भेट!

गुरुनानकदेवजींच्या शिकवणींनी समाजात बंधुता, सेवा आणि एकतेचा संदेश दिला  मा.खा. डॉ. नेते

सावली प्रतिनिधी रोशन बोरकर

सावली, दि. ०४ नोव्हेंबर २०२५श्री गुरुनानक शाही गुरुद्वारा सेवा समिती, किसान नगर (ता. सावली, जि. चंद्रपूर) यांच्या वतीने गुरुनानक जयंती उत्साहात साजरी करण्यात आली करण्यात आली.
या पवित्र प्रसंगी माजी खासदार तथा भारतीय जनता पार्टी अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी गुरुद्वारा येथे भेट देऊन श्री गुरुनानक देवजींच्या प्रतिमेस नतमस्तक होऊन पूजन-अर्चा केली.

मा.खा.डॉ. नेते यांनी यावेळी गुरुद्वाऱ्यात उपस्थित महिला, बंधू-भगिनींशी संवाद साधत गुरुनानक जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि सर्वांना गुरुनानकदेवजींच्या शिकवणींचे पालन करण्याचे आवाहन केले.

यावेळी प्रामुख्याने गुरुद्वारा सेवा समितीचे अध्यक्ष कर्मवीर कुडावले, चामोर्शी नगर पंचायतीचे नगरसेवक आशिष पिपरे, भाजप बूथ प्रमुख मुकेश बिके, तसेच पमीसिंग सलुजा, राजकुमार गलगट, विजय मजोके, रीना कलीये, शशिकला कुडावले, रिया गलगट आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने गुरुनानक भक्त बंधू-भगिनींची उपस्थिती लाभली. गुरुद्वाऱ्यात या दिवशी कीर्तन, लंगर सेवा व गुरुवचन पठणाचा कार्यक्रम भाविकांनी आयोजित करण्यात आले आहे हे श्रद्धापूर्वक अनुभवायला मिळेलच

मा.खा.डॉ. अशोकजी नेते यांनी या भेटी प्रसंगी सदिच्छा देत श्री गुरुनानक देवजी हे केवळ धर्मगुरू नव्हते, तर त्यांनी संपूर्ण मानवजातीस एकतेचा, प्रेमाचा आणि सेवाभावाचा अमूल्य संदेश दिला. त्यांचे जीवन हे करुणा आणि समतेचे प्रतीक आहे. आपण सर्वांनी त्यांचा आदर्श आपल्या कृतीतून जगवावा, हीच खरी गुरुपूजा ठरेल,”असे माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांनी या प्रसंगी सांगितले.

या भेटीद्वारे गुरुद्वारा परिसरात आध्यात्मिक वातावरण व सामाजिक सलोखा अधिक दृढ झाला असून, उपस्थित भाविकांनी डॉ. नेते यांचे मन:पूर्वक स्वागत केले.
गुरुनानक जयंतीनिमित्त हा कार्यक्रम बंधुता, श्रद्धा आणि सेवाभावाने ठरला.

RELATED ARTICLES

तालुकास्तरीय शालेय स्पर्धा परीक्षापूर्व मार्गदर्शन शिबिर

तालुकास्तरीय शालेय स्पर्धा परीक्षापूर्व मार्गदर्शन शिबिर मूल- जवाहर नवोदय परीक्षा मार्गदर्शन केंद्र चंद्रपूर अंतर्गत मूल तालुक्यातील इयत्ता चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षा तसेच इयत्ता पाचवी...

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुका मध्ये २ ऑक्टोबरला इंटकचे राष्ट्रीय अधिवेशन

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुका मध्ये २ ऑक्टोबरला इंटकचे राष्ट्रीय अधिवेशन अधिवेशनाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजन समितीची बैठक. चंद्रपूर, दि. ९ ऑगस्ट २०२६  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे...

ने. ही. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी तुकाराम मुंढे चा संवाद….

ने. ही. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी तुकाराम मुंढे चा संवाद.... आयुक्तांनी दिला विद्यार्थ्यांना गुरुमंत्र! नागभीड:- मिशन IAS चे विभागीय संचालक श्री. मुनीराज कुथे व सहायक शिक्षक मनोज हेमके यांच्या मार्गदर्शनाखाली...

सौंदर्यकरण हवेच, सोबत फुले दांपत्यांचे स्मारक उभारा.

सौंदर्यकरण हवेच, सोबत फुले दांपत्यांचे स्मारक उभारा. इ अ. भा. समता परिषदेची भावनिक मागणी. मूल:- नगरपरिषदेतर्गत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले चौकाच्या सौंदर्यकरणाकरिता...

1 ऑगस्ट ला शहरात ” घर घर मे आयुर्वेद ” शिबीर.

1 ऑगस्ट ला शहरात " घर घर मे आयुर्वेद " शिबीर. मूल:--- गोर गरीबांना निशुल्क आरोग्य सेवा मिळावी व आयुर्वेद व आयुर्वेदाचे मौलिक महत्व घरोघरी...
- Advertisment -spot_img

Breaking News

Popular News