Saturday, April 18, 2026
Google search engine
HomeBusinessNewsसावली तालुका काँग्रेस कमिटी तर्फे भव्य बक्षीस वितरण सोहळा व कार्यकर्ता सत्कार...

सावली तालुका काँग्रेस कमिटी तर्फे भव्य बक्षीस वितरण सोहळा व कार्यकर्ता सत्कार कार्यक्रम

सावली तालुका काँग्रेस कमिटी तर्फे भव्य बक्षीस वितरण सोहळा व कार्यकर्ता सत्कार कार्यक्रम

सावली प्रतिनिधी रोशन बोरकर

विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्य देणाऱ्या गावाचे आमदार मा. विजय भाऊ वडेट्टीवार यांनी मानले आभार

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना निवडून देण्याचे तालुकाध्यक्ष नितीन गोहने यांचे आवाहन.

सावली :- दिनांक ०२/११/२०२५ ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मान.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या संकल्पनेतून ब्रम्हपुरी विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून विधानसभे अंतर्गत येणाऱ्या ब्रम्हपुरी,सिंदेवाही व सावली तालुक्यातील ज्या गावातील बुथवर सर्वाधिक मतदान मिळेल अश्या गावात यथोचित पुरस्कार व सत्कार करण्यात येईल असे आमदार मान.विजयभाऊ वडेट्टीवार यांनी कार्यकर्त्यांना आश्वासन दिले होते त्याची पूर्तता आज करण्यात आली.

सावली तालुक्यातील बुथ क्रमांक २५७ सादागड हेटी व सादागड या बुथावर २७८ एकूण मतदान झाले त्यापैकी काँग्रेस पक्षाला २५९ मते मिळाली व त्याची टक्केवारी ९३.१६ % एवढी हा बुथ सावली तालुक्यातूनच नव्हे तर ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातून प्रथम आला तसेंच बुथ क्रमांक २५६ मानकापूर,चक मानकापूर व मेटेगाव या बुथवर झालेल्या ३५९ एकूण मतदानापैकी काँग्रेस पक्षाला २९७ एवढे मते मिळाली व टक्केवारी ८२.७२ % मिळवत तालुक्यातून दुसरा नंबर राहिला विशेष म्हणजे दोन्ही बुथ बोथली पंचायत समिती गण व बोथली – कवठी जि.प.गटा-अंतर्गत येतात.

आज तालुक्यातील सादागड व मानकापूर येथे पक्षासाठी अहोरात्र काम करण्याऱ्या कार्यकर्त्यांचा पुष्पगुच्छ व पुरस्कार देऊन सावली तालुका काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळातर्फे सत्कार करण्यात आला.कार्यकर्ता सत्कार व पुरस्कार वितरण कार्यक्रमा प्रसंगी बुथ क्रमांक २५७ सादागड हेटी व सादागड या बुथावर सक्रिय असलेले काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते शरद मडावी,अनिल कुळमेथे,भिमराव शीडाम ,शीडाम गुरुजी, श्रीरंग सोयाम,विलास मडावी,जितेंद्र उर्वेते तसेच बुथ क्रमांक २५६ मानकापूर,चक मानकापूर व मेटेगाव या बुथावर सक्रिय असलेले प्रकाश वेटे, युवराज वेटे, सुधाकर सोनटक्के, गुलाब गेडाम,श्रीकृष्ण गेडाम,अशोक दलांजे,सुरेश गेडाम आदी प्रमुख कार्यकर्त्याचे पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच बुथ क्रमांक २५६ व २५७ या दोन्ही बूथावरिल मतदारांचे आमदार मान.विजयभाऊ वडेट्टीवार साहेब यांचेकडून व सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे आभार मानण्यात आले.

याप्रसंगी सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहने,माजी सभापती प.स.तथा शहर अध्यक्ष कृष्णा राऊत,माजी सभापती प.स. विजय कोरेवार,नगराध्यक्ष साधना वाढई,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अनिल स्वामी,संचालक अरविंद भैसारे,बोथलीचे उपसरपंच नरेश पाटील गड्डमवार,नगरसेवक सचिन संगीडवार,युवा विधानसभा उपाध्यक्ष नितीन दुवावार,ग्राम काँग्रेस कमेटी घोडेवाहीचे अध्यक्ष संजय दुधे,युवा नेते श्रीकांत बहिरवार, जनसंपर्क कार्यालय प्रमुख कमलेश गेडाम, मनोज शेंडे,राजू कंचावार,पुरषोत्तम कोरेवार आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

शिक्षक आमदारांच्या उपस्थितीत महामानवांची जयंती संपन्न.

शिक्षक आमदारांच्या उपस्थितीत महामानवांची जयंती संपन्न. चंद्रपूर/मूल :- विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शिक्षक आमदार सुधाकरराव अडबाले यांच्या उपस्थितीत नवभारत विदयालय तथा कनिष्ट विज्ञान...

जागतिक आरोग्य दिन दिनांक : ७ एप्रिल २०२६ ‘आरोग्यम् धनसंपदा’

जागतिक आरोग्य दिन दिनांक : ७ एप्रिल २०२६ 'आरोग्यम् धनसंपदा' डॉ. ज्योत्स्ना प्रभाकर राऊत (येलमुले) मराठी विभाग महिला महाविद्यालय, गडचिरोली "आरोग्य परमं भाग्य स्वास्थ सर्वार्थसाधनम शरीरमाद्य खलू धर्मसाधनम"...

नवभारत विद्यालयात HVP लसीकरण समुपदेशन कार्यशाळा संपन्न

नवभारत विद्यालयात HVP लसीकरण समुपदेशन कार्यशाळा संपन्न मूल: -दि. 23 मार्च 2026 रोजी नवभारत विद्यालय मुल येथे पालक सभा आणि HVP लसीकरण समुपदेशन कार्यशाळा आयोजित...

नवभारत विद्यालयात सिडबाॅल तयार करण्याचे प्रशिक्षण .

नवभारत विद्यालयात सिडबाॅल तयार करण्याचे प्रशिक्षण . मुल :  दि. 13/03/2026रोज शुक्रवारला नवभारत विद्यालय मूल येथे मुख्याध्यापक श्री.सी.जी.बारसागडे यांचे मागॅदशॅनात राष्ट्रीय हरित सेना टीम व...

सावली येथे १५ मार्च ला विनामूल्य मोतीबिंदू डोळे तपासणी शिबिर

सावली येथे १५ मार्च ला विनामूल्य मोतीबिंदू डोळे तपासणी शिबिर सावली प्रतिनिधी रोशन बोरकर सावली :- दिनांक १२/०३/२०२६ सावली येथे दिनांक १५ मार्च २०२६ ला लॉयन आय...
- Advertisment -spot_img

Breaking News

Popular News