Wednesday, July 15, 2026
Google search engine
HomeBusinessNewsअतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवाना कोणतेही निकष न लावता नुकसान भरपाई द्यावी...

अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवाना कोणतेही निकष न लावता नुकसान भरपाई द्यावी :- नितीन येरोजवार

अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवाना कोणतेही निकष न लावता नुकसान भरपाई द्यावी :- नितीन येरोजवार

सतीश राजुरवार उप संपादक
मुल : मुल तालुक्यात अतिवृष्टीमुळे संपूर्ण भात व कापूस पिकाचे प्रचंड नुकसान झाले असुन सर्व पिके पाण्याखाली येऊन जमीनदोस्त झाली आली आहे या प्राश्वभूमिवर बल्लारपूर विधानसभा संघटन प्रमुख नितीन येरोजवार व तालुका प्रमुख राजेश ठाकरे , शिवसेना (उ.बा.ठा) शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी संपूर्ण तालुक्याच्या शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली असता शेतकर्यांचे उभे पिक पाण्याखाली जमीनदोस्त झालेल्या असुन त्यांच्या हातात पिक काही येण्याची शक्यता नाही ,अगदी कापणीच्या वेळेवर पाऊस खूप पडल्याने सर्व पिक उध्वस्त झाले आहे . धान कापणी करून ठेवण्यात आलेले व उभे धान असलेले अति प्रमाणात पावसामुळे धान जमीनदोस्त झालेले आहे तरी प्रशासनाचे लक्ष्य वेधण्यासाठी शिवसेना बल्लारपूर विधानसभा संघटन प्रमुख नितीन येरोजवार व तालुका प्रमुख राजेश ठाकरे यांच्या नेतृत्वात मुल उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले.अतिवृष्टीमुळे शेतकरी वर्गाचे पिकाचे अतोनात नुकसान झालेले आहे त्यांच्या हातात आलेला घास हिरावला गेला त्यामुळे धान,कापूस उत्पादक शेतकरी बांधवाना सरसकट कोणतेही निकष न लावता , 50 हजार रुपये हेक्टरी नुकसान भरपाई द्यावी तसेच सातबारा कोरा करून संपूर्ण कर्जमाफी करावी अशी मागणी मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आलेली आहे. निवेदन देताना शहर प्रमुख बादल करपे ,उपतालुकाप्रमुख रवी शेरकी,सुशी सरपंच अनिल सोनुले,उपतालुकाप्रमुख संदीप निकुरे ,माजी तालुका प्रमुख सुनील काळे, महेश चौधरी,तालुका समन्वयक ओमदेव मोहुर्ले,दिशांत पुण्यापवार व शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ने.हि.विद्यालयात गणवेश वितरण सोहळा उत्साहात संपन्न.

ने.हि.विद्यालयात गणवेश वितरण सोहळा उत्साहात संपन्न. जिद्द व चिकाटी हिच यशाचा गुरुमंत्र ....... अशोकजी भैया नागभीड;--- जिद्द, चिकाटी, परिश्रम व संस्कार यातूनच सुसंस्कृत व यशस्वी विद्यार्थी घडतात....

सनराईज मल्टिपर्पज ऑर्गनायझेशन, मूल तर्फे स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, मूल येथे महाराष्ट्र कृषी दिन साजरा

सनराईज मल्टिपर्पज ऑर्गनायझेशन, मूल तर्फे स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, मूल येथे महाराष्ट्र कृषी दिन साजरा  मूल : - सनराईज मल्टिपर्पज ऑर्गनायझेशन, मूल तर्फे मूल येथील स्वामी...

मूल न. प. ॲक्शन मोडवर…. मान्सूनपूर्व तयारी सुरू.

मूल न. प. ॲक्शन मोडवर.... मान्सूनपूर्व तयारी सुरू.  मूल;-- उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची चणचण दूर सारण्याकरीता न. प. ची जरा दमछाक झाली खरी पण गाडी रूळावर आणून...

श्रीगुरूदेव भक्त डॉ. विठ्ठलराव बोरकुटे यांचे निधन.

श्रीगुरूदेव भक्त डॉ. विठ्ठलराव बोरकुटे यांचे निधन. नागभीड:- वंदनीय तुकडोजी महाराज यांचे सहवासात ज्यांचे बालपण गेले, महाराजांच्या विचारांनी ज्यांनी आयुष्यभर निस्वार्थ पणे रुग्ण सेवा दिली असे नवेगाव...

मूल न. प. ॲक्शन मोडवर….

मूल न. प. ॲक्शन मोडवर.... मान्सूनपूर्व तयारी सुरू. मूल;- उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची चणचण दूर करण्याकरीता न. प. ची जरा दमछाक झाली खरी पण गाडी रूळावर आणून...
- Advertisment -spot_img

Breaking News

Popular News